लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोला : तुकड्या-तुकड्यात विभागलेला आपला समाज एकत्र येण्याची खरी गरज आहे. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावे. आपण दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत जाऊ, आपल्याला सत्तेत राहणे आवश्यक आहे, अशी साद केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांना शनिवारी येथे घातली.
पश्चिम वऱ्हाडातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. माझा समाज नरेंद्र मोदींसोबत असल्याने त्यांच्यासोबत जायला पाहिजे, असे म्हणत रामदास आठवले यांनी अकोल्यात पुन्हा ऐक्याची भूमिका घेतली. केवळ निवडणुका लढून त्याचा काही उपयोग नाही. गोरगरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपण सत्तेमध्ये जाणे आवश्यक आहे, असे रामदास आठवले पुढे म्हणाले.
आणखी वाचा-फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू असते. मात्र, देशातील जनतेसह आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत. नरेंद्र मोदींनी काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले. आता बाबासाहेबांचे संविधान त्याठिकाणी लागू झाले. संविधान कोणी बदलू शकत नाही. राहुल गांधी व काँग्रेसकडून संविधान बदलण्याचा सातत्यााने अपप्रचार केला जातो. या माध्यमातून समाजामध्ये भेद व फूट पाडण्याचे काम काँग्रेस करीत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला.
नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांच्या स्मारकांची अनेक कामे पूर्ण केली. इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभे राहत आहे. त्यांच्या विरोधात राहुल गांधी विनाकारण फिरत आहेत. फिरा आणि निवडणुकीत हरा, असा टोला देखील त्यांनी लगावला.
आणखी वाचा-नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
आम्ही कोणत्या जाती, धर्माच्या विरोधात नाही. नरेंद्र मोदी सर्व घटकांच्या विकासासाठी कार्य करीत आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा फायदा मुस्लिमांसह सर्व घटकांना होतो. उच्चवर्णीयांसाठी देखील १० टक्के आरक्षण लागू केले. केंद्र सरकारच्या योजनेतून गोरगरिबांना घरे देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी नियमित टाकला जातो. महाराष्ट्रात लाडक्या बहीण योजना सुरू करून महिलांना आर्थिक आधार देण्याचे मोठे कार्य झाले. विदर्भाचा देखील सर्वांगीण विकास केला जात आहे. नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सिंचन सुविधा तयार होईल. पाणी आल्यावर प्रत्येक शेतकऱ्याचा विकास होईल. शेतकरी, दलित, ओबीसींना न्याय देण्याची भूमिका मोदी सरकारची आहे, असे रामदास आठवले म्हणाले.