जळगाव : मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी तसेच छट पुजेच्या काळातील गर्दी लक्षात घेऊन पुणे-नागपूर, नागपूर-हडपसर, पुणे-दानापूर, पुणे-गोरखपुर, हडपसर-गाजीपूर सिटी, हडपसर-दानापूर, हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झासी स्थानकांदरम्यान गुरूवारी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा लाभ जिल्ह्यातील प्रवाशांना होऊ शकेल.
०१४०१ पुणे-नागपूर ही विशेष गाडी पुणे येथून गुरूवारी रात्री ०८.३० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबेल. एक एसी टू-टियर, एक एसी थ्री-टियर, १३ स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.
०१४१० नागपूर-पुणे ही विशेष गाडी नागपूर येथून गुरूवारी दुपारी ०४.१० वाजता सुटेल. वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन स्थानकांवर थांबेल. एक एसी टू-टियर, ११ स्लीपर क्लास, सात जनरल सेकंड क्लास आणि दोन जनरल सेकंड क्लास कम गार्ड्स ब्रेक व्हॅनची रचना असेल.
०१२०१ नागपूर-हडपसर ही विशेष गाडी नागपूर येथून गुरूवारी रात्री ०७.४० वाजता सुटेल. वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी स्थानकांवर थांबेल. चार एसी थ्री टियर, सहा स्लीपर क्लास आणि सहा जनरल सेकंड क्लास, दोन जनरल सेकंड क्लास गार्ड ब्रेक व्हॅनसह रचना असेल.
०१४४९ पुणे-दानापूर ही विशेष गाडी पुणे येथून गुरूवारी दुपारी ०३.३० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबेल. चार एसी थ्री-टियर, सहा स्लीपर क्लास, सहा जनरल सेकंड क्लास, गार्ड ब्रेक व्हॅनसह दोन जनरल सेकंड क्लासची रचना असेल.
०१४१५ पुणे-गोरखपुर ही विशेष गाडी पुणे येथून गुरूवारी सकाळी ०६.५० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती स्थानकांवर थांबेल. चार एसी थ्री- टियर, सहा स्लीपर क्लास, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.
०१४५३ हडपसर-गाजीपुर सिटी ही विशेष गाडी हडपसर येथून गुरूवारी दुपारी ०४.०० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपुर या स्थानकांवर थांबेल. दोन एसी टू-टियर, १४ स्लीपर क्लास/सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.
०१४५७ हडपसर-दानापूर ही विशेष गाडी हडपसर येथून गुरूवारी रात्री ८.३० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबेल. दोन एसी टू-टियर, १४ स्लीपर क्लास/सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.
०१९२५ हडपसर-वीरंगणा लक्ष्मीबाई झांसी ही विशेष गाडी हडपसर येथून गुरूवारी दुपारी ०३:३० वाजता सुटेल. दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, विदिशा, बीना आणि ललितपूर स्थानकांवर थांबेल. एक एसी टू-टियर, तीन एसी थ्री-टियर, सात स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह दोन जनरल सेकंड क्लासची रचना असेल.
०१०११ सीएसएमटी-नागपूर ही विशेष गाडी सीएसएमटीहून गुरूवारी पहाटे ००:२० वाजता सुटेल. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबेल. दोन एसी टू-टियर, एक एसी थ्री-टियर, १२ स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन जनरल सेकंड क्लास कोच गार्ड ब्रेक व्हॅनसह रचना असेल.
०१०३१ सीएसएमटी-वाराणसी ही विशेष गाडी सीएसएमटीहून गुरूवारी सकाळी ०७.३५ वाजता सुटेल. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज स्थानकांवर थांबेल. एक फर्स्ट एसी कम एसी टू-टियर, एक एसी टू-टियर, १८ एसी थ्री-टियर आणि दोन जनरेटर कारची रचना असेल.
०१०१२ नागपूर-सीएसएमटी ही विशेष गाडी नागपूरहून गुरूवारी रात्री २२:१० वाजता सुटेल. वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर स्थानकांवर थांबेल. दोन एसी टू-टियर, एक एसी थ्री-टियर, १२ स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन जनरल सेकंड क्लास गार्ड ब्रेक व्हॅनची रचना असेल.
