जळगाव : केवळ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व मंडळी एकत्रित आली आहेत. त्यांचे आचारविचार आणि विचारधारा एक नाही. त्यामुळेच त्यांचे एकमेकांशी कधीच जमू शकत नाही. त्यांनी कितीही मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना मानणारा मतदार एकत्रित होऊ शकणार नाही, अशी टीका जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तथा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. शहरातील भाजपच्या बळीरामपेठ परिसरातील वसंतस्मृती या जिल्हा कार्यालयात दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी आमदार राहुल आहेर, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी

आमदार दरेकर यांनी, आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसह मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. मराठा समाजाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. फडणवीस यांच्या नेतृत्वावर मराठा समाजाचा विश्‍वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० टक्के आरक्षणासाठी पुढाकार घेतला. फडणवीस यांची भूमिकाही आरक्षणाची होती. राज्यात पक्षाचे निरीक्षक दौरे करत आहेत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय मते आहेत, ती जाणून घेऊन पक्षनेतृत्वाकडे अहवाल देणे, असा दौरा करण्यामागचा उद्देश आहे. पक्षाच्या निकषांत बसलेल्या इच्छुकाला उमेदवारीबाबत निर्णय घेतला जात असतो. भाजप प्रत्येक जागेची निवडणूक गंभीरपणे घेतो. राज्यातील सर्व जागा पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आल्यानंतर फायदा होईल काय, याचे गणित आपण केलेले नाही. हा आपल्या पातळीवरचा मुद्दा नसल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik bjp mla pravin darekar said that mahavikas aghadi formed only due to modi hate css
First published on: 01-03-2024 at 15:13 IST