-
वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा २०१९ प्रमाणेच २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांच्यावर आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका होत आहे. (Photo-Balasaheb Ambedkar/fb)
-
काही दिवसांआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपrशी छुपे संबंध असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून केली होती. (Photo-Balasaheb Ambedkar/fb)
-
त्यावरून आता काँग्रेस नेते माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना उत्तर दिले आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Photo-Bhalchandra Mungekar/fb)
-
“प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपाला अनुकूल आहे. तसेच वंचित आघाडीची भूमिका भाजपाच्या फायद्याची असून, २०२४ लोकसभेची निवडणूक ही देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली आहे” असे ते म्हणाले आहेत. (Photo-Bhalchandra Mungekar/fb)
-
दरम्यान, वंचितमुळे निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला फायदा होतो आणि काँग्रेसला त्याचा फटका बसतो असे आरोप वंचित वर नेहमी होतात. या आरोपांचे खंडनही पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे. (Photo-Balasaheb Ambedkar/fb)
-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये (इंडिया आघाडी) सामील होण्याची शक्यता होती. त्यासाठी अनेकवेळा चर्चाही झाल्या होत्या. पण चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही. (Photo-Vanchit Bahujan Aghadi/fb)
-
महाविकास आघाडीमध्ये, त्यांचेच (काँग्रेस, शिवसेना- उबाठा, राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार) जागावाटप निश्चित होत नसून, आम्हालाही सन्मानजनक जागा वाटप केलं जातं नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. आणि वंचितचे उमेदवार घोषित केले. (Photo-Vanchit Bahujan Aghadi/fb)
-
वंचित बहुजन आघाडी पक्ष जेव्हापासून निवडणुका लढत आहे, तेव्हापासूनच वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो. वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होईल आणि त्याचा फायदा मविआला लोकसभा निवडणुकीत होईल, असे वाटत असताना प्रकाश आंबेडकरांनी स्वबळाचा मार्ग निवडला. त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर टीका होते आहे. (Photo-Vanchit Bahujan Aghadi/fb)
-
दरम्यान, कोणाचा कोणाला फायदा होणार? आणि कोणामुळे कोणाचं नुकसान होणार? हे तर ४ जूनला लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. (Photo-Balasaheb Ambedkar/fb)
Loksabha Election 2024: वंचितची भूमिका भाजपाला अनुकूल! कोणी केले वंचितवर ‘हे’ आरोप?
वंचित आघाडी भाजपाची ‘बी’ टीम असल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा होतो. दरम्यान, मधल्या काळात वंचितने काँग्रेसला सात जागांवर पाठींबा देऊ असे पत्रक काढले आहे.
Web Title: Congress leader bhalchandra mungekar statement on vanchit bahujan aghadi and prakash ambedkar spl