-
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील निर्णय आणि वाटचाल ठरवण्यासाठी इंडिया घडीने काल बैठक आयोजित केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली.
-
१८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आले आहेत. निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर लढवली गेली त्यामुळ जनतेने मोदींना नाकारलं आहे अशी टीका यावेळी खर्गे खरगेयांनी भाषणात केली.
-
खरगे भाषणात पुढे म्हणाले की संविधानावर प्रेम करणाऱ्या आणि संविधानाने दिलेल्या उद्दिष्ट धोरणांच्या पुर्ततेसाठी इंडिया आघाडी बांधील आहे. संविधान वाचवण्याच्या लढाईत सहभाग घेऊ पाहणाऱ्या सर पक्षाचं इंडिया आघाडीत स्वागत केलं जाईल.
-
भाजपाचे सरकार जनतेला नको आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पाऊले उचलू, तसेच जनतेला दिलेली सर्व आश्वासने आम्ही पाळणार असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे.
-
या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, एम के स्टालिन, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, राघव चढ्ढा, आणि इतरही नेत्यांनी हजेरी लावली.
-
या बैठकीला शिवसेना उबाठा पक्षाकडून नेते संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई यांनी उपस्थिती लावली.
-
४ जूनला जाहीर झालेल्या लोकसभा निकालात काँग्रेस पक्षाला ९९ जागावर विजय मिळाला. २०१९ मध्ये आलेल्या निकालाच्या तुलनेत कॉंग्रेसने चांगल्या जागा जिंकल्या आहेत. २०२९ मध्ये ५२ जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले होते. तर इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय प्राप्त केला आहे. हेही वाचा- PHOTOS : “आधी उद्धव ठाकरेंना…”, राजकीय सन्यास घेण्याच्या वक्तव्यावर आशिष शेलारांचं नव…
PHOTOS : इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील रणनीती काय ठरली; कोणी लावली उपस्थिती? पहा फोटो
भाजपाचे सरकार जनतेला नको आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य वेळी योग्य ती पाऊले उचलू, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे.
Web Title: What was the next strategy decided in the meeting of the india alliance who made the presence spl