• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kapoor family met pm narendra modi see inside photos spl

Photos : कपूर कुटुंबीय पंतप्रधान मोदींच्या भेटीला; करीनाच्या मुलांसाठी दिला ऑटोग्राफ

Kapoor Family Met Pm Narendra Modi Photos : राज कपूर यांच्या १०० व्या जयंती निमित्त बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कुटुंबाने म्हणजेच कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब गेले होते, पाहा फोटो

December 12, 2024 10:31 IST
Follow Us
  • Kapoor Family Met Pm Narendra Modi
    1/13

    रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, अमिताभ बच्चन यांचे जावई निखिल नंदा, नीतू कपूर, त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर आणि पती भरत साहनी आणि इतरांनी १० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब गेले होते मात्र जेह, तैमूर आणि राहा मात्र दिसले नाहीत.

  • 2/13

    राज कपूर यांना १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १३ ते १५ डिसेंबर दरम्यान देशातील ४० शहरांमधील १३५ चित्रपटगृहांमध्ये त्यांचे १० चित्रपट दाखवले जाणार आहेत. अशी माहिती कपूर कुटुंबियांनी दिली आहे.

  • 3/13

    सैफ अली खानचे कपूर कुटुंबाशी नाते करीना कपूरमुळे आले. त्यामुळे तोही पंतप्रधानांना निमंत्रण देण्यासाठीही आला होता. जिथे पंतप्रधानांनी त्याचे हात जोडून स्वागत केले आणि संवाद साधला.

  • 4/13

    सैफ अली खान आणि पीएम मोदी यांच्यातील संभाषणावेळी रणबीर कपूरनेही कृतज्ञता व्यक्त केली.

  • 5/13

    करीना कपूर, करिश्मा कपूर, नीतू कपूर आणि इतरांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या भेटीचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि पंतप्रधानांसोबतच्या त्यांच्या भेटीचा अनुभव सांगत त्यांचे आभार मानले आहेत.

  • 6/13

    करिश्मा कपूर दोन मुलांची आई आहे. मात्र, यावेळी दोघेही उपस्थित नव्हते. त्यामुळे अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेतला.

  • 7/13

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धिमा कपूरला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले.

  • 8/13

    जेव्हा रिद्धिमा कपूरसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हात जोडले तेव्हा तिने त्यांचे हात धरले आणि त्यांना असे न करण्यास सांगितले.

  • 9/13

    अमिताभ बच्चन यांचे जावई श्वेता बच्चनचे पती निखिल नंदा हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यासाठी पोहचले होते.

  • 10/13

    आधी पंतप्रधानांनी कपूर कुटुंबियांसोबत ग्रुप फोटोसाठी पोज दिली आणि नंतर त्यांच्याशी संवाद साधला.

  • 11/13

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करीना कपूरची मुले तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान यांना त्यांचा ऑटोग्राफही दिला, ज्याचा फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 12/13

    यावेळी करीना कपूर खूपच सुंदर दिसत होती.

  • 13/13

    हेही पाहा- Photos : लोकप्रिय वेब सिरीजमधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहिलात का? फोटो व्हायरल

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattकरिश्मा कपूरKarishma Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor Khanनरेंद्र मोदीNarendra Modiनीतू कपूरNeetu KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoorसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Kapoor family met pm narendra modi see inside photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.