ट्रेलर रिलीजनंतर ‘छावा’बाबत काय काय घडलं? राजकीय प्रतिक्रियांनंतर दिग्दर्शकाचा निर्णय, तो सीन डिलिट…
Chhaava Movie Controversy : सध्या ‘छावा’ या विकी कौशलच्या चित्रपटावरून वादंग उठलं आहे, चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका दाखवताना वादग्रस्त दृष्य दाखवण्यात आल्याने हा वाद उफाळून आला आहे.
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादात अडकला आहे.
1/12
चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृष्यांवर आक्षेप घेतला जात आहे.
2/12
चित्रपटात या गोष्टी येऊ नयेत असा पावित्रा नेतेमंडळी आणि सामाजिक संघटना घेताना दिसत आहेत.
3/12
काय आहे वादादीत दृष्यात? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे.
यावरूनच समाजमाध्यमांवरून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर, काही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्या आहेत.या आक्षेपार्ह दृष्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री उदय सामंत यांनी यावरुन भूमिका मांडल्या आहेत.छावा चित्रपटातील आक्षेपार्ह बाबी वगळून तो प्रदर्शित करावा, अशा सूचना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना केली आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना व नृत्य करताना दिसत आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लेझीम खेळणे चूक नाही. पण त्या गाण्यावर नृत्य करणे, हे कितपत योग्य आहे? सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये हे घ्यायला हवे का? यावर चर्चा करणे आवश्यक आहे”.उद्योग मंत्री शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी देखील या चित्रपटात योग्य ते बदल न केल्यास चित्रपट प्रदर्शित करु दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.सामंत म्हणाले, “चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर ते काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!”दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली आहे, या भेटीनंतर ते म्हणाले “ज्या महाराजांच्या लेझीम खेळणाऱ्या सीनवरुन वाद सुरू आहे, तो आम्ही डिलीट करणार आहोत. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. ज्या सीनवरुन वाद निर्माण झाला, तो आम्ही डिलीट करणार. राज ठाकरेंनीही तोच सल्ला दिला आहे. त्यामागे कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. पण जर कुणाला वाटत असेल, आमचे राजे असे लेझीम खेळत नसतील, तर आम्ही तो सीन चित्रपटातून काढून टाकणार. कारण तो फिल्मचा खूप मोठा भाग नाहीये, एक छोटासा सीन आहे. त्यामुळे तो आम्ही काढून टाकणार आहोत.”(सर्व फोटो साभार – सोशल मीडिया) हेही पाहा- Photos: दीपिका पादुकोण, शर्वरी वाघ ते आलिया भट्ट, सब्यसाचीच्या वर्धापनदिनामधील अभिनेत्रींच्या लूक्सने वेधलं लक्ष