Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan to salman khan these muslim actors celebrated ganesh chaturthi festival spl

Photos: शाहरुख, सलमान खानसह ‘हे’ मुस्लिम कलाकारही गणपतीचे भक्त; थाटामाटात साजरा करतात गणेशोत्सव…

Ganesh Chaturthi 2025 : सिनेजगतातले अनेक स्टार्स मुस्लिम असूनही मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी गणपती बाप्पा त्यांच्या घरी बसवतात. त्यांची मनोभावे पूजा करतात.

Updated: August 28, 2025 16:18 IST
Follow Us
  • Lord Ganesha Tusks Story
    1/10

    दरवर्षीप्रमाणे यंदागी गणेश चतुर्थीचा सण सर्वत्र उत्स्हात साजरा झाला आहे. प्रत्येकाने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत केले आहे. सिनेजगतातले अनेक स्टार्स मुस्लिम असूनही मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी गणपती बाप्पा त्यांच्या घरी बसवतात. त्यांची मनोभावे पूजा करतात. चला या स्टार्सबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Social Media)

  • 2/10

    सलमान खान
    दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सलमान खानच्या घरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावर्षीही सलमानने त्याच्या कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसह गणेश चतुर्थी साजरी केली. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याचे आईवडील, भाऊ, दोन्ही बहिणी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे आणि त्याचे मित्रही त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहेत. (Photo: Social Media)

  • 3/10

    सैफ अली खान
    बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर देखील दरवर्षी त्यांच्या घरी गणपती बाप्पा आणतात. त्यांचे दोन्ही मुलं तैमूर आणि जेहदेखील पूजेमध्ये सहभागी होतात. (Photo: Social Media)

  • 4/10

    शाहरुख खान
    बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्याही घरात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे पालन केले जाते. ज्याप्रमाणे त्याच्या घरात ईद मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे सर्व हिंदू सणही त्याच थाटामाटात साजरे केले जातात. इतकेच नाही तर तो दरवर्षी त्याच्या घरात गणपती बसवतो. (Photo: Social Media)

  • 5/10

    हिना खान
    टीव्ही अभिनेत्री हिना खान आता लग्नानंतर तिचा नवारा रॉकीसोबत गणेश चतुर्थी साजरी करणार आहे. हिनाही दरवर्षी गणपती बाप्पाची पूजा करते. (Photo: Social Media)

  • 6/10

    शाहीर शेख
    टीव्ही स्टार शाहीर शेख प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. मग तो ईद असो किंवा दिवाळी. शाहीर दरवर्षी गणेश चतुर्थदेखील साजरी करतो. (Photo: Social Media)

  • 7/10

    रुबिना दिलैक
    अभिनेत्री रुबीना दिलैकदेखील गणपतीची भक्त आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रुबीनाने बाप्पाची मूर्ती तिच्या घरी आणली आहे, तिचा बाप्पा तिने चाहत्यांनाही दाखवला आहे. (Photo: Social Media)

  • 8/10

    सोहा अली खान
    सैफची बहीण, अभिनेत्री सोहा अली खानदेखील गणपती बाप्पाची खूप मोठी भक्त आहे. सोहा तिच्या घरात बाप्पाची मूर्ती देखील बसवते. (Photo: Social Media)

  • 9/10

    सारा अली खान
    सैफ अली खानची लाडकी लेक, अभिनेत्री सारा अली खान, अनेकदा केदारनाथ आणि वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जाते. देवाप्रती तिची भक्ती सर्वांनाच माहिती आहे. साराही दरवर्षी गणपतीची मूर्ती तिच्या घरी बसवते. (Photo: Social Media)

  • 10/10

    देवोलीना भट्टाचार्य
    ‘साथ निभाना साथिया’ फेम देवोलीना भट्टाचार्यने तिचा नवरा शाहनवाज आणि मुलगा जोईसोबत गणेश चतुर्थी साजरी केली. वेगवेगळ्या धर्माचे असूनही, देवोलीना आणि तिचा नवरा दोघेही एकमेकांचे सण आणि परंपरा खूप चांगल्या प्रकारे पाळतात. (Photo: Social Media) हेही पाहा- Photos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे ते मुरलीधर मोहोळ; राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान, पाहा फोटो

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khanसलमान खानSalman Khanसारा अली खानSara Ali Khanसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Shahrukh khan to salman khan these muslim actors celebrated ganesh chaturthi festival spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.