• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. politicians wish people on ganesh chaturthi festival pm narendra modi cm eknath shinde rahul gandhi ganesh utsav 2024 spl

Ganesh Chaturthi 2024: पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह ‘या’ नेत्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन

Ganeshostav 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय अनेक राजकीय नेत्यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: September 7, 2024 12:35 IST
Follow Us
  • ganesh chaturthi 2024
    1/12

    आज देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 2/12

    गणपत्ती बाप्पाचे स्वागत करताना भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 3/12

    घरगुती गणपती असो किंवा मंडळाचा गणपती असो बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार झाली आहे. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 4/12

    यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊयात. (Express photo by Sankhadeep Banerjee)

  • 5/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर करत देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओतून त्यांनी गणेश उत्सवाचे महत्व सांगितले आहे, संस्कृती, परंपरा महत्वाच्या असल्याचे सांगत असताना त्यांनी देशवासियांना गणेश उत्सवानिमित सुख व समाधान प्राप्त होवो अशा भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 6/12

    राज्याचे मुख्यमंत्री एकनथ शिंदे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना म्हणाले, “गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो,” अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 7/12

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जनतेला शुभेच्छा देताना म्हणाले , “यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करावा. सामाजिक एकतेचा, समतेचा आणि बांधिलकीचा संदेश देणारा हा सण सर्व समाजघटकाला सोबत घेऊन सर्वांनी एकोप्यानं आनंदानं साजरा करावा, असं आवाहन करतो. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, यश, आनंद, उत्साह, नवचैतन्य येवो. माझ्या शेतकरी बांधवांच्या घरी धन-धान्याची भरभराट होवो, कष्टकरी-कामगार वर्गाला सुगीचे दिवस येवो, युवक-युवतींच्या हाताला काम मिळो, गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन होवो. हे राज्य, हा देश अधिक सामर्थ्यवान, गतिमान करण्यासाठी आम्हाला बळ मिळो, अशी प्रार्थना श्रीगणरायांच्या चरणी करतो.” (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 8/12

    “गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया…
    चला, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया!
    श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! महाराष्ट्रात सुख-समृद्धी नांदो, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना!” अशा शब्दात सोशल मीडियावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 9/12

    “बुद्धी व कलांचे दैवत अशा श्री गणेशाचे आज आमगन झाले. गणरायाच्या कृपेने सर्वांना आशीर्वाद प्राप्त होऊन संकटांचा विनाश व्हावा. गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”, अशा शुभेच्छा शरद पवारांनी दिल्या आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 10/12

    “श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.
    मला आशा आहे की हा सण तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करेल आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येईल,” अशा शुभेच्छा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून दिल्या आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 11/12

    . “वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
    निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
    सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाची कृपा सर्वांवर सदैव राहो”, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सोशल मीडियावरून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)

  • 12/12

    हेही वाचा : Ganesh Chaturthi 2024: ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’; बाप्पा आले, प्रतीक्षा संपली! आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ

TOPICS
अजित पवारAjit Pawarएकनाथ शिंदेEknath Shindeगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra Modiनितीन गडकरीNitin Gadkariमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhiशरद पवारSharad Pawar

Web Title: Politicians wish people on ganesh chaturthi festival pm narendra modi cm eknath shinde rahul gandhi ganesh utsav 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.