• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. supporters given a warm welcome to newly elected baramati mp supriya sule on her first visit to city after the loksabha elections spl

PHOTOS : बारामतीतील विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत! उत्साही समर्थकांना केलं ‘हे’ आवाहन

माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या “मी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्यांचं सुखदुःख समजून घेतलं…

Updated: June 6, 2024 19:50 IST
Follow Us
  • Supporters given a warm welcome to Newly elected Baramati MP Supriya Sule
    1/16

    यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदार संघ होता बारामती.

  • 2/16

    कारण बारामतीमध्ये कधी न झालेली गोष्ट घडली ती म्हणजे ज्याप्रमाणे शिवसेना फुटली त्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटला.

  • 3/16

    अजित पवारांनी महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला आणि महायुतीमध्ये प्रवेश केला.

  • 4/16

    त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदही मिळाले, परंतु त्यानंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली.

  • 5/16

    त्यामुळे बारामती मतदारसंघात आधीच निवडून आलेल्या खासदार सुप्रिया सुळे, अजित दादांच्या बहिण आणि सुनेत्रा पवार ननंद-भावजयी यांच्यामध्ये सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.

  • 6/16

    तेव्हापासूनच महाराष्ट्रासह देशाचं लक्ष या लढतीकडे होतं.

  • 7/16

    महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही आघाड्यांनी आपापल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला.

  • 8/16

    शेवटी ४ जून रोजी निकाल घोषित झाला आणि या निकालामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तर महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांना पराभूत व्हावं लागलं.

  • 9/16

    त्यानंतर आता विजयी उमेदवार सुप्रिया सुळे यांचे स्वागत विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

  • 10/16

    आज पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सुप्रिया सुळे यांचा स्वागताचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.

  • 11/16

    यावेळी सुप्रिया यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

  • 12/16

    यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या. “मी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून घेतलं, मायबाप मतदारांनी ICE म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या दडपशाहीला नाकारले आहे. संविधान देशाची ताकद आहे आणि संविधानाच्या चौकटीतच राहून हा देश चालेल, दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला मतदारांनी नाकारले आहे. त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकाऱ्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदाराच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.”

  • 13/16

    त्या पुढे म्हणाल्या “मतदारांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकला त्यामुळं तर माझी जबाबदारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळं आजपासून खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलो आहोत. बारामती मतदारसंघात उद्या सकाळी ९ वाजता रोहित दादा आणि मी दुष्काळी दौरा सुरू करतोय.”

  • 14/16

    “मी कार्यकर्त्यांना विनंती करते की माझं जेसीबीने स्वागत करू नका. मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते. स्वागताचा कार्यक्रम करून खर्च करतोय तो पैसा चाराडेपो मध्ये द्यावा अशी माझी उत्साही कार्यकर्त्यांना विनंती आहे.” असं मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केलं.

  • 15/16

    (सर्व फोटो साभार- Express photographs by Arul Horizon.)

  • 16/16

    हे देखील पहा- PHOTOS : “आधी उद्धव ठाकरेंना…”, राजकीय सन्यास घेण्याच्या वक्तव्यावर आशिष शेलारांचं नव…

TOPICS
अजित पवारAjit PawarबारामतीBaramatiमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtraमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionशरद पवारSharad Pawarसुनेत्रा पवारSunetra Pawarसुप्रिया सुळेSupriya Sule

Web Title: Supporters given a warm welcome to newly elected baramati mp supriya sule on her first visit to city after the loksabha elections spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.