पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे पुणे शहरातील कोंढवा भागात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना अमित ठाकरे म्हणाले की, मुलींवर हात टाकण्याचे प्रकार वाढले आहेत, अशांना त्यांचे हात पाय तोडून पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे.
आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहतो. त्यामुळे जो कोणी मुलींवर हात टाकेल, त्याचे हात पाय तोडा, असे उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन करीत ते पुढे म्हणाले, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपली जरी सत्ता नसली तरी राज साहेब सत्तेत आहेत.
ही गोष्ट कोणीही विसरू नका, हेच मी पालकांशी बोलायला आलो असून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे वचन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.