पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कोलकता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग ५.५ किलोमीटरचा असून ५ फेब्रुवारीला या मार्गावर मेट्रोची चाचणी झाली होती. यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या ७ किलोमीटर आणि वनाज ते गरवारे ५ किलोमीटर मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय ६.९१ किलोमीटर आणि गरवारे ते रुबी हॉल ४.७५ किलोमीटर अशा विस्तारित मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते.

हेही वाचा…पिंपरी : महापालिकेला ‘एसईआयएए’चा दणका! पवना, इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा…

पंतप्रधानांच्या हस्ते बुधवारी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या ५.५ किलोमीटर मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, पंतप्रधानांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही करण्यात आले. हा मार्ग ४.४ किलोमीटरचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मार्ग निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हेही वाचा…घर खरेदी करताय? जाणून घ्या घरांच्या किमती किती वाढल्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. आज लोकार्पण झालेल्या रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गामुळे वनाज ते रामवाडी हा मेट्रो प्रवास अधिक सुलभ होईल. पिंपरी-चिंचवड ते निगडी टप्पा १ मार्गाचे काम सुरू होत असल्याने भविष्यात पिंपरी-चिंचवड शहरालाही याचा फायदा होणार आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi virtually flags off to ruby hall to ramwadi metro and did bhoomi pujan of pimpri chinchwad to nigdi route metro pune print news stj 05 psg