Latest News in Pune : राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचे मोठे शहर असलेल्या पुण्यातील विविध घडामोडी तसंच पुणे परिसरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…
Pune Maharashtra News LIVE Today 07 march 2025
मोटारीची काच फोडून पाच लाखांचे दागिने चोरी; मगरपट्टा मेगासेंटरच्या आवारातील घटना
पुणे : मगरपट्टा मेगासेंटरच्या आवारात व्यावसायिकाच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख ३० हजार रुपयांचे दागिने नेण्यात आल्याची घटना घडली.
महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा
पुणे : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेकडून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनांच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
बारामतीची विशेष विद्यार्थीनी वरदा कुलकर्णी बनली ‘पॅरा स्विमर’
बारामती : बारामती येथील सतरा वर्षीय विशेष विद्यार्थिनी वरदा संतोष कुलकर्णी यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत “पॅरा स्विमर” ( विशेष अपंगासाठी घेण्यात आलेल्या पोहण्याची स्पर्धा ) मध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसे व पुरस्कार प्राप्त केले आहेत.
पोलीसांनी साजरा केला गुन्हेगारांसोबत वाढदिवस; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी केलं चार कर्मचाऱ्यांचं निलंबन
पिंपरी- चिंचवड : सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाई केली आहे.
दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; पर्वती पायथा परिसरात अपघात
पुणे : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पर्वती पायथा परिसरात घडली. याप्रकरणी एसटी बसचालकावरिुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुण्यात १३८ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य! आरोग्य विभागाचा धोक्याचा इशारा
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या परिसरातील पाण्याचे नमुने सातत्याने तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत ७ हजार १९५ नमुने तपासण्यात आले असून, त्यातील १३८ पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळले आहेत.
शहरात मेट्रो ‘रुळ’ली! भविष्यातील कसा असणार मेट्रोचा विस्तार?
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मेट्रोच्या सेवेला तीन वर्षे पूर्ण झाली असून, या तीन वर्षांत मेट्रोचा विस्तार सात किलोमीटरवरून ३३.२८ किलोमीटरपर्यंत झाला आहे. येत्या काही वर्षांत पाच नव्या मार्गिकांचे उद्दिष्ट महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने (महामेट्रो) निश्चित केले आहे.
महापालिकेचे सांस्कृतिक धोरण गुंडाळले, काय कारण!
पुणे : महापालिका आयुक्तांशी चर्चा न करता थेट मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले आणि वादग्रस्त सल्लागार मंडळावरून वादात सापडलेले महापालिकेचे सांस्कृतिक धोरण अखेर दप्तरी दाखल करण्यात आले. या धोरणासाठी वेगळा विभाग स्थापन करून त्यांच्यामार्फत नवीन धोरण तयार केले जाणार आहे.
‘त्या’ बांधकाम प्रकल्पांची तक्रार महापालिका कुठे करणार!
पुणे : बांधकाम करताना प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने महापालिकेने शहरातील २००हून अधिक बांधकाम प्रकल्पांना काम थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अनेक बांधकामे सुरूच असल्याचे लक्षात आले आहे.
महापालिकेला ११ महिन्यानंतर मिळाले ‘हे’ अतिरिक्त आयुक्त!
पुणे : पुणे महापालिकेच्या गेले ११ महिन्यापासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदी राज्य सरकारने एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी सायंकाळी काढले.
तीन लाख लोकांचा पाणी पुरवठा सलग दोन दिवस विस्कळीत!
पुणे : भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधील केबल बुधवारी जळाल्याने वडगाव शेरी, धानोरी, विमाननगर, विश्रांतवाडी भागातील पाणीपुरवठा गुरुवारीदेखील विस्कळीत होता. दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी पूर्ण झाले असले, तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.
इंदापूरच्या ‘लक्षवेधी’ तिरंगी लढतीतील प्रवीण माने भाजपाच्या वाटेवर?
इंदापूर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लढत देऊन तिरंगी लढत लक्षवेधी केलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रस्तर शिल्पांतून महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचे दर्शन!
पुणे : रंग-रेषांनी कॅनव्हासवर रेखाटलेली चित्रे आपण नेहमीच पाहतो. पण, आजूबाजूला आढळणाऱ्या विविधरंगी दगडांमधून चित्रांचे वेगळे जग निर्माण करणाऱ्या प्रस्तर कलाकार आणि लेखिका अनिता दुबे यांनी महात्मा गांधी यांचे जीवनकार्य अशा चित्रांतून आविष्कृत केले आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून (७ मार्च) गांधी भवन येथे आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनात दुबे यांची चित्रमालिका पाहण्याची संधी मिळणार आहे.
अनोळखी व्यापाऱ्याला विकले तांदुळाचे पोते, मात्र त्यात गेले साडेचार तोळ्याचे दागिने
जेजुरी : पुरंदर तालुक्यातील निळूंज या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबातील महिला स्मिता संतोष जगताप (वय ३५) यांनी चोरांच्या भीतीमुळे घरातील सोन्याचे साडेचार तोळ्याचे दागिने तांदुळाच्या पोत्यात महिन्यापूर्वी लपवून ठेवले होते.
परीक्षांच्या वेळापत्रकाला विरोध; मुख्याध्यापकांच्या अधिकारांत ढवळाढवळ होत असल्याचा आरोप
पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षांसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे : स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास कसून चौकशी केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी चौकशी केली.
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स