Pune Palkhi 2025 : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज (शुक्रवारी) पुणे शहरात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची तयारी महापालिका प्रशासनाची पूर्ण झाली आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था महापालिकेने केली असून, यासाठी पालखी मार्गावर आरोग्य कक्ष, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेसह विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या मंडळींनीदेखील पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे. या संबंधित बातम्यांसह मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 20 June 2025
११३ दिवसांची पाणीचिंता दूर; मोरबे धरणात बुधवारी एका दिवसात १९१ मिमी पावसाची नोंद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय, शरद पवार यांची माहिती
नाशिक : पर्यटकांना धोक्याच्या ठिकाणी न जाण्याची सूचना; पूल, जाहिरात फलकांचे परीक्षण आवश्यक, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
डेटींग ॲपवरून डॉक्टरचा लैंगिक छळ, बळजबरीने गर्भपात आणि फोटो वायरल करण्याची धमकी
मुंबई आमची म्हणणाऱ्यांनी मराठी माणसासाठी काय केले? बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
टायटन, फास्ट्रॅक ब्रँडची बनावटी घड्याळे भिवंडीत; दुकान मालकाविरोधात गुन्हा
वसईत जलतरण तलावाचे काम धीम्या गतीने , जलतरणपटुंची गैरसोय
पदवी प्रवेश प्रक्रिया २७ जूनपर्यंत पूर्ण करा, रिक्त जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचना
मिरा भाईंदरमध्ये मोकाट श्वानाचे आणि मांजरीचे लसीकरण
शरद पवारांची मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत भूमिका; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं…”
महाराष्ट्र सदनशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, भुजबळ यांचे सीए दोषमुक्त
तर ठाण्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल, बेकायदा बांधकामावरून उच्च न्यायालयाकडून ठाणे महापालिकेची पुन्हा कानउघाडणी
वसई : खोदलेले रस्ते धोकादायक; पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीची कामे न झाल्याने अपघाताचा धोका वाढला
मुंबई : प्राण्यांसंदर्भात पालिकेची मार्गदर्शक तत्वे; भटके श्वान आणि मांजरीना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणे दंडनीय गुन्हा
मुंबई : उदयोन्मुख तरूण इंग्रजी लेखिकेची शोकांतिका, संध्या पाठकच्या पार्थिवावर अंत्यसंत्कार
पालघर : पंढरपूर करिता जिल्ह्यातून ५५ बस धावणार; आषाढीनिमित्त एसटीचे विशेष नियोजन
Maruti Chitampalli : “वन्यप्राणी कधीच हल्ला करीत नसत, कारण…”; चितमपल्लींच्या आठवणीतील शहरपक्षी, चारोळी बाग….
Pune Palkhi 2025: पालखी सोहळा कोणत्या रस्त्याने पुणे शहरात दाखल होणार?
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी रस्त्याने शहरात दाखल होणार आहे.
Pune Roads Palkhi Sohala: पुण्यातील प्रमुख रस्ते आज वाहतुकीस बंद
पालखी सोहळ्यात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. पालखी सोहळ्याचे आगमनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहे. शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. शुक्रवारी सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत रेंजहिल चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता – फर्ग्युसन रस्ता), गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छत्रपती शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता (टिळक चौक ते संत कबीर चौक), शनिपार चौक ते सेवासदन चौक, नेहरू चौक ते सोन्या मारुती चौक, गणेश रस्त्यावरील देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, नेहरू रस्त्यावरील रामाेशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, डाॅ. संदीप भाजीभाकरे, तसेच पोलीस निरीक्षक (वाहतूक नियोजन) सुनील गवळी उपस्थित होते.
पालखीच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज, पालखी मार्गावर पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, आरोग्य कक्षांची सुविधा
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते आणि सर्वसामान्य पुणेकरांनी तयारी केली आहे.
ठाणे – घोडबंदर – भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता… एल अँड टीकडून अद्यापही आर्थिक अंदाज तपशील सादर नाही…
मोकळी मैदाने ‘झोपु’साठी ! राज्याचे धोरण उच्च न्यायालयास मान्य; ३५ टक्के हरितक्षेत्राची अट
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे