India Pakistan Tension ६ आणि ७ मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईला उत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे नापाक इरादे जगाने पाहिले. ड्रोन हल्ले करणं, तोफांचा मारा, गोळीबार हे करणं पाकिस्तानने थांबवलं नाही. त्यामुळे भारताने त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी म्हणजेच १० मे च्या दिवशी संध्याकाळी ५ च्या दरमम्यान शस्त्रविराम करण्यास दोन्ही देशांनी तयारी दाखवल्याची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनीही ही माहिती दिली. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही लष्करी कारवाई थांबवण्याबाबत पाकिस्तानने सामंजस्य करार केल्याचं स्पष्ट केलं. मात्र भारत दहशतवादाविरोधात कुठलीही कारवाई सहन करणार नाही हेदेखील पाकिस्तानला ठणकावलं. दोन्ही देशातला संघर्ष थांबल्याची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या तासांतच पाकिस्तानची आगळीक पुन्हा समोर आली. भारताच्या सीमेवर काही ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली होती. शस्त्रविरामानंतर पाकिस्तानची आगळीक समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तानला आता सूचक इशारा दिला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानच्या कुरापतींबाबत रात्री ११ वाजता पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. पाकिस्तानने परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, असं म्हणत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे.पाहुयात याच संदर्भातले अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

India Pakistan Tensions Live Updates : शस्त्रविरामानंतर काही तासांतच पाकिस्तानची पुन्हा आगळीक, भारताचा पाकिस्तानला सूचक इशारा, यासह महत्त्वाच्या बातम्या 

06:43 (IST) 12 May 2025

पाकिस्तानी लष्कराला तडाखा! १०० दहशतवाद्यांचाही खात्मा झाल्याची सैन्यदलाची माहिती

पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किमान १०० दहशतवादी आणि पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती लष्करी संचालनाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईला दिलेल्या प्रत्युत्तरात त्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. यापुढे कोणतीही आगळीक झाली, तर त्याला अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्यात येईल, अशा शब्दांत पाकिस्तानला खडसावण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

06:14 (IST) 12 May 2025

“भारतीय सैन्याच्या कारवाईची झलक पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली,” राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाच्या दुसऱ्या दिवशी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांची ताकद रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात जाणवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर काही वेळातच लखनौमधील उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमधील ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात राजनाथ सिंह व्हर्च्युअल पद्धतीने बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की भारत सीमेच्या दोन्ही बाजूंनी दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई करेल.”

सविस्तर वाचा

05:55 (IST) 12 May 2025

India Pakistan Ceasefire: वॉशिंग्टन डीसी ते इस्लामाबाद व्हाया दिल्ली…१० दिवसांत कशी फिरली सूत्रं? भारत-पाकिस्तान शस्त्रविराम कसा साध्य झाला?

US Role in Ind-Pak Ceasfire: भारत व पाकिस्तानदरम्यान शस्त्रविराम झाल्यानंतर त्याची घोषणा अमेरिकेने केल्यानंतर त्यावरून चर्चेला उधाण आलं आहे. …अधिक वाचा
05:10 (IST) 12 May 2025

भारत-पाकिस्तान भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांनंतर आता सीमांवर शांतता परतली आहे. जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांनंतर काही दिवसांपासून सुरू असलेल्या हवाई सायरन आणि ब्लॅकआउटनंतर रविवारी भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर सर्व काही शांत होते.

05:01 (IST) 12 May 2025

Asaduddin Owaisi on Vikram Misri : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चर्चेत आलेल्या विक्रम मिस्रींना ट्रोल करणार्‍यांना ओवेसींनी सुनावलं; म्हणाले, “सभ्य, प्रामाणिक…”

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना ट्रोल करणाऱ्यांना असदुद्दीन ओवेसी यांनी सुनावलं आहे. …सविस्तर वाचा
03:27 (IST) 12 May 2025

Operation Sindoor : ‘जर तिकडून गोळी चालली तर इकडून…’, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोदींनी काय सूचना दिल्या होत्या?

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ९ मे रोजी फोनवरून संवाद साधत दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते. …अधिक वाचा
01:51 (IST) 12 May 2025

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चं मोठं यश, कंदाहार विमान अपहरण अन् पुलवामा हल्ल्यातील ३ दहशतवाद्यांचा खात्मा, भारताने जाहीर केली नावं

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेल्या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. …वाचा सविस्तर
00:49 (IST) 12 May 2025

India Pakistan News : “पाकिस्तानचा असंवेदनशीलपणा, लाहोर बेसवरुन हवाई हल्ला केला आणि…”; एअर मार्शल ए के भारती नेमकं काय म्हणाले?

India Pakistan News ऑपरेशन सिंदूर राबवून आम्ही पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं आहे असं एअर मार्शल एके भारती म्हटलं आहे. …अधिक वाचा
23:45 (IST) 11 May 2025

Operation Sindoor : “LOC वर पाकिस्तानचे ३५ सैनिक ठार”, भारताने दिलेल्या प्रत्युत्तराबाबत DGMO राजीव घई यांची माहिती

नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तरात किमान ३५ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाले. …सविस्तर बातमी
22:20 (IST) 11 May 2025

Indian Army DGMO : ‘ऑपरेशन सिंदूर’ने काय साध्य केलं? सैन्य दलाच्या प्रमुखांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “दहशतवादी तळ…”

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळांना कशा प्रकारे उद्ध्वस्त करण्यात आलं? तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली माहिती. …सविस्तर बातमी
21:17 (IST) 11 May 2025

Video: “पाकिस्तानने आता काही करण्याची हिंमत केली, तर त्यांना चांगलंच माहितीये की…”, नौदलाच्या DGMO नी दिला थेट इशारा!

Ceasefire Violation by Pakistan: शस्त्रविरामावर सहमती केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानी लष्करानं त्याचं उल्लंघन केलं. यानंतर आता भारतीय लष्कराच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. …सविस्तर वाचा
20:39 (IST) 11 May 2025
आमचे ध्येय हे फक्त दहशतवाद्यांच्या लक्ष्य करणे होते – एअर मार्शल एके भारती

ऑपरेशन सिंदूर बद्दल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल एके भारती म्हणाले की, सैन्याचे ध्येय हे दहशतवादी आणि त्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे होते. दुसऱ्या कोणत्याही पायाभूत सुविधा , विशेषतः पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी इमारती लक्ष्य नव्हत्या आणि अगदी अचूक पद्धतीने हे ध्येय साध्य करण्यात आले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्य फरक हा होता की भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले तर त्याबदल्यात पाकिस्तानी लष्कराने आपल्या नागरिकांवर आणि लष्कराच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केले. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने लाहोर आणि गुजरांवाला जवळच्या रडार यंत्रणेवर हल्ला केला.

20:33 (IST) 11 May 2025

भारताने पाकिस्तानचे एअर बेस, कमांड सेंटर्स, लष्करी तळ आणि एअर डिफेन्स सिस्टम्सवर हल्ले केले – एअर मार्शल एके भारती

एअर मार्शल एके भारती यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानच्या महत्त्वांच्या लष्करी मालमत्तांवर हल्ला केला. ज्यामध्ये पश्चिमी आघाडीवरील एअर बेस, कमांड सेंटर्स, लष्करी पायाभूत सुविधा आणि एअर डिफेन्स सिस्टम्स यांचा समावेश होता. ज्या तळांवर आपण हल्ला केला त्यामध्ये इस्लामाबाद मध्ये असलेला चकलाला आणि रफिकी यांचा समावेश होता.

20:22 (IST) 11 May 2025

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद यांचा समावेश

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारख्या दहशतवाद्यांचा समावाश होता. तसते लष्कराकडून पत्रकार परिषदेत ७ मे रोजी भारताने नष्ट केलेल्या दहशतवादी तळांचे आधीचे आणि नंतरचे फोटो देखील दाखवण्यात आले.

20:18 (IST) 11 May 2025

ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळांना ठरवून लक्ष्य केले – डीजीएमओ

डीजीएमओ लेफ्टनंच जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ७ मे रोजी ओळख पटवण्यात आलेल्या ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. तसेच त्यांनी सांगितले की भारताने केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

19:53 (IST) 11 May 2025

सीमेवर पाकिस्तानी लष्कराचे ३५ ते ४० जवान ठार, एअर मार्शल एके भारती यांनी दिली माहिती

भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलाने आज पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी एअर मार्शल एके भारती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमधील सघर्षादरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यातील ३५-४० जवान मारले गेले. डीजीएमओ लेफ्टनंट राजीव घई म्हणाले की, भारतीय लष्कराने पूर्णपणे आश्चर्यचकित करणारे यश मिळवले. तसेच त्यांनी भारतीय लष्कराच्या कारवाईत ९ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असेही सांगितले.

19:01 (IST) 11 May 2025

Operation Sindoor : नऊ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार; ऑपरेशन सिंदूरबद्दाल भारतीय लष्कराने दिली सविस्तर माहिती

ऑपरेशन सिंदूर बद्दल लष्कराच्या तिन्ही दलांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. …सविस्तर बातमी
17:47 (IST) 11 May 2025

Rahim Yar Khan Airbase : भारताच्या एअर स्ट्राईकचा परिणाम; पाकिस्तानमधील रहीम यार खान एअरबसवरील एकमेव धावपट्टी आठवड्याभरासाठी बंद

Rahim Yar Khan airbase’s sole runway : हा NOTAM शनिवारी (१० मे) पाकिस्तान वेळेनुसार दुपारी ४ वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता) लागू झाला आणि १८ मे रोजी पाकिस्तान वेळेनुसार सकाळी ४:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार ५:२९ वाजता) लागू राहील. …अधिक वाचा
17:30 (IST) 11 May 2025

१९७१ ची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे-शशी थरुर

“१९७१ ची परिस्थिती वेगळी होती आणि २०२५ ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सद्यस्थितीत भारताने शांतता आणि स्थैर्य यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. भारताने यावेळी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी कारवाई केली. ही कारवाई आता झाली आहे. दहशतवाद्यांना उत्तर दिलं गेलं आहे. भारताने आता आर्थिक प्रगती आणि नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. दीर्घ काळासाठी युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीत अडकून पडणं योग्य नसेल.” असं शशी थरुर म्हणाले आहेत.

16:36 (IST) 11 May 2025

“भारतीय सैन्याच्या कारवाईची झलक पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली,” ब्रह्मोस उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

India-Pakistan Tensions: संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने धैर्य आणि शौर्य तसेच संयम दाखवत अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर हल्ला करून योग्य प्रत्युत्तर दिले आहे. …अधिक वाचा
16:35 (IST) 11 May 2025

ऑपरेशन सिंदूरबाबत आणि शस्त्रविरामाबाबत विशेष अधिवेशन बोलवा-राहुल गांधींची मागणी

ऑपरेशन सिंदूरबाबत आणि शस्त्रविरामाबाबत विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्र विरामाबाबतचं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी का केलं? असाही सवाल राहुल गांधींनीही केला आहे. एक पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. आता याबाबत काय निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

16:29 (IST) 11 May 2025

पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही-छगन भुजबळ

पाकिस्तान काही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही. कधी जबाबदारी घेतात कधी नाकारतात. त्यांना जो धडा शिकवायचा तो आपण शिकवला आहे. लवकर काही कुरापती काढतील असं वाटत नाही. कारण दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचे म्होरके संपले आहेत. पाकिस्तान डुबलेला देश आहे. त्यांचं आणखी काय नुकसान होणार? आपला देश वेगाने पुढे जाणारा देश आहे. शस्त्रविराम होत असेल तर चांगली गोष्ट आहे. ऑपरेशन सिंदूरमधून आपण दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. योग्य वेळी संघर्ष थांबला तर दोन्ही देशांकडचा फायदा असतो. अमेरिकेने सुरुवातीला सांगितलं की आम्ही मधे पडणार नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये अघोषित युद्धच होतं. अमेरिकेने दोन्ही देशांशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रविरामही जाहीर केला. पण दोन तासांनी पाकिस्तानने आगळीक केली. सकाळपासून अशा काही गोष्टी अद्याप तरी घडलेल्या नाहीत. जम्मू आणि काश्मीर या ठिकाणीही परिस्थिती पूर्ववत होते आहे. ही चांगली गोष्ट आहे. आपल्या लोकांवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा पुरेपूर बदला भारताने घेतला आहे. असं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

13:24 (IST) 11 May 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अजित डोवाल आणि केंद्रीय मंत्र्यासह महत्त्वाची बैठक

शस्त्रविरामानंतर पाकिस्तानने आगळीक केली होती. भारताने त्यांना जशास तसं उत्तर दिलं. भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव संपलेला नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत काय घडलं त्याचा तपशील समोर येणं बाकी आहे. दरम्यान या बैठकीत राजनाथ सिंह, अजित डोवाल, एस. जयशंकर यांची उपस्थिती होती.

13:09 (IST) 11 May 2025

सायरनचे आवाज, तोफगोळ्यांचा मारा थंडावले; जम्मू-पंजाब-राजस्थानच्या सीमावर्ती भागात आता स्थिती काय?

७ मे पासून भारत पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांकडून एकमेकांवर लष्करी कारवाया केल्या जात होत्या. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यान मोठा संघर्ष सुरू होता. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांनी काही अटींवर शस्त्रविराम घेतला आहे. शस्त्रविरामानंतरही पाकिस्तानने जम्मूतील काही भागात हल्ले केल्याचे वृत्त होते. शनिवारी रात्री रहिवाशांनी स्वेच्छेने रात्रभर ब्लॅकआऊट पुकारला होता. पण आज सर्व सीमावर्ती भागात शांतता आहे. …वाचा सविस्तर
11:10 (IST) 11 May 2025

India-Pakistan: पाकिस्तानच्या अमानुष हल्ल्यात गेले ४ शाळकरी मुलांचे प्राण; मृतांमध्ये दोन भावंडांचाही समावेश

India-Pakistan News: पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू आणि काश्मीरच्या पूंच्छ जिल्ह्यातील डुंगस परिसरातील एका कुटुंबातील १४ वर्षीय झोया खान आणि तिचा भाऊ १२ वर्षीय झैन खान यांचा मृत्यू झाला. …सविस्तर बातमी
11:01 (IST) 11 May 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊत यांची जोरदार टीका

पाकिस्तानला कायमची धडा शिकवण्याची संधी होती तरीही देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली आणि सैन्याचं तसंच देशाचं मनोबल उद्ध्वस्त केलं. कुणासाठी तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी. त्यांचा काय संबंध आहे आपल्या देशाशी? सार्वभौम राष्ट्राने हा निर्णय का घेतला? 26/11 चा हल्ला झाल्यानंतर मोदीच म्हणत होते की देशाचे पंतप्रधान ओबामांकडे जाऊन रडत आहेत. आता मोदी आणि अमित शाह ट्रम्पकडे जाऊन रडत आहेत का? सिंदूर वगैरे सगळं राजकारण आहे. २६ पर्यटकांचा बळी गेला, त्यांचा अपमान मोदींनी केला आहे. टोकाला जाऊन पोहचलो असताना अवसानघातकी निर्णय मोदींनी घेतला. कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला. हल्ल्यांमध्ये नुकसान भारताचं झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा काय संबंध? जर त्यांची मध्यस्थी जगात मानली जाते तर मग इस्रायलचं युद्ध का थांबवलं नाही? मोदींचे मित्र ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दिला नाही. असं संजय राऊत म्हणाले आणि टीका केली आहे.

09:33 (IST) 11 May 2025

BrahMos: पाकिस्तानी हवाई तळांवर भारताकडून ब्रह्मोसचा मारा? विध्वंसानंतर पाकिस्तानने मान्य केला शस्त्रविराम

BrahMos USE: पाकिस्तानी सैन्य भारतीय नागरिक आणि लष्करी तळांना सतत लक्ष्य करत होते. प्रत्युत्तराच्या हल्ल्यात, भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या शस्त्रागारात उपलब्ध असलेल्या अधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्रे आणि आत्मघाती ड्रोन्स यासारख्या शस्त्रांचा वापर केला आहे. …सविस्तर वाचा
08:50 (IST) 11 May 2025

India-Pakistan: “निवृत्तीस तीन महिने उरले असताना सुभेदार मेजर शहीद; स्वतःहून निवडले होते जम्मू आणि काश्मीरमधील पोस्टिंग

India-Pakistan News: पाकिस्तानने सातत्याने भारताच्या सीमेलगताच्या शहरांवर ड्रोनसह विविध माध्यमांतून हल्ले करण्याचे प्रयत्न केले. पण, भारतीय लष्कराने हे सर्व हल्ले परातवून लावले. …सविस्तर वाचा
08:45 (IST) 11 May 2025

Mumbai On High Alert: मुंबईभोवती सुरक्षा वाढवली; समुद्रात नौदलाचा ताफा तैनात

Mumbai News: २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सर्व बोटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची दररोज तपासणी करणे खूप महत्वाचे आहे, असे या अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे. …सविस्तर वाचा
08:39 (IST) 11 May 2025

इंदिरा गांधी होणं सोपं नाही, काँग्रेसची पोस्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावजन्य परिस्थितीत भारताने ७ मे रोजी मध्यरात्री एअरस्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ले करण्यात आले. त्यामध्ये, १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सीमारेषेवरील गोळीबार आणि लष्करी कारवाया थांबवण्यात आल्या आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन युद्धविराम झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम झाला. एकीकडे भारताने पाकिस्तान नरमला शस्त्रविराम झाला म्हणून मोदी सरकारचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या १९७१ च्या आठवणी जागवल्या जात आहेत. इंदिरा गांधी होणं सोपं नाही असं म्हणत काँग्रेसकडून इंदिरा गांधीचे जुने व्हिडिओ व फोटो शेअर केले जात आहेत.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काय काय सांगितलं? (फोटो-ANI)

६ आणि ७ मेच्या रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाईला उत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे नापाक इरादे जगाने पाहिले. ड्रोन हल्ले करणं, तोफांचा मारा, गोळीबार हे करणं पाकिस्तानने थांबवलं नाही. त्यामुळे भारताने त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी म्हणजेच १० मे च्या दिवशी संध्याकाळी ५ च्या दरमम्यान शस्त्रविराम करण्यास दोन्ही देशांनी तयारी दाखवल्याची पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनीही ही माहिती दिली. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही लष्करी कारवाई थांबवण्याबाबत पाकिस्तानने सामंजस्य करार केल्याचं स्पष्ट केलं. मात्र भारत दहशतवादाविरोधात कुठलीही कारवाई सहन करणार नाही हेदेखील पाकिस्तानला ठणकावलं. दोन्ही देशातला संघर्ष थांबल्याची माहिती समोर आल्यानंतर अवघ्या तासांतच पाकिस्तानची आगळीक पुन्हा समोर आली. भारताच्या सीमेवर काही ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली होती. शस्त्रविरामानंतर पाकिस्तानची आगळीक समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तानला आता सूचक इशारा दिला आहे.