India Operation Sindoor Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.

मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आहे. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आलं आहे.

Live Updates

India Airstrike on Pakistan: पहलगामचा बदला घेतला, भारताचा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक!

11:04 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: अजूनही नव्या घडमोडी घडत आहेत – भारतीय लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती

अजूनही ही परिस्थिती बदलत आहे. नव्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे आम्ही आत्ता प्रश्नोत्तरं घेऊ शकणार नाही. पण आम्ही लवकरच यासंदर्भात पुन्हा तुमच्यासमोर येऊन माहिती देऊ – भारतीय लष्कराची माहिती

11:02 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये कुठल्या तळांना लक्ष्य केलं गेलं? कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली सविस्तर माहिती

सवाईनाला ते भागलपूरपर्यंत दहशतवादी तळ पसरलेले होते. गुप्तचर माहितीच्या आधारे हे लक्ष्य निश्चित करण्यात आले. त्यातून सामान्य नागरिकांना व निवासी भागांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली गेली.

सगळ्यात आधी सवाईनाला कॅम्प मुझफ्फराबाद हा तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. इथूनच काही हल्ल्यांमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळालं होतं.

सय्यदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद हा जैश ए मोहम्मदचा तळ आहे. इथे दहशतवादी हत्यारं आणि दारूगोळा ठेवत होते.

गुलपूर कॅम्प, कोटली – हा एलओसीपासून ३० किलोमीटर दूर होता. लष्कर ए तय्यबाचा कॅम्प होता. राजौरी आणि पूंछमध्ये या कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांकडून कारवाया करण्यात आल्या होत्या.

बरनाला कॅम्प. भिमबर – हा एलओसीपासून ९ किमी लांब आहे. इथे हत्यार, आयईडी यांचं प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिलं जात होतं.

अब्बास कॅम्प, कोटली – हा एलओसीपासून १३ किमी लांब आहे. लष्कर ए तय्यबाचा फिदायीन इथे तयार होत होता. १५ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची या कॅम्पची क्षमता होती.

पाकिस्तानच्या हद्दीतील टार्गेट

सर्जल कॅम्प. सियालकोट – हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे.

मेहमुला जाया कॅम्प, सियालकोट – हा १८ ते १२ कमी आंतरराष्ट्रीय सीमेपासून लांब होता. हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता. कठवा जम्मूमध्ये दहशत पसरवण्यासाठीचं केंद्र होतं. पठाणकोट एअर बेसवर झालेला हल्ला याच कॅम्पमध्ये आखण्यात आला होता.

मरकस ताएबा मुरीदके – हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किमी लांब आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचे दहशतवादी इथेच प्रशिक्षित झाला होता. अजमल कसाब व डेविड हेडलीलाही इथेच प्रशिक्षण दिलं गेलं होतं.

मरकझ सुभानअल्लाह, भागलपूर – हा तळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किमी लांब आहे. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथे रिक्रुटमेंट, प्रशिक्षण दिलं जात होतं. दहशतवाद्यांचे महत्त्वाचे नेते इथे येत होते.

10:53 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर का सुरू करण्यात आलं? कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती

सवाईनाला ते भागलपूरपर्यंत दहशतवादी तळ पसरलेले होते. गुप्तचर माहितीच्या आधारे हे लक्ष्य निश्चित करण्यात आले. त्यातून सामान्य नागरिकांना व निवासी भागांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली गेली – कर्नल सोफिया कुरेशी

10:53 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर का सुरू करण्यात आलं? कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती

१ वाजून ५ मिनिटांपासून दीड वाजेपर्यंत लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. २२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी राबवलं गेलं. यात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानात गेल्या ३ दशकांमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठीची व्यवस्था उभारली गेली. यात रिक्रुटमेंट, प्रशिक्षण सुविधा व लाँच पॅड यांचा समावेश होता. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे तळ पसरलेले आहेत – कर्नल सोफिया कुरेशी

10:45 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरुवात…

२५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केलं होतं. ज्यात दहशतवाद्यांच्या या कृत्यामागील हस्त, आयोजक, आर्थिक पाठबळ देणारे आणि मदत करणाऱ्यांना जबाबदार धरून त्यांना शासन करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला होता. भारताच्या आजच्या कारवाईकडे याच दृष्टीने पाहिलं जायला हवं – भारतीय लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती

10:44 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरुवात…

आज सकाळी भारतानं दहशतवादी हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी, ते थांबवण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. ही कारवाई नियोजित, केंद्रीत होती. भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली – भारतीय लष्कराची माहिती

10:41 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरुवात…

हल्ला करणारा गट लष्कर ए तय्यबाशी संबंधित आहे. पहलगाम हल्ल्यातील संदर्भानुसार पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध उघड झाले आहेत. प्रत्यक्षदर्शी व तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हा कट रचणाऱ्यांचीही माहिती मिळाली आहे. भारतातील दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा पाकिस्तानचा इतिहासही यातून अधोरेखित झाला आहे – भारतीय लष्कराची माहिती

10:39 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेला सुरुवात…

२२ एप्रिलला पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. २५ भारतीय व एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली. मुंबई हल्ल्यांनंतर हा भारतात झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या सामान्य नागरिकांच्या संख्येच्या दृष्टीने सगळ्यात भीषण घटना होती. पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या समोर डोक्यात गोळ्या घातल्या. शिवाय कुटुंबीयांना सांगण्यात आलं की तुम्ही परत जाऊन या हल्ल्याबाबत सगळ्यांना सांगा – पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती

10:31 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: थोड्याच वेळात लष्कराची पत्रकार परिषद

ऑपरेशन सिंदूर आणि हवाई दलाचा एअर स्ट्राईक यासंदर्भात माहिती देण्यासाठी थोड्याच वेळात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद सुरू होणार

10:06 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: मध्यरात्री नेमका कधी झाला एअर स्ट्राईक? किती वेळ चालला? काय काय घडलं रात्री? वाचा सविस्तर…

India Air strike Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर नेमकं कधी सुरू झालं? मध्यरात्री नेमकं काय घडलं? एअर स्ट्राईकनंतर सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काय केलं? …अधिक वाचा
09:27 (IST) 7 May 2025

Operation Sindoor Impact on Sensex: भारताच्या एअर स्ट्राईकचा सेन्सेक्सवर परिणाम

भारतीय हवाई दलानं पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय शेअर बाजारावर हा एअर स्ट्राईक व त्याअनुषंगाने निर्माण झालेल्या वातावरणाचे पडसाद दिसून येत आहेत. Sensex १०० अंकांनी खाली आला असून निफ्टीही २४०० अंकांपेक्षा खाली घसरला आहे.

09:03 (IST) 7 May 2025

Rahul Gandhi on Air Strike: राहुल गांधींची एअर स्ट्राईकवर पहिली प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईकनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, म्हणाले, “आपल्या लष्कराचा मला अभिमान आहे, जय हिंद!”

08:57 (IST) 7 May 2025

Operation Sindoor : असदुद्दीन ओवेसी एअर स्ट्राईकबद्दल म्हणाले, “सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर…”

Asaduddin Owaisi on Operation Sindoor : असदुद्दीन ओवेसी यांनी एअर स्ट्राईकबद्दल बोलताना पहलगाम घटनेचा उल्लेख केला आहे. …वाचा सविस्तर
08:41 (IST) 7 May 2025

“Operation Sindoor हा माझ्या आईसारख्या पीडित महिलांचा सन्मान”, पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाकडून पंतप्रधानांचे आभार

Operation Sindoor Reactions: भारताच्या या लष्करी कारवाईनंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाने प्रतिक्रिया देत, या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. …सविस्तर बातमी
08:32 (IST) 7 May 2025

Sharad Pawar on Operation Sindoor: शरद पवारांची एअर स्ट्राईकवर पहिली प्रतिक्रिया

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष

08:28 (IST) 7 May 2025

S Jaishankar on Air Strike: परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया

“जगाला कळलं पाहिजे की भारत दहशतवादाला कदापि सहन करणार नाही”

08:20 (IST) 7 May 2025

“मी आशा करतो की हे सगळं…”, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताच्या एअर स्ट्राईकवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून…”

India Airstrike Operation Sindoor: भारतानं ऑपरेशन सिंदूर मोहिमेंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्रईक केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. …अधिक वाचा
08:04 (IST) 7 May 2025

Operation Sindoor नंतर विमान कंपन्यांचा महत्त्वाचा निर्णय; एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने रद्द केली उड्डाणे

India Pakistan War Tensions: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री पीओके आणि पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांना लक्ष्य केले. …सविस्तर वाचा
07:58 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: ऑपरेशन सिंदूरवर कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाची प्रतिक्रिया…

पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांचा मुलगा कुणाल गणबोटे याची प्रतिक्रिया…

07:52 (IST) 7 May 2025

Donald Trump on Operation Sindoor: भारताच्या एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

“ही एक लाजिरवाणी बाब आहे. आम्हाला आत्ताच या एअर स्ट्राईकसंदर्भात माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काहीतरी घडणार हे लोकांना माहिती होतं. भारत व पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून हा संघर्ष चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की हे अनेक वर्षं नव्हे तर शतकांपासून चालू आहे. आता मी आशा करतो की हे सगळं लवकर संपावं”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

07:33 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या हवाई नियोजनात बदल

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं काही विमान उड्डाणं रद्द केली आहेत. त्यात जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगढ आणि राजकोट या ठिकाणी जाणारी व तिथून येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत हे बदल करण्यात आले असून त्यानंतरच्या नियोजनाबाबत नंतर माहिती दिली जाईल, असं एअर इंडियाच्या अधिकृत सोशल अकाऊंटवर सांगण्यात आलं आहे.

07:25 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी चर्चा

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेत ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य उत्तर आणि देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था यासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली जाणार आहे.

07:22 (IST) 7 May 2025

Mock Drill Amid Operation Sindoor: उत्तर प्रदेशमध्ये मॉक ड्रीलला सुरुवात

उत्तर प्रदेशमध्ये मॉक ड्रीलला सुरुवात करण्यात आली असून ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर काळजीपूर्वक ही मॉक ड्रील केली जात आहे.

07:21 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळावंर आपल्या सैन्याने केलेल्या टार्गेटेड हल्ल्याचं स्वागत करतो. पाकिस्तानला अशी अद्दल घडवली गेली पाहिजे की पुन्हा कधीही दुसरं पहलगाम होणार नाही. पाकिस्तानमधल्या दहशतवादी व्यवस्थेला पूर्णपणे नष्ट केलं गेलं पाहिजे. जय हिंद”, असं आपल्या पोस्टमध्ये ओवैसी यांनी म्हटलं आहे.

07:16 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: नेमका कोणत्या ठिकाणांवर भारतानं एअरस्ट्राईक केला?

भारतानं कोणत्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, याची यादी पीटीआयकडून देण्यात आली आहे.

07:10 (IST) 7 May 2025

Operation Sindoor: “ऑपरेशन सिंदूर ऐकताच माझ्या डोळ्यात…”, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्याचा संतोष जगदाळे यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

India Airstrike Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने समाधान व्यक्त केले आहे. …अधिक वाचा
07:09 (IST) 7 May 2025

भारतानं ऑपरेशन सिंदूर करताच पाकिस्तानचा थयथयाट; सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्करानं तिथेही गप्प केलं!

India Airstrike Operation Sindoor: भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताननंही सीमेवर गोळीबार सुरू केला आहे. …सविस्तर वाचा
07:00 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: शुभम द्विवेदी यांच्या पत्नीची हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने ऑपरेशन सिंदूर बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

06:47 (IST) 7 May 2025
India Airstrike on Pakistan: प्रगती जगदाळे यांची हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावणारे संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. “त्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आमच्या मुलींचं कुंकू पुसून टाकलं, त्याला हे भारताचं सडेतोड उत्तर आहे. या मोहिमेचं नाव ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी भारत सरकारचे मनापासून आभार मानते”, असं प्रगती जगदाळे यांनी म्हटलं आहे.

06:39 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: सकाळी १० वाजता भारतीय लष्कराची पत्रकार परिषद

सकाळी १० वाजता ऑपरेशन सिंदूर बाबत लष्कराची पत्रकार परिषद

India Airstrike on Pakistan: पहलगामचा बदला घेतला, भारताचा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक!