Maharashtra Budget Session 2024 , 27 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपले उपोषण असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. देशपातळीवर इंडिया आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे. खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. यासह जगभरातील सर्व घडामोडींची माहिती येथे वाचा एका क्लिकवर….

Live Updates

Interim Budget Session 2024 Updates : महाराष्ट्रासह देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

17:51 (IST) 27 Feb 2024
सांगली : खर्चिक नव्या योजनेऐवजी विद्यमान योजनेतून शुध्द व मुबलक पाणी देण्याचे प्रयत्न

सांगली : कोट्यावधी खर्चाची नवीन योजना अंमलात आणण्याऐवजी कृष्णेतील पाण्यावर अद्यावत शुध्दीकरण प्रकल्प बसवून सांगलीकरांना शुध्द व मुबलक पाणी देण्याचा महापालिका कसोशीने प्रयत्न करत असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

वाचा सविस्तर…

17:45 (IST) 27 Feb 2024
अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. राज्याच्या सन २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी सहा लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी पुण्याला झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे.

वाचा सविस्तर…

16:52 (IST) 27 Feb 2024
पनवेल: क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची रिक्षा कलंडल्याने ९ वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू

पनवेल ः खारघर येथील अश्वमेध महायज्ञावरुन घरी परतण्यासाठी तीन आसनी रिक्षातून प्रवास करताना झालेल्या अपघातामध्ये एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी पावणेदोन वाजता पेठपाडा मेट्रो स्थानकाजवळ घडली.

सविस्तर वाचा

15:58 (IST) 27 Feb 2024
तस्कर अली असगर शिराजी प्रकरण: अब्दू रोझिक ईडी कार्यालयात दाखल

मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अमली पदार्थ तस्कर अली असगर शिराजीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी ‘बिग बॉस’फेस अब्दू रोझिकला समन्स बजावले होते. त्यानुसार तो मंगळवारी ईडी कार्यालयात दाखल झाला. साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. यापूर्वी याच प्रकरणात अभिनेत शिव ठाकरेचाही ईडीने जबाब नोंदवाल होता.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 27 Feb 2024
पुण्यातील रोपवाटिकेत गावठी दारूचा अड्डा

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील ऊरळी कांचन परिसरात एका रोपवाटिकेत गावठी दारू तयार करण्यात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी रोपवाटिकेत छापा टाकून साडेनऊ हजार लिटर गावठी दारू, रसायन असा सहा लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाचा सविस्तर…

15:17 (IST) 27 Feb 2024
खांदेश्वर येथे आठ वर्षांच्या बालकावर अत्याचार

पनवेल ः खांदेश्वर वसाहतीमध्ये एका आठ वर्षाच्या बालकावर अत्याचार झाला आहे. इमारतीचा पत्ता सांगण्याच्या बहाण्याने घरापासून लांब घेऊन जाऊन इमारतीच्या छतावर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली असून पोलीसांनी तातडीने संशयीत आरोपीला अटक केली.

सविस्तर वाचा

15:15 (IST) 27 Feb 2024
पनवेल: कंत्राटदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

पनवेल पनवेल महापालिकेची विविध कंत्राटे मिळविणा-या एका कंत्राटदारावर पालिका प्रशासनाने सोमवारी पनवेल शहर  पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या कंत्राटदार कंपनीचे नाव श्रीनाथ इंजिनीयरींग कंपनी असे आहे.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल – अजित पवार

15:03 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates: अजित पवारांचा विरोधकांना टोला!

अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा विचार करायला हवा. कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचं तर प्रकाश पेरा आपल्या भोवती, दिव्याने दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुकू नका. भलेपणाचे कार्य उगवता उगाच टीका करू नका – अजित पवार

15:02 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

महसूली तूट मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरलं आहे. २०२४-२५ ची राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपये आहे – अजित पवार

15:01 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

२०२४-२५ मध्ये एकूण खर्चासाठी ६ लाख ५५२ कोटींची तरतूद प्रस्तावित. महसूल जमा ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी, महसूली खर्च ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये, परिणामी ९ हजार ७३४ कोटींची महसूली तूट अपेक्षित आहे – अजित पवार

15:00 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटींचा खर्च प्रस्तावित. हा खर्च मागील वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांनी जास्त आहे. वार्षिक योजना २०२४-२५ कार्यक्रम खर्चासाठी १ लाख ९२ हजार कोटींचा निधी प्रस्तावित. त्यात अनुसूचित जाती उपाययोजनेच्या १५ हजार ८९३ कोटी रुपये व आदिवासी विकास योजनांचा १५ हजार ३०७ कोटींचा निधी प्रस्तावित – अजित पवार

14:59 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

गिरगावमधील मराठी भाषा संकुलाचं काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण केलं जाईल – अजित पवार

14:57 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून त्यांचं तिथे स्मारक केलं जाणार आहे. होता जीवा म्हणून वाचला शिवा, माहिती आहे का? – अजित पवार

14:54 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

अर्थ विभागासाठी २०८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद – अजित पवार

14:54 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्ती वेतन प्रतीमाह १० हजार रुपयांवरून दुप्पट म्हणजे २० हजार रुपये करण्यात आले आहे – अजित पवार

14:53 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

विधी व न्याय विभागासाठी ७५९ कोटी, गृह-पोलीस विभागास २२३७ कोटी तर उत्पादन शुल्क विभागास १५३ कोटींचा निधी प्रस्तावित – अजित पवार

14:52 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

सांस्कृतिक कार्य विभागासाठी ११८६ कोटी, पर्यटन विभागाला १९७३ कोटी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाला १३६७ कोटी तर महसूल विभागाला ४७४ कोटींचा निधी प्रस्तावित – अजित पवार

14:50 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

वरळीत आधुनिक कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार – अजित पवार

14:47 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतूद – अजित पवार

14:46 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत १० पट वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी १ कोटी, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येतील – अजित पवार

14:45 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

गृहनिर्माण विभागासाठी १३४७ कोटी, दिव्यांग कल्याण विभागास १५२६ कोटी, कामगार विभागास १७१ कोटी रुपये तर अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागास ५२६ कोटींचा निधी प्रस्तावित – अजित पवार

14:44 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७७ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे – अजित पवार

14:43 (IST) 27 Feb 2024
Gaganyaan Mission : राकेश शर्मानंतर कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार ? पंतप्रधान मोदींनी जाहिर केली चार नावे….

इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय अंतराळवीर स्बबळावर इस्रो अवकाशात पाठवणार आहे. यांची नावे जाहिर करण्यात आली आहेत.

वाचा सविस्तर….

14:42 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुदतकर्ज योजनांसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणारी हमी ३० कोटींवरून ५०० कोटी करण्यात आली आहे – अजित पवार

14:42 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान २ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय – अजित पवार

14:41 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार – अजित पवार

14:40 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

राज्यातील अंगणवाडी सेविकांची १४ हजार रिक्त पदं भरण्यात आली – अजित पवार

14:37 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी १८ हजार ८१६ कोटींचा निधी प्रस्तावित – अजित पवार

14:37 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था – आर्टी स्थापन केली जाणार आहे – अजित पवार

14:36 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

आदिवासी विकास विभागासाठी १५ हजार ३६० कोटींचा निधी प्रस्तावित – अजित पवार

14:35 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचं अर्थसहाय्य १ हजार रुपयांवरून १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे – अजित पवार

14:34 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळामार्फत उसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे – अजित पवार

14:33 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजारांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे – अजित पवार

14:33 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

वाशीम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक, ठाण्यातील अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता. जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी – अजित पवार

14:31 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

महिला व बाल कल्याण विकास विभागास ३१०७ कोटी रुपयांची तरतूद

14:30 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

महिलांना ‘पिंक रिक्षा’ उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवण्यात येत आहे – अजित पवार

14:28 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates: अजित पवारांची शायरी!

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

बिजली चमकती है, तो आकाश बदल देती है,

आंधी उठती है तो दिन रात बदलती है,

जब गरजती है नारीशक्ती, तो इतिहास बदल देती है

अजित पवार

14:26 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

राज्यात ११ मोठे, ८ मध्यम व २९ लघु सिंचन प्रकल्पांची कामे चालू – अजित पवार

14:25 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद – अजित पवार

14:25 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

राज्यात सध्या २०० सिंचन प्रकल्पांची कामं चालू – अजित पवार

14:24 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

मदत व पुनर्वस प्रकल्पासाठी ६६८ कोटी रुपयांची तरतूद

14:23 (IST) 27 Feb 2024
पिंपरी : बनावट नोटांची छपाई करणारी टोळी अटकेत; चीनमधून मागविला कागद

पिंपरी : चीनमधून ऑनलाइन पद्धतीने कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

वाचा सविस्तर…

14:22 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

ऊर्जा विभागासाठी ११ हजार ९३४ कोटींच्या निधीची तरतूद

14:21 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

राज्य सरकारचं ७ हजार मेगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य

14:21 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

वीज उपलब्ध नसलेल्या ३७ हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येतील – अजित पवार

14:20 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येईल. यात ८ लाख ५० हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येतील – अजित पवार

14:18 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी १५५५४ कोटींची तरतूद – अजित पवार

14:18 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास ३८७५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

14:17 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates:

सोलापूर धाराशीव मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ लाइव्ह