PM Modi Announced Four Astronauts For Gaganyaan Mission : इस्रोच्या आगामी महत्वकांक्षी मोहीमेतील एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यात केली आहे. गगनयान मोहीमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर स्बबळावर अवकाशात पाठवले जाणार आहेत. यामध्ये सुमारे सहा टन वजानाची अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. चार अंतराळवीरांना सामवण्याची क्षमता या यानाची असेल. हे अवकाश यान पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालेल असे गगनयान मोहीमेच्या पहिल्या समानवी मोहीमेचे नियोजन असणार आहे.

तेव्हा या अवकाश यानातून अवकाशात जात पृथ्वी भ्रमंती करणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. प्रशांत बाळकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला अशी ही चार नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यात या चार अंतराळवीरांची नावे जाहिर करत त्यांना अंतिम तयारीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Elon musk and narendra modi
टेस्लाची भारतातील गुंतवणूक लांबली, एलॉन मस्क यांनी दौरा पुढे ढकलला! नव्या दौऱ्याबाबत दिले संकेत
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!

हेही वाचा… भारतीय अंतराळवीराचे २०४० ला चंद्रावर पाऊल? इस्रोचे अध्यक्ष स्पष्टच म्हणाले….

हे चारही भारतीय वायू दलाचे अधिकारी आहेत. बंगळूरु इथे अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी खास सुविधा तयार करण्यात आल्या आहे. एवढंच नाही तर रशियामध्येही या चार जणांनी काही काळ अंतराळवीरासाठी आणि अवकाश प्रवासासाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात अमेरिकेची नासाही इस्रोला मदत करणार आहे.

या आधी एप्रिल १९८४ ला राकेश शर्मा यांनी तेव्हाच्या सोव्हिएत रशियाच्या Soyuz T-11 या यानातून अवकाश भ्रमंती करत भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्यासह काही भारतीय वंशाच्या नागरिकांनी अन्य देशांचे प्रतिनिधी म्हणून अंतराळवीर म्हणून अवकाश वारी केली.

असं असलं तरी आत्तापर्यंत भारताने स्बळाबळावर भारतीय अंतराळवीर अकाशात पाठवला नव्हता. तेव्हा देशाचे हे चार अंतराळवीर २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला गगयनान मोहीमेतून अवकाश भ्रंमती करणार आहेत.

स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतरचा चौथा देश ठरेल. बलाढ्य युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, कॅनडा यांनाही हे अजुनतरी शक्य झालेलं नाही.