Maharashtra Monsoon Session 2025 Updates, 18 July : महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. तसेच गुरुवारी (१७ जुलै) विधीमंडळ परिसरात आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. आज अधिवेशनात याच मुद्द्याभोवती चर्चा होताना दिसत आहे. यासंबंधीच्या बातम्यांच्या आढावा आपण घेणार आहोत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. यावरून रायकीय वर्तुळातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today : महाराष्ट्रातील व देशभरातील महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

15:51 (IST) 18 Jul 2025

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठिशी घालण्याचा सरकारचा विचार नाही : फडणवीस

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी रिपोर्ट जेजे रुग्णालयातपाठवले. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं समोर आलं. तथापि, सरकार अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलं नाही. नेमलेल्या कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. कुणालाही पाठिशी घालण्याचा सरकारचा विचार नाही. न्या. अचलिया समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ.

15:50 (IST) 18 Jul 2025

महापारेषणच्या पडघा वीज उपक्रेंद्रातील बिघाडामुळे कल्याण, डोंबिवलीत वीज भारनियमन

कल्याण, डोंंबिवली शहर परिसराचा वीज पुरवठा चार ते पाच तास खंडित झाला होता. मुसळधार पाऊस, वादळाची परिस्थिती नसताना वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. …वाचा सविस्तर
15:48 (IST) 18 Jul 2025

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरण

देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रवीण गायकवाड तक्रार करायला तयार नव्हते. तरी पोलिसांनी कारवाई केली. नॉनबेलेबल कारवाई केली आहे. त्या आरोपींनी कधीतरी भाजपामध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी- काँग्रेसच्या बाबतीतही अशीच घटना यापूर्वी घडली आहे. कुणी तरी हल्ला केला म्हणजे संघटनेचा आदेश नसतो. विरोधकांची मनोवृत्ती संकुचित व्हायला लागली आहे. आम्हीही घटनेचा निषेध केला. त्या घटनेलास्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणणं चुकीचं आहे. चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेक झाली होती. तेव्हा मकोका मागणी होत होती. परंतु, पाटील म्हणाले मकोका नको.

15:46 (IST) 18 Jul 2025

कालच्या घटनेवर आत्मचिंतन आवश्यक – फडणवीस

कालच्या घटनेवर आत्मचिंतन आवश्यक आहे, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली राज्य सरकारची त्रिसुत्री. गुन्हेगारी पार्श्वभूमीची मंडळी विधानभवन परिसरात येणं योग्य नाही. विनाबिल्ला कुणीही आलं नाही पाहिजे हे माझ्याच लक्षात आलं आहे. टकलेवर ५, तर देशमुखवर ८ गुन्हे दाखल आहेत.

15:38 (IST) 18 Jul 2025

मकोका कारवाई केलेल्या गुंडाचा सहकारनगर पोलीस ठाण्यात गोंधळ; पोलिसांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारुन तोडफोड

ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. लोंढे, मयूर आरडे आणि आठ ते दहा साथीदारांनी तळजाई वसाहतीत दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती. …अधिक वाचा
15:29 (IST) 18 Jul 2025

तांत्रिक बिघाडाची माहिती देण्याऐवजी मध्य रेल्वे बिहारचे गुणगान गाण्यात व्यस्त…

हार्बर मार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडाची माहिती प्रवाशांना समाज माध्यमावर देण्याऐवजी मध्य रेल्वे बिहारच्या जाहिरातबाजीत व्यस्त असल्याचा आरोप होऊ लागला आहे. …सविस्तर बातमी
15:09 (IST) 18 Jul 2025

कल्याणमध्ये व्दारलीपाडा येथे गुरचरण जमिनीवरील बेकायदा चाळींवर कारवाई; भूमाफियावर ‘एमआरटीपी’चा गुन्हा

गुरचरण जमिनीवरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या जलकुंभाच्या जागेवर बांधकामे करणारा द्वारलीपाडा येथील भूमाफिया जगदीश पाटील यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्रांतिक नगररचना अधिनियमाने (एमआरटीपी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
15:03 (IST) 18 Jul 2025

“आमदार खुणावतो, गुंड येतात अन्…”, जितेंद्र आव्हाडांनी हाणामारीतील पाच आरोपींची नावं केली जाहीर

Jitendra Awhad : “आम्हाला फसवलं गेलं अशी माझ्या व जयंत पाटलांच्या मनात भावना”, जितेंद्र आव्हाड यांचे विधान …सविस्तर बातमी
15:01 (IST) 18 Jul 2025

मराठा आरक्षणाप्रकरणी आजपासून नव्याने सुनावणी

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून (१८ जुलै) विशेष पूर्णपीठापुढे नव्याने सुनावणी सुरू होणार आहे. दुपारी तीननंतर ही सुनावणी सुरू होणार आहे. …सविस्तर वाचा
15:00 (IST) 18 Jul 2025

चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्याचे आश्वासन…अभिनेत्री पूजा बॅनर्जीची दीड कोटींची फसवणूक

निर्माता श्याम डे यांच्या तक्रारीवरून मे महिन्यात गोवा पोलिसांनी पूजा बॅनर्जी आणि तिच्या पतीविरोधात फसवणूक, अपहरण, मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. …वाचा सविस्तर
14:43 (IST) 18 Jul 2025
“लोक म्हणतायत, सगळे आमदार माजलेत”, पडळकर-आव्हाड राड्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचा सभागृहात संताप

गुरुवारी विधानसभेत झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितलं. मात्र, आव्हाड यांनी यावेळी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखलं व मूळ विषयावर बोलण्यास सांगितलं. त्यानंतर विरोधी बाकांवरील आमदार म्हणाले, “आव्हाडांना बोलू द्या, त्यांचं बोलणं थांबवू नका.” यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “काल इथे जे काही झालं त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतीष्ठा गेली नाही. संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं आहे. हे काही बरं नाही. आज बाहेर एकट्या पडळकर यांना शिव्या पडत नाहीयेत. आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहे. लोक म्हणतायत की सगळे आमदार माजलेत.”

14:41 (IST) 18 Jul 2025

तब्बल २५ वर्षांनी म्हाडाचे घर मिळणार… पण मोजावे लागणार ५१-५२ लाख रुपये…

म्हाडाच्या कोकण मंडळाने चितळसर, मानपाडा येथील भूखंड विक्रीसाठी २००० साली अर्ज मागविले होते. …अधिक वाचा
14:19 (IST) 18 Jul 2025

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर वायरल करणाऱ्याला अटक… बहिणीला मारण्याची धमकी देऊन दुष्कृत्य

याप्रकरणी वाकोला पोलिसांनी बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. …अधिक वाचा
14:04 (IST) 18 Jul 2025

डोंबिवलीतील तीन तरूणांची रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून २३ लाखाची फसवणूक

फसवणूक झालेले नागरिक चंद्रकांत किसन सानप (४६) यांनी या फसवणूक प्रकरणी डोंबिवलीतील विशाल वसंत निवाते, अरविंद उर्फ नितीन मोरे आणि अन्य एक इसम यांच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. …अधिक वाचा
13:56 (IST) 18 Jul 2025

ॲप आधारित वाहन चालकाची आत्महत्या… संपकऱ्यांचे आमरण उपोषण

वाढते इंधन दर आणि कमी झालेल्या भाडे दरामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या नालासोपाऱ्यातील ॲप आधारित वाहनचालक सनोज सक्सेना (४५) याने आत्महत्या केली. …अधिक वाचा
13:55 (IST) 18 Jul 2025

शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला विधान भवनातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा

मंत्र्यांनी पास दिला नाही, सभापतींनी पास दिला नाही पण मी आलो असं कार्यकर्त्याने सांगितलं. कसा आलो ते विचारा नका असं त्याने सांगितलं. सभागृहात कोण येतंय माहिती नाही. अतिरेकी आला तरी प्रवेश मिळेल. आरोपी आत येतो, मारहाण करतो. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. तरी एका व्यक्तीवर कारवाई झाली नाही. सभापतींनी अधिकार दिला कारवाईचा. तू तरी राहशील नाहीतर मी राहीन असा संदेश जितेंद्र आव्हाड यांना आला आहे. सभागृहाची पत राखावी. बिहारचा उल्लेख करतात. महाराष्ट्राचं काय चाललंय हे सरकारने पाहावं. कायद्याचा धाक असला पाहिजे. लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झाला आहे. सगळ्या चर्चा बाजूला ठेवा आणि याप्रकरणी कारवाई करा.

शशिकांत शिंदे, (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) विधान परिषदेतून लाइव्ह

13:49 (IST) 18 Jul 2025

राज्यातील अनाथ विद्यार्थ्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाणार आहे. तसेच त्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात १००% सूट दिली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

तटकरे यांनी म्हटलं आहे की “महाराष्ट्रातील अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील असंख्य अनाथ विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी आधार देणारा हा निर्णय घेण्यास मोठे पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार.”

“याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, या निर्णयास अनुसरून राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये अनाथ बालकांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कात १००% सूट देण्यात येणार आहे. यासाठी सदर लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेले अनाथ विद्यार्थी या शैक्षणिक लाभासाठी पात्र असणार आहेत.”

13:37 (IST) 18 Jul 2025

विधान भवनातील राड्यावरून विधान परिषदेतलं वातावरण तापलं

विधिमंडळाची लोकांमध्ये झालेली प्रतिमा वेदनादायी आहे. वैयक्तिक द्वेष खालच्या पातळीवर उतरला आहे. सदनाच्या बाहेर जे होतं ते आता सदनाच्या आत होतं आहे.

-शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट

विधीमंडळात गुंडांना आणण्यासाठी कोण पासेस विकतं, पहिल्या गेटमधून येताना कोणाला किती रुपये द्यावे लागतात, दुसऱ्या गेटमध्ये किती द्यावे लागतात याची माहिती आम्ही देऊ.

-अनिल परब, शिवसेना उबाठा

पासची कार्यप्रणाली पीठासीन अधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या परवानगीने पासची प्रक्रिया चालते. पाससंदर्भात पुरावे द्या. चौकशी करण्याची सरकारची तयारी आहे. पुरावे द्या, नावं द्यावी, व्हीडिओ रेकॉर्डिंग द्या- सांगाल त्या यंत्रणेकडून चौकशी करण्याची तयारी- शंभूराज देसाई, मंत्री

13:33 (IST) 18 Jul 2025

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातही गुन्हा…पोलिसांच्या वाहनासमोर आव्हाडांचे ठिय्या आंदोलन

कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांनी त्याला विरोध केला. तासभर आव्हाड व त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीसमोर बसून होते. यावेळी कार्यकर्त्याला नेऊ देणार नाही, असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला होता. …वाचा सविस्तर
13:19 (IST) 18 Jul 2025

तुमच्या इशाऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी विधीमंडळात राडा केला? गोपीचंद पडळकर म्हणाले, “नितीन देशमुखला…”

Gopichand Padalkar on Vidhan Bhavan Clash : विधान भवन परिसरातील हाणामारीबाबत आमदार पडळकर म्हणाले, “काल जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. …सविस्तर बातमी
13:18 (IST) 18 Jul 2025

खोल समुद्रातील मासेमारीच्या नव्या हंगामाची लगबग; बंदरात मच्छीमारांची बोट दुरुस्ती सुरू

दोन महिन्यांपासून बंद असलेली मासेमारी सुरू होण्यासाठी काही दिवसच उरले असल्याने उरणच्या बंदरात मच्छीमारांची बोटी दुरुस्तीची लगबग सुरू झाली आहे. …वाचा सविस्तर
13:10 (IST) 18 Jul 2025

जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, कारण काय?

१७ जुलै रोजी मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात पोलिसांच्या कारसमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. पोलिसांनी कार अडवल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत आमदार आव्हाड यांच्याविरोधात मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारने पोलीस आव्हाडांच्या कार्यकर्त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. यावरून आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केला होता की ज्याने मारहाण केली आहे तो मोकाट फिरतोय आणि ज्याला मारहाण झालीय, त्याच्यावर तुम्ही कसला गुन्हा दाखल करताय? मार खाल्लेल्या माणसाला का अटक करताय?

12:58 (IST) 18 Jul 2025

विधिमंडळ हाणामारीप्रकरणी दोघांना अटक…मरिन ड्राईव्ह पोलिसांची कारवाई…

देखमुख यांच्या अटकेला आव्हाडांनी विरोध केला. यावेळी तासभर आव्हाड व त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीसमोर बसून होते. कार्यकर्त्याला नेऊ देणार नाही, असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला होता. …सविस्तर बातमी
12:57 (IST) 18 Jul 2025

विधान भवनातील हाणामारीचं प्रकरण राज्यपालांच्या कोर्टात

काँग्रेस आमदारांनी विधीमंडळात झालेल्या हाणामारीच्या घटनेचाही उल्लेख राज्यपालांसमोर केला. यावर वडेट्टीवार म्हणाले, कालची घटना ही विधानसभेच्या गौरवाला कलंक, राज्यपालांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहावे. काल जे काही घडलं ती सत्तेची मस्ती होती. मकोकाच्या कलमाखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला विधानभवनात प्रवेश मिळतोच कस? असा प्रश्न देखील वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे.

12:54 (IST) 18 Jul 2025

राज्यपालांनी जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये – वडेट्टीवार

जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये, ही मागणी घेऊन काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, हे जनसुरक्षा नव्हे सरकारसुरक्षा विधेयक आहे.

12:54 (IST) 18 Jul 2025

पनवेलकरांसाठी अखेर ‘अभय’, मालमत्ता करावर चार टप्प्यांत शास्ती माफी लागू

पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करावरील लावलेली शास्ती रद्द करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे पनवेलमधील पदाधिकारी व माजी नगरसेवक गुरुवारी आक्रमक झाले. …सविस्तर वाचा
12:43 (IST) 18 Jul 2025

महारेराच्या आदेशांकडे विकासकाचे दुर्लक्ष; अंधेरीतील इमारतीचे दोषदायित्व दूर करण्यास टाळाटाळ

अंधेरी येथील कॉस्मोपॅालिस या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीची संरचनात्मक अहवालानुसार तात्काळ दुरुस्ती करावी, असे आदेश महारेराने एप्रिल अखेरीस दिले होते. मात्र या आदेशाची दोन महिन्यानंतरही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. …सविस्तर वाचा
12:38 (IST) 18 Jul 2025

ठिय्या आंदोलनप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

१७ जुलै रोजी मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कारसमोर ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी कार अडवल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत आमदार आव्हाड यांच्याविरोधात मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12:25 (IST) 18 Jul 2025

मुंबई महापालिका बालवाड्यांमध्ये अपुऱ्या जागेत विद्यार्थी, शिक्षकांची कुचंबणा!

मुंबई महानगरपालिकेच्या बहुतेक शाळांमधील बालवाड्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. …सविस्तर वाचा
12:22 (IST) 18 Jul 2025

विधानभवन हाणामारीच्या घटनेत अटक केलेले नितीन देशमुख कोण आहेत?

देशमुख हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. घाटकोपरमधील स्थानिक राजकारणातही नितीन देशमुख यांचा प्रभाव आहे. …वाचा सविस्तर