Mumbai Maharashtra Breaking News : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर लहरी हवामानाचं घोंगडं आहे. कधी पाऊस तर कधी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील राजकारणातही सातत्याने अनेक घडामोडी घडत आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून राज्यात वाद पेटला असून यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. दोन समाजातील हा वाद मिटावा म्हणून आता शरद पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी छगन भुजबळांनी केली. या करता त्यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती. तर, आज सकाळीच वारीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघतात ५ वाकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेकजकणी जखमी झाले आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.

Live Updates

Marathi News Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

12:42 (IST) 16 Jul 2024
रानसई धरण तुडुंब, मुसळधार पावसाने धरण भरल्याने उरणकरांची जलचिंता दूर

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 16 Jul 2024
Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी रात्री उशिरा केली तीन तास चौकशी, नेमके कारण गुलदस्त्यातच

Trainee IAS Pooja Khedkar अकोला : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होत आहे. पूजा खेडकर यांची वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूने सोमवारी रात्री चौकशी केल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा….

12:28 (IST) 16 Jul 2024
अतिवृष्टीचे तांडव! खामगावात ८३८ हेक्टर जमीन खरडली,२४२ कुटुंब बाधित…

बुलढाणा : मागील सात जुलैला खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेत जमीन आणि पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावरून परतलेल्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज या नुकसानीची पाहणी केली.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 16 Jul 2024
समाजमाध्यमातील समूहात आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून पुण्यातील संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

संबंधित संस्थेतील कनिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 16 Jul 2024
सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवार अन् सुप्रिया सुळेंची भेट

पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास तासभर भेट घेतली.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 16 Jul 2024
गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; विज पडून म्हैस ठार

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/पिंपळगाव येथे विज पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. ही घटना १५ जुलैच्या सायंकाळी ७:३० वाजता सुमारासची आहे. या घटनेत पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम यांचे नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:38 (IST) 16 Jul 2024
Maharashtra News Live : विधानसभा निवडणुकांबाबत वंचितची भूमिका काय? ॲड. प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार!

औरंगाबाद : “आज मी मोठी घोषणा करणार आहे. यासाठी औरंगाबादमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 पत्रकार परिषद घेणार आहे”, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का ? राजकारणात मोठी उलथापालथ होणार का ? अशा प्रश्नांना यामुळे उधाण येतं आहे.

11:28 (IST) 16 Jul 2024
मुंबई: पालिका शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित

मुंबईतील शाळा सुरू होऊन महिना झाला आहे. मात्र, अद्यापही मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 16 Jul 2024
तरुणांसाठी खुशखबर: राज्यात पुन्हा ७ हजार पदांसाठी पोलीस भरती

अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 16 Jul 2024
नगरमध्ये भाजपचे विवेक कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवानेते विवेक कोल्हे भविष्यात कोणती वाट पकडणार? याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

11:15 (IST) 16 Jul 2024
वर्धेतील ‘या’ डॉक्टर जोडप्याचे ‘बंटी-बबली’ला लाजवेल असे कृत्य! कोट्यवधी रुपयांची…

आर्थिक प्रलोभन देत फसवणूक करण्याचे प्रकार नवे नाहीत. तरीही सुशिक्षित म्हटल्या जाणारा मोठा वर्ग त्यास बळी पडत असल्याचे आजही दिसून येते.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 16 Jul 2024
ससूनमध्ये आधीच रक्ताची टंचाई अन् त्यात रुग्णवाहिकेत डिझेलचा खडखडाट होतो तेव्हा…

ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या रक्तटंचाई आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून रक्त पिशव्या आणाव्या लागत आहेत.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 16 Jul 2024
मुंबई-ठाण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार; गृहमंत्री फडणवीस यांचा…

मुंबईत सर्वाधिक ३९७ बलात्काराचे गुन्हे दाखल असून त्यापाठोपाठ ठाणे शहरातत १४८ गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 16 Jul 2024
ठाणे: घोडबंदर मार्गासह उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, सेवा रस्त्यांचीही दुरावस्था

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माजिवाडा पुलावर बुजवलेले खड्डे उख़डले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे डबके तयार झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:13 (IST) 16 Jul 2024
कोयना जमीन गैरव्यवहाराची हरित लवादाकडून दखल, सातारा जिल्हाधिकाऱ्यांसह पाच जणांना नोटिस

अहमदाबाद येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी त्यांचे कुटुंब आणि नातेवाइकांच्या नावावर साताऱ्यातील कांदाटी खोऱ्यातील झाडानी (ता. महाबळेश्वर) येथील ६४० एकर जमीन खरेदी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 16 Jul 2024
नाशिक-मुंबई महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी उपाय, भिवंडीतील अवजड वाहनांसाठी वेळमर्यादेचे नियोजन

नाशिक-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी पुलांची कामे सुरू असून तेथील सेवा रस्त्यांवर अधिक खड्डे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन खोळंबा होतो, ही वस्तूस्थिती आहे.

सविस्तर वाचा…

10:47 (IST) 16 Jul 2024
Maharashtra News Live : “सामाजिक प्रश्नांचे गंभीर परिणाम होतात”, राज्यातील सद्यस्थितीवरून छगन भुजबळांचं भाष्य!

राज्यातील गावातील समाज-समाजात शत्रूत्व निर्माण व्हायला लागलं आहे. एकमेकांचं डोकं फोडण्यापर्यंत प्रकरण गेलं आहे. माझ्याकडे फोटो येत असतात, मी पोलिसांना कळवत असतो. पण पोलिसांकडून सोडवला जाणारा हा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. हे शत्रुत्त्व आणि दुफळी वाढली, तर आज हे संपणार नाही. इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी कायम राहील. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांनी ठरवलं की सर्वपक्षीय बैठक घेऊया. मी स्वतः सांगितलं होतं की पवारांनी हजर राहणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांनाही कागदपत्र दिलं होतं. साहेबांना सांगा तुम्ही आवश्य यायला पाहिजे, असं त्यांना सांगितलं होतं. परंतु, सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षाचं कोणीही हजर राहीलं नाही. त्यामुळे प्रश्न सुटणार कसा? हा राजकीयपेक्षा सामाजिक प्रश्न आहे. राजकीय प्रश्नाचे परिणाम ते कदाचित ताबडतोब भरून निघतात. सामाजिक प्रश्नाचे गंभीर परिणाम होतात. यात लहान- गरीब माणसं होरपळून निघतात. सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे – छगन भुजबळ