Maharashtra News Today, 12 September 2025 : मुंबईत मातोश्री या शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या आमदार व मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच्या संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) सातत्याने भेटी होत असताना आज नाशिकमध्ये शिवसेना (उबाठा) व मनसेने संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. नाशिकमधील नागरी समस्यांविरोधात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरणार आहेत.

भारतीय जनता पार्टीने येत्या मंगळवारी मुंबईत विजय संकल्प मेळावा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जाणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधित राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की कायद्याच्या चौकटीत हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना जातप्रमाणपत्र मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला, “हा शासन निर्णय सरकारने बदलला तर एकाही नेत्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, “आपल्या देशात लोकशाही आहे, जरांगेशाही नाही. जरांगेशाही येणं अशक्य आहे.”

Live Updates

Latest Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

12:48 (IST) 12 Sep 2025

भुजबळ-मुंडे लातूरच्या वांगदरीत दाखल, मृत भरत कराड यांच्या कुटुंबियांचं सांत्वन

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड (३५) या व्यक्तीने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांगदरी या गावी जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं.

12:43 (IST) 12 Sep 2025

crime news : फायनान्सच्या कर्मचा-याची रस्त्यात लूट; ५ लाख ९० हजारांचे दागिने लुटले

रस्त्यात दुचाकीवरून सोन्याचे दागीने घेऊन जाणा-या दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून गुरुवारी सायंकाळी लुटण्यात आले आहे. पाच लाख ९० हजार रुपयांचे दागीने लुटल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. …वाचा सविस्तर
12:41 (IST) 12 Sep 2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत-पाक क्रिकेट सामन्याकडे डोंबिवलीकरांची पाठ?

सहा महिन्यापूर्वी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील रहिवासी दिवंगत हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या पर्यटकांचा मृत्यू झाला. …वाचा सविस्तर
12:40 (IST) 12 Sep 2025

Bank Job Opportunity: सुवर्णसंधी! फक्त मुलाखत द्या आणि बँकेत नोकरी मिळवा, तीस हजारांपर्यंत पगार…

विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, तर निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. …सविस्तर बातमी
12:35 (IST) 12 Sep 2025

उपजिल्हा रुग्णालय रखडल्याने पनवेल नवी मुंबईवर भिस्त; उरणमध्ये अतिदक्षता विभाग नसल्याचा फटका

अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या सेवेपैकी आरोग्यसेवाच उरणकरांना मिळालेली नाही.तालुक्यात शासकीय किंवा खासगी यापैकी एकही अतिदक्षता विभाग असलेले रुग्णालय उपलब्ध नसल्याने रुग्णांना रस्त्यातच आपले जीव गमवावे लागत आहेत. …सविस्तर बातमी
12:35 (IST) 12 Sep 2025

PitruPaksha : ठाण्यातील या हॉटेलमध्ये पितृपक्ष अन्नदान महापर्व…

ठाणे शहरातील स्पाईस अप या हॉटेलने ‘पितृपक्ष अन्नदान महापर्व’ हा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम ८ सप्टेंबरपासून सुरु झाला असून २१ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. …सविस्तर बातमी
12:31 (IST) 12 Sep 2025

पुणे-कोल्हापूर टोलप्रकरणी मुख्य सचिवांसह, तीन जिल्हाधिकाऱ्यांना ‘सर्किट बेंच’ची नोटीस

सध्या कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर दैनंदिन दीड ते दोन कोटी रुपयांची टोल वसुली केली जात आहे. मात्र वाहतूकदारांना सुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत. …वाचा सविस्तर
12:25 (IST) 12 Sep 2025

कार्याध्यक्षांनी टीका करताच शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे तडक उठले…पुढे काय झाले ?

जिल्ह्यात पक्षाची परिस्थिती शून्य असतांनाच पक्षातील काही नेते सत्ताधाऱ्यांशी सलगी करुन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची फोडाफोड करत असल्याचा आरोप व्यासपीठावरून झाला. …सविस्तर बातमी
12:20 (IST) 12 Sep 2025

उरणच्या रस्त्यांवर राडारोड्याचे ढीग; न्हावा शेवा रेल्वे स्थानक आणि रहदारीच्या रस्त्यांतच अडथळे

न्हावा शेवा रेल्वे स्थानक आणि तालुक्यातील इतर रहदारीच्या मार्गावरही मानवी शरीराला घातक असलेला राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. …अधिक वाचा
12:16 (IST) 12 Sep 2025

रायगडमध्ये भाजप राष्ट्रवादीने एकत्र येत शिंदे गटाला दाखविला कात्रजचा घाट

उच्च न्यायालयाने माजी नगराध्यक्ष प्रणाली पाटील यांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. …अधिक वाचा
12:07 (IST) 12 Sep 2025

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य दौऱ्यावर टीका, मोरारी बापूंच्या रामकथा पर्वात सहभागी होणार

कथा पर्वात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी यवतमाळात येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. …अधिक वाचा
12:04 (IST) 12 Sep 2025

दोन आश्रमशाळा…दोन विद्यार्थिनींचा मृत्यू…धुळे जिल्ह्यात चाललंय काय ?

मंजुळा पवार (नऊ वर्षे) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. याआधी मंगळवारी गणेशपूर केंद्र शाळेतील सोनाली पावरा (१२, रा.खरवड, धडगाव) हिचा मृत्यू झाला. …अधिक वाचा
12:04 (IST) 12 Sep 2025

दोन आश्रमशाळा…दोन विद्यार्थिनींचा मृत्यू…धुळे जिल्ह्यात चाललंय काय ?

मंजुळा पवार (नऊ वर्षे) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. याआधी मंगळवारी गणेशपूर केंद्र शाळेतील सोनाली पावरा (१२, रा.खरवड, धडगाव) हिचा मृत्यू झाला. …अधिक वाचा
12:03 (IST) 12 Sep 2025

प्रारुप प्रभागरचनेवर टीकेचा सूर; नियमावली पायदळी तुडवल्याचा सुनावणीवेळी आरोप

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना करताना नियमांना फाटा दिला असून नैसर्गिक रस्ते, लोहमार्ग, शहरातील मूळ गावठाणे यांचे जाणीवपूर्वक तुकडे पाडण्यात आले असल्याचा आक्षेप अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी घेतला. …अधिक वाचा
12:00 (IST) 12 Sep 2025

छेडछाडीचा प्रकार पोलिसांच्या टोल-फ्रीवर पोहोचला; आरोपी तरुणांना चांगलाच धडा

तरुणीजवळून जाताना दुचाकीतून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या तरुणाचा शोध घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याच्यावर समाजमाध्यमावरून माफी मागण्याची वेळ आली. …वाचा सविस्तर
11:58 (IST) 12 Sep 2025

साखर उतारा वर्ष निश्चितीवरून कारखानदार – शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते एकाची हमी मिळावी यासाठी २००९ सालापासून एफआरपी (उचित व लाभकारी मूल्य) कायदा लागू करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
11:56 (IST) 12 Sep 2025

वरळी येथील बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरण: चारशे दिवसांपासून कोठडीत असलेला मिहीर शहा जामिनासाठी धाव

मिहीर अटक झाल्यापासून ४०० दिवसांहून अधिक काळ खटल्याशिवाय तुरुंगात आहे, ही बाब सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारताना लक्षात घ्यायला हवी होती. परंतु, ती घेतली गेली नाही, असा दावा मिहीर याने जामिनाची मागणी करताना केला आहे. …सविस्तर वाचा
11:51 (IST) 12 Sep 2025

‘कसब्या’वरून पुण्यात भाजप-शिवसेना शिंदे गटात वाद

धंगेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत घेरण्यासाठी भाजपने पूर्वीचा ‘कसबा’ हा प्रभागच इतिहासजमा करून नवीन प्रभाग केला आहे. …वाचा सविस्तर
11:48 (IST) 12 Sep 2025

सिडकोचे दक्षता पथक सुस्तावलेले; पथकाचे प्रमुख अतिक्रमण मुक्तीत दंग

सिडको महामंडळाने काही वर्षांपूर्वी दक्षता पथक स्थापन केले आहे.गेल्या वर्षभरात लाचखोरीची प्रकरणे सतत उघडकीस येऊ लागल्याने सिडकोचे दक्षता पथक नेमके करते तरी काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. …वाचा सविस्तर
11:40 (IST) 12 Sep 2025

Ghodbunder Road : तर घोडबंदर मार्गावर लाखोंच्या संख्येने उतरुन चक्काजाम करु

घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. …सविस्तर वाचा
11:39 (IST) 12 Sep 2025

इमारती रिकाम्या न करणे महागात; वसईतील दोन इमारतीतींल पाच सदस्यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड

अंबाडी रोडवरील दिवाण अँड सन्स हाऊसिंग एन्क्लेव्ह येथील ‘पुष्पांजली’ आणि ‘दीपांजली’ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारती २८ फेब्रुवारी रोजी वसई – विरार महानगरपालिकेने धोकादायक घोषित केल्या होत्या. …वाचा सविस्तर
11:34 (IST) 12 Sep 2025

सिडकोला लाचखोरीचे ग्रहण; उपनिबंधक कार्यालयातील छाप्यामुळे पुन्हा नाचक्की

हजारो कोटी रुपयांच्या जमिनीची मालकी आणि विमानतळ मेट्रो यांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या सिडकोला सध्या लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. …सविस्तर बातमी
11:31 (IST) 12 Sep 2025

दंगलीच्या ‘एकाकी’ तपासावर ‘सर्वोच्च’ बोट, गृहमंत्र्यांच्या तत्कालीन ‘पालकत्वात’ पोलिसांचा ‘पक्षपाती’पणा

शहरात वारंवार दंगली उसळल्या असून मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाल्याचा पूर्वइतिहास आहे. …वाचा सविस्तर
11:31 (IST) 12 Sep 2025

‘धन्यवाद खासदार ओम….आम्हाला कळालं’, भाजपच्या मोहिमेमुळे संशय

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतदानाशी त्याचा संबंध जोडला जात आहे. …सविस्तर बातमी
11:16 (IST) 12 Sep 2025

वाया जाणाऱ्या पाण्यातून पनवेलकरांची तहान भागवण्याची योजना

देहरंग धरणाबाहेर पडणारे कोट्यावधी लीटर पाणी थेट नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि मोठ्या व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली आणि कामोठे या वसाहतींना पुरवण्यात येणार आहे. …अधिक वाचा
11:15 (IST) 12 Sep 2025
“शिकलेल्या मराठ्यांनो उत्तर द्या, तुम्हाला EWS, राज्य सरकारचं १० टक्के, ओपनमधील ५० टक्के आरक्षण नको?”, भुजबळांचं आव्हान

राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेलं कोणत्याही प्रकारचं आरक्षण नको का? त्याऐवजी केवळ ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे का? हे राज्यातील मराठा नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि शिकलेल्या मराठ्यांनी स्पष्ट करावं, असं आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.

भुजबळ म्हणाले, “मराठा समाजाला वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं आहे. मराठा समाज खुल्या प्रवर्गात येत होता. तिथे ५० टक्के वाटा आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० टक्के आरक्षण दिलं. जे आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत परंतु, सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत अशा समुदायांसाठी १० टक्के आरक्षण लागू केलं. या १० टक्क्यांपैकी ८ टक्के वाटा एकट्या मराठा समाजाचा आहे. यासह राज्यात मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण आहे. तरीसुद्धा मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का हवं आहे?”

11:10 (IST) 12 Sep 2025

पीक संरक्षणासाठी ‘पक्षी थांब्यां’चा आधार; प्रत्येक एकरात दहा थांबे उभारण्याचे कृषीतज्ज्ञांचे आवाहन

रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिकरीत्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी भातशेतात ‘पक्षी थांबे’ उभारावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे. …वाचा सविस्तर
11:04 (IST) 12 Sep 2025

Samruddhi Expressway Nails: समृद्धीवरील खिळे प्रकरणी कंत्राटदार मेघा इंजिनिअरिंगवर गुन्हा

संबंधित प्रकार हा खिळे ठोकण्याचा नसून रस्त्याच्या अंतर्गत भेगा, तडे बुजवण्याच्या कामानिमित्त नोजल्सद्वारे रसायन सोडण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. …सविस्तर बातमी
10:58 (IST) 12 Sep 2025

प्रभाग रचनेची सुनावणी संपली ; आता प्रतीक्षा अंतिम प्रभाग रचनेची

वसई विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला असून त्यावर आलेल्या १६० हरकती व सूचनांवर बुधवारी सुनावणी पार पडली. …सविस्तर वाचा
10:51 (IST) 12 Sep 2025

मविप्रच्या खासगी विद्यापीठाने ४०० कोटींच्या जागेचे काय होणार ?

मराठा समाजाची मविप्र ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य शिक्षण संस्था आहे. खासगी विद्यापीठ स्थापनेवरून विद्यमान कार्यकारी मंडळात दुफळी माजली आहे. …सविस्तर बातमी