Maharashtra News Update Today: राज्य सरकारने नुकतीच अहमद नगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपल्याला भाजपाबरोबरच्या युतीमध्ये सापत्न वागणूक मिळाल्याच्या केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

11:22 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: गोपीनाथ मुंडेंनी शून्यातून भाजपा उभा केला – संजय राऊत

गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, महादेवराव शिवणकर अशा बहुजन समाजातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपा शून्यातून उभा केला. शिवसेनेशी युती करून हा पक्ष सत्ताधारी केला. त्या मुंडे परिवाराचं राजकारणात अस्तित्व राहू नये, यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला यावर आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही. कारण तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे – संजय राऊत

11:21 (IST) 1 Jun 2023
नागपूर : दहा वर्षांत वंध्यत्वाचे प्रमाण १० टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर! स्त्रीरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

नागपूर : गेल्या दहा वर्षांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण १० टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गर्भाशयातील क्षयरोगामुळेही वंध्यत्व वाढत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोग व प्रसूतीरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 1 Jun 2023
अमरावती : महिलेला अंघोळ करताना चोरून पाहिले, पुढे झाले असे की…

एका महिलेला अंघोळ करताना चोरून पाहणाऱ्या आरोपीला पकडून चांगलाच चोप देण्यात आला. त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मोहम्मद नाजीस अब्दुल कय्युब याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

11:21 (IST) 1 Jun 2023
डोंबिवलीतील डाॅमिनोज पिझ्झामध्ये नोकरानेच केली चोरी

डोंबिवली – येथील पूर्व भागातील चिपळूणकर रस्त्यावरील डाॅमिनोज पिझ्जा दुकानात या दुकानातील कामावरून काढून टाकलेल्या नोकरानेच चोरी केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. रामनगर पोलिसांनी चोरीनंतर २४ तासांच्या आत आरोपीला डोंबिवलीतील गोग्रासवाडी भागातून अटक केली.

सविस्तर वाचा..

11:20 (IST) 1 Jun 2023
पुणे: कारवाईच्या इशाऱ्यानंतर एका दिवसात ‘असा’ तयार झाला जाहिरात फलकांचा स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल

शहरातील लोखंडी जाहिरात फलकांचे स्थापत्य लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ होत असल्याने कारवाईचा इशारा दिल्यानंतर एकाच दिवसात १ हजार ६०० जाहिरात फलकांचा स्थापत्य लेखापरीक्षण अहवाल परिमंडळ उपायुक्तांकडे अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्यात आले. सविस्तर वाचा…

11:19 (IST) 1 Jun 2023
‘आप’ची स्वराज्य यात्रा उद्या पुण्यात

आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा येत्या शुक्रवारी (२ जून) पुण्यात दाखल होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता आझम कॅम्पस येथून फेरीला सुरूवात होणार असून सायंकाळी सहा वाजता सणस मैदाना शेजारी जाहीर सभा होणार आहे. सविस्तर वाचा…

11:19 (IST) 1 Jun 2023
पुणे: राज्यात १ जुलैपासून मिळणार नवीन लायसन्स; स्मार्ट कार्ड टंचाईवर सरकारचा निर्णय

वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे नवीन स्मार्ट कार्ड मिळणार आहे. याबाबत परिवहन विभागाने कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून १ जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे. सविस्तर वाचा…

11:17 (IST) 1 Jun 2023
नाशिक: आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी; राज्यात तीन लाख मेट्रिक टनची खरेदी होणार

काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याचे भाव ७०० रुपयांच्या आसपास गटांगळ्या खात असताना गुरुवारपासून नाफेड राज्यात कांदा खरेदी सुरू करीत आहे. या निमित्ताने देवळा तालुक्यातील उमराणे येथील खरेदी केंद्रावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

11:17 (IST) 1 Jun 2023
धुळे: साहेब, पाया पडतो पण पाणी सोडा…! माजी आमदाराची धुळे जिल्हाधिकार्यांकडे मागणी

तालुक्यातील ८४ गावे पाण्याच्या प्रतिक्षेत असतानाही जिल्हा प्रशासन अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत माजी आमदार प्रा.शरद पाटील यांनी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे चरणस्पर्श करण्याचा प्रयत्न केला. वेळीच शर्मांनी मागे होत पाटलांना सावरले. सविस्तर वाचा…

11:13 (IST) 1 Jun 2023
“…नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या”, संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला; म्हणाले, “नुसतं अन्याय होतोय या रडगाण्याला…!”

संजय राऊत म्हणतात, “आम्हाला मुंडे परिवाराविषयी कायम आस्था आणि प्रेम राहील ती गोपीनाथ मुंडेंमुळे. ते असते, तर…!”

वाचा सविस्तर

11:12 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला!

आम्हाला मुंडे परिवाराविषयी कायम आस्था आणि प्रेम राहील ती गोपीनाथ मुंडेंमुळे. ते असते, तर शिवसेना-भाजपा युतीला वेगळी दिशा मिळाली असती. आजचं चित्र दिसलं नसतं. पण गोपीनाथ मुंडे नसल्यामुळे त्यांच्या परिवाराची राजकारणात वाताहत केली जात आहे. अशा परिस्थितीत परिवाराच्या प्रमुख लोकांनी हिंमतीनं, साहसानं निर्णय घेण्याची गरज असते. परिणाम काय होतील, याची पर्वा न करता निर्णय घ्यायचे असतात. तरच तुम्ही राजकारणात टिकून राहू शकता. नाहीतर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यायला हवा. आमच्यावर अन्याय होतोय, अशा रडगाण्याला कुणीही विचारत नाही – संजय राऊत

11:11 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: “ठीक आहे, आमच्या सरकारला लकवा मारला होता, पण…”

ठीक आहे.. तेव्हा आमच्या सरकारला लकवा मारला होता. पण आता तुमचं सरकार स्मशानात पोहोचलंय. काहीही हलत नाहीये. डोळे, कान बंद आहेत. त्यामुळे ही लकव्याची भाषा तुम्ही करू नका – संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर!

महाराष्ट् न्यूज

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!