Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आघाडी व युतीसंदर्भातल्या चर्चा झडू लागल्या असून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतही भाकितं केली जाऊ लागली आहेत. असं असतानाच पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच दुसरीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्याच कार्यकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे. ‘तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल’, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.
Maharashtra Weather News Live Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.
Jalgaon Politics : भाजप-शिंदे गटातच खरा सामना… अजित पवार गटाचे काय ?
पोलीस ठाण्याबाहेर तडजोडीसाठी आटापिटा का? झोटिंग, बोंडे आर्थिक व्यवहार प्रकरण
मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक -सचिन सावंत
काँग्रेसने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार करावा! मुंबई महापालिकेसाठी संजय राऊत यांच्याकडून काँग्रेसची मनधरणी
प्रति मतदार ८० रुपये दराने मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “पुढची पाच वर्षे…”
Chandrashekhar Bawankule Statement on Mobile phones Under Surveillance : “सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असं खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. “कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असंही ते म्हणाले. “तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“जर कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली तर आता…”, चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजपाच्याच कार्यकर्त्यांना इशारा
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्याच कार्यकर्त्यांना एक मोठा इशारा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारं बंद होतील”, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
‘मुरलीधर मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी…’, धंगेकरांचा आणखी एक गंभीर आरोप; थेट व्हिडीओ केला शेअर
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मागील काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर वेगवेगळे आरोप करत टीकेची झोड उठवली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुरलीधर मोहोळ हे पुणे महापालिकेचे महापौर असताना बिल्डरची गाडी वापरायचे’ असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
‘मुरलीधर मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी…’, धंगेकरांचा आणखी एक गंभीर आरोप, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
