Maharashtra Breaking News Updates, 29 September 2022 : नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. शिंदे आणि विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरु केलेल्या या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे.
तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीवरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यानंतर खुद्द पंकजा मुंडेंनीही त्यावर स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं होतं. बीडमधील त्यांच्या या विधानानंतर आता अजून एका उपहासात्मक विधानाची चर्चा आहे. बीडच्याच एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी ‘मी सध्या बेरोजगारच आहे’, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. यावेळी पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगचाही समाचार घेतला.
या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Mumbai-Maharashtra Latest News Updates, 29 September 2022 : राज्यातील राजकारण, न्यायालयीन घडामोडी आणि अन्य बातम्या वाचा एकाच ठिकाणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये जाणार होते, असे आपणास आमदार संजय शिरसाठ यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी ते काही होऊ दिले नाही, असा नवा गौप्यस्फोट करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यात नवी भर टाकत एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शहरातील अनेक कॉफी कॉर्नर, फास्ट फूड सेंटर व काही हॉटेल्समध्ये प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी पैसे मोजून जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस कारवाईतून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आला आहे. गानुवाडी परिसरातील ग्राउंड व्ह्यू कॉफी कॉर्नरमध्येही असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर राजापेठ पोलिसांनी या तेथे छापा टाकून दोन प्रेमीयुगुलांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.
विक्रोळीमधील गांधीनगर पुलावर बुधवारी रात्री १० च्या सुमारास रस्त्यावर ठेवलेल्या ब्लॉकला धडकून बेस्ट बस खाली आल्यामुळे एका २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेस्ट बस चालकाला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. सविस्तर वाचा…
माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडूंना येणारा संताप आणि हात उगारण्याच्या घटनांची चर्चा रंगू लागली आहे. शिंदे -फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याने बच्चू कडू यांची चिडचिड वाढलेली तर नाही ना अशीही कुजबूज सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…
कोल्हापूर : सार्वजनिक शौचालय बांधकाम बांधकामाच्या देयकाची रक्कम मंजूर करण्यासाठी लाचेची रक्कम मागितल्या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली आहे. बातमी वाचा सविस्तर …
पश्चिम रेल्वेने १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळापत्रकात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या असून १५ डब्यांच्या लोकलचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने आणखी ३१ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
पुणे : विधवा, परित्यक्ता, एकटी बाई, घटस्फोटित, नवरा सोडलेली, नवऱ्याने टाकलेली, बिना लग्नाची असे शब्द वापरून आपण एकल महिलांचा अपमान करतो. अशा शब्दांचा त्या व्यक्तीवर सखोल परिणाम होत असतो. बातमी वाचा सविस्तर …
दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आईवरच चाकूने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती येथील बालाजी हाईस इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. अभिजित गोपीचंद दरेकर (वय ३२, रा. बालाजी हाईटस, संभाजीनगर, कदमवाकवस्ती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सविस्तर वाचा…
संगणक परिचालक नियुक्तीमध्ये करण्यात आलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ एका दाम्पत्याने जिल्हा परिषद समोर लहान बाळासह वाहनात बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नीलेश तायडे व अस्मिता तायडे असे या दाम्पत्याचे नाव आहे. ११ महिन्यांच्या बाळासह त्यांनी महेंद्र पिकअप या वाहनात उपोषण सुरू केले आहे. सविस्तर वाचा…
कल्याण : सातार येथे गेले अनेक वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या सातारा हिल मॅरेथाॅन या अवघड स्पर्धेत कल्याण डोंबिवली पालिकेतील अभियंता असलेल्या दोन सायकल पटुंनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. बातमी वाचा सविस्तर …
नाशिक : कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर पूर्वीपासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत अटी-शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. बातमी वाचा सविस्तर …
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग माहिती केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध माहितीपर कार्यक्रम, निसर्ग सहली, कार्यशाळा, प्रदर्शन आणि इतर शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
गोंदिया : दोन अपत्ये झालीत, तिसरा होऊ नये म्हणून शासनाच्या नियमाचे पालन करीत आणि आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. मात्र, पत्नी आठ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर येताच त्याला धक्का बसला. बातमी वाचा सविस्तर …
२०१९ साली महाविकास आघाडी सरकारची जुळवाजुळव चाललेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी केलेले बंड आणि त्यातून आलेले फडणवीस-पवार सरकार अयशस्वी करण्याच्या मोहिमेत इतर नेत्यांसोबत एकनाथ शिंदेही ‘आघाडीवीर’ होते. मुंबई विमानतळावरून पळून जाणार्या एका अजित पवार समर्थक आमदाराला ताब्यात घेत शिंदे यांनी नंतर हा आमदार शरद पवार यांच्या स्वाधीन केल्याचीही नोंद सापडते.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपुर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानामध्ये गेल्या दोन दिवसांत पालिकेच्या आरोग्य पथकाने सात हजार महिलांची आरोग्य तपासणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ९८७ महिलांची टेंभीनाक्यावरील देवीच्या मंडपाजवळ आयोजित शिबीरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर …
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ठाणे जिल्हयात भरभरून प्रतिसाद मिळत असताना, कल्याणचे शिवसेना नेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत जेमतेम अडीच हजार मतांनी पराभवाच तोंड पाहाव लागलेले बंड्या साळवी हे कल्याणातील शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. सविस्तर वाचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून सूरतमध्ये त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी भूमीपूजन पार पडलं. गुजरातमध्ये ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असून, नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्धाटन होणार आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. मोदींच्या स्वागतासाठी सूरतमध्ये लोकांची गर्दी झाली होती.
राज्यात सत्तांतर झाल्यानतंर ‘खरी शिवसेना कोणाची’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेलं असून, पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगापुढील सुनावणी स्थगित करावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.
ठाणे : भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेला तात्पुरता प्रकल्पातील यंत्रामध्ये साडी, गाद्या, फर्निचरचा कचरा अडकून हा प्रकल्प बंद पडला असून असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने आता कचरा चाळूणच तो यंत्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बातमी वाचा सविस्तर …
ठाणे : २०१४ मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, त्यावेळी शिवसनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंद देखील उपस्थित होते, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच केला होता. यावर पत्रकार परिषदमध्ये नरेश म्हस्के यांनी अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
कल्याण : कल्याणहून नवी मुंबई दिशेने कल्याण-शिळफाटा रस्त्याने धावत असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या एका मिडी बसला बुधवारी रात्री साडे दहा वाजता अचानक कल्याण पूर्वेतील मेट्रो माॅल समोर आग लागली. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडगाव मावळ येथे पक्षाच्या बैठकीनंlर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यंदा सगळे सण आणि उत्सव जल्लोषात आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरे केले जातील अशी घोषणा केलेली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी, आम्ही आमच्या पक्षाची चिंता करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. बातमी वाचा सविस्तर …
नंदुरबार : जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक सहावरील ६८ मीटर लांबीचा पूल गुरुवारी सकाळी कोसळला. हा पूल धानोरा आणि ईसाईनगर गावाजवळील रंका नदीवर आहे. बातमी वाचा सविस्तर …
कल्याण : कल्याण मधील दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रोत्सवासाठी दुर्गाडी किल्ल्या जवळ वाहतुकीत बदल करण्यात आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कल्याण शहरातील पत्रीपूल, शिवाजी चौक, लाल चौकी, आधारवाडी, सहजानंद चौक परिसर वाहतूक कोंडीत अडकत आहे. अपुरे वाहतूक पोलीस आणि एकाच वेळी दसपटीने वाहने रस्त्यावर येत असल्याने कल्याण मधील वाहतुकीचे नियोजन पूर्ण कोलमडून गेले आहे. बातमी वाचा सविस्तर …
बदलापूर : बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पुररेषाचे फेर सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले. दोन वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने उल्हास नदीची पुररेषा जाहीर केली होती. बातमी वाचा सविस्तर …
चंद्रपूर : मोबाईल खेळण्यात गुंग असलेल्या मुलाच्या हातून वडिलांनी मोबाईल हिसकावून घेत त्याला शाळेत पाठवले. वडिलांच्या या कृतीचा राग आल्यामुळे अकरा वर्षीय मुलाने स्वत:चे अपहरणाचे नाट्य रचले. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : ३९ कोटींच्या बेकायदेशीर व्यवहारांच्या माध्यमातून खोट्या देयकाच्या आधारे शासनाचा ६.९८ कोटी रुपयांचा कर बुडवणाऱ्या नागपूरच्या विजय लक्ष्मणराव पेशने या व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने अटक केली. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : नवव्या वर्गात शिकणारी मुलगी अभ्यासाच्या खोलीत प्रियकरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत सापडली. त्यामुळे आईने मुलीला व तिच्या प्रियकराला चांगला चोप दिला. या प्रकरणात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : शासकीय निवासस्थानातून चंदनाच्या झाडांची कत्तल करून चंदन चोरी करणाऱ्याला सीताबर्डी पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या. आसीफ पठाण (२४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. बातमी वाचा सविस्तर …
सर्वोच्च न्यायालयातील पहिला निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्याने शिवसेनेनं पहिल्यांदाच पक्ष म्हणून आपली बाजू मांडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून ‘सर्व प्रकारच्या लढाईस आम्ही सज्ज आहोत’ असं सांगत शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोरील लढाईसाठीची तयारी दर्शवली आहे. इतकंच नाही तर शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका करताना, “आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.