scorecardresearch

मुंबईः विक्रोळीत दुचाकीस्वाराच अपघातात मृत्यू

याप्रकरणी ५६ वर्षीय बेस्ट बसचालक नानासाहेब माने यांना बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली.

मुंबईः विक्रोळीत दुचाकीस्वाराच अपघातात मृत्यू
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

विक्रोळीमधील गांधीनगर पुलावर बुधवारी रात्री १० च्या सुमारास रस्त्यावर ठेवलेल्या ब्लॉकला धडकून बेस्ट बस खाली आल्यामुळे एका २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेस्ट बस चालकाला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. घटनेची माहिती मिळताच पार्क साइट पोलिसांचे एक पथक बुधवारी रात्री १० च्या सुमारास घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी नईमुद्दीन कासार (२१) याला राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. कासार हा बेस्ट बसजवळ पडलेला आढळला.

हेही वाचा >>> मुंबई : मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

कासार डावीकडून बसच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यावर रस्त्याच्या कडेला ठेवलेले तीन ब्लॉक त्याच्या समोर आले. त्यापैकी एका ब्लॉकला त्याच्या दुचाकीने धडक दिली. त्यामुळे तो खाली पडला व बेस्ट बसच्या खाली आला. या रस्त्यावर  ब्लॉक कोणी ठेवले याचा पोलीस तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात हे ब्लॉक मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी ५६ वर्षीय बेस्ट बसचालक नानासाहेब माने यांना बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली. कासार हा अन्नपदार्थ घरोघरी पोहोचविण्याचे काम करीत होता. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या