Maharashtra Live News Updates, 27 October 2025 : आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तसेच फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणात देखील आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याबरोबरच मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या आणि इतरही राजकीय आणि गुन्हेगारी संबंधीत घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

15:55 (IST) 27 Oct 2025

बहारीनमध्ये भूमिका नेहते अशी काही पळाली की…नाशिकच्या नावाचा डंका

मिडले रिले प्रकारात भूमिकाने आपल्या सहकारी एडविना जेसन, शौर्या अंबुरे आणि तन्नू यांच्या साथीने वेगवान धाव घेत हे अंतर २. १२. ०० मिनिटात पूर्ण करून रौप्य पदकावर आपले नांव कोरले. …वाचा सविस्तर
15:47 (IST) 27 Oct 2025

जळगावात परतीच्या पावसाने इतर पिकांचे नुकसान… तुरीचा फायदा की तोटा ?

तूर पिकासाठी फुलोरावस्था अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या अवस्थेत पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी आणि पोषणद्रव्यांची आवश्यकता असते. पाऊस किंवा विहिरींचे पाणी मिळाले नाही, तर फुलगळ होऊन तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता वाढते. …सविस्तर वाचा
15:47 (IST) 27 Oct 2025

CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे मुंबई कार्यालयाच्या जमिनीबाबत विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपाने स्वत:चे पैसे…”

CM Devendra Fadnavis On BJP new Mumbai office land | मुंबईतील भाजपाच्या नवीन कार्यालयासाठी घेण्यात आलेल्या जागेबाबत विरोधाकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. …सविस्तर बातमी
15:45 (IST) 27 Oct 2025

Thane Crime News: मित्राला घरी बोलावले, वाद झाला आणि तिलाच पेटवून दिले

कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात कुटुंबासोबत वास्तव्यास होती. …वाचा सविस्तर
15:39 (IST) 27 Oct 2025

डोंबिवलीत सुट्टीच्या दिवशी कारवाई करून अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांचे कणे मोडले

एकावेळी ३० ते ४० कामगार, जेसीबी रेल्वे स्थानक भागातील बाजारात कारवाई करू लागल्याने फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. एकाही फेरीवाल्याला सामानासह पळून जाण्याची संधी न देता त्यांचे सामान पथकाने जप्त केले. …अधिक वाचा
15:26 (IST) 27 Oct 2025

पदवीधर मतदारसंघाचे नावही संभाजीनगर करा

मतदारसंघाचे नाव छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ असे करावे, अशी मागणी करण्याच्या हालचाली भाजपकडून केल्या जात आहेत. …वाचा सविस्तर
15:10 (IST) 27 Oct 2025

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विलंब तर आयुषची यादी वेळेवर लागल्याने विद्यार्थ्यांना फटका; सरकारी महाविद्यालयातील प्रवेशापासून…

एमबीबीएसच्या तिसऱ्या फेरीत जागा वाढल्याने आयुषला सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. …वाचा सविस्तर
14:58 (IST) 27 Oct 2025

Video: थरारक…रात्रीच्या अंधारात पुरात वाहून गेलेल्या तरुणाला कसा मिळाला झाडाचा आधार ?

संदीप बंडू खैरनार (२२) असे या थरारक घटनेत बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो सौंदाणे गावातील गलाटी नदीच्या फरशी पुलावरून दुचाकीने घराकडे निघाला होता. …सविस्तर वाचा
14:49 (IST) 27 Oct 2025
भाजपा काचेच्या घरात राहात नाही; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतील प्रदेश भाजपा कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन पार पडले. यावेळी राज्याचे मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी जागेवरून आरोप करणाऱ्यांना फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही, आमच्यावर दगड फेकण्याचा प्रत्न करू नका असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

14:47 (IST) 27 Oct 2025

धुळ्यात आसामच्या धर्तीवर कॅन्सर केअर सेंटर…काँग्रेसच्या खासदार डाॅ. शोभा बच्छाव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

धुळे येथे अत्याधुनिक कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांच्या अडचणी मांडत शोभाताई बच्छाव यांनी संसदेतही याविषयाकडे लक्ष वेधले आहे. …सविस्तर बातमी
14:32 (IST) 27 Oct 2025

Video: नॅशनल हायवे नव्हे हा तर चॉकलेट… कल्याण मुरबाड रस्त्याच्या अवस्थेवर समाजमाध्यमांवर मजेशीर पोस्ट

कल्याण शहरातून मुरबाडकडे जाण्यासाठी एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पुढे नगरला जोडला जातो. नगर भागात जाण्यासाठी सर्वाधिक जवळचा मार्ग म्हणून मुंबई, ठाणे, रायगड भागातील वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देतात. …अधिक वाचा
13:53 (IST) 27 Oct 2025

Gold-Silver Price : दिवाळीनंतर सोने आणखी घसरले… जळगावात आता किती दर ?

गेल्या काही दिवसांपासून भारतातील सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. दीर्घकालीन वाढत्या किमतीनंतर आता दोन्ही धातुंचे दर थोडे नरमले आहेत. …अधिक वाचा
13:47 (IST) 27 Oct 2025

नंदुरबार जिल्ह्यात होत्याचे नव्हते….मुसळधार पावसामुळे असे झाले नुकसान…

ऐन दिवाळीत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पावसामुळे संकटाचे काळे ढग दाटले. प्रशासनाने पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवित जिल्ह्याला यलो अलर्ट दिला होता. अशातच दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे. …वाचा सविस्तर
13:35 (IST) 27 Oct 2025

पुण्यातील जैन बोर्डिग जमीन व्यवहार… नाशिकच्या मोर्चात काय तपशील समोर आले ?

पुण्यातील जैन बोर्डिंग जागेचा वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या जागेच्या व्यवहारामध्ये भाजपचे केद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकरांकडून सातत्याने होत आहे. …वाचा सविस्तर
13:14 (IST) 27 Oct 2025

घोडबंदरच्या गायमुख घाटात पुढील महिन्यात पुन्हा दुरुस्ती

घोडबंदरच्या गायमुख घाटात पुन्हा दुरुस्तीची कामे सुरू होणार असून, नागरिकांमध्ये वाहतूक कोंडीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. …वाचा सविस्तर
13:00 (IST) 27 Oct 2025

MPSC: ‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत राज्य सरकारचा हस्तक्षेप?, सरकारचा प्रतिनिधी आयोगात आल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकालावर परिणाम

आयोगाचे कामकाज मंत्रालयाच्या अधीन असल्यासारखे चालवले जात आहे. राज्यपालांची मान्यता न घेता परस्पर दोन पदावर एकाच अधिकाऱ्याची एमपीएससीमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आल्याचे थेट एमपीएससीच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. …अधिक वाचा
12:39 (IST) 27 Oct 2025

डोंबिवलीत ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्ष पदासाठी शोध सुरू, विद्यमान जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर?

डोंबिवलीत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला ऊत आला असून, ठाकरे गटाने नव्या जिल्हाध्यक्षाच्या शोधाला सुरुवात केली आहे. …सविस्तर वाचा
12:33 (IST) 27 Oct 2025

“हे भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून आहेत, हे रोखणं कठीण नाही, पण…”; रोहित पवरांची पोस्ट चर्चेत

“संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, वैष्णवी हगवणे आणि आता फलटन येथील महिला डॉक्टर हे किडलेल्या आणि भ्रष्ट व्यवस्थेने केलेले खून आहेत. सत्ता संवेदनशील आणि खमक्या हातात असेल तर हे रोखणं कठीण नाही, पण आज सत्तेचा वापर केवळ विरोधकाला संपवण्यासाठी आणि आपली दुकाने राखण्यासाठीच केला जातो. अशा वेळी सरकार जर आपली भूमिका योग्य पद्धतीने वठवत नसेल तर मग जनतेनेच सामूहिकपणे सरकारची वेसण ओढून वठणीवर आणण्याची गरज आहे. अन्यथा राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचे बळी यापुढंही जात राहतील आणि आपल्याला केवळ मूकपणे बघत बसावं लागेल,” अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.

12:28 (IST) 27 Oct 2025

कोकण विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी थेट नाशिक जिल्ह्यातील अभ्यासिकेत…कारण पाहून तुम्ही कराल कौतुक…

कोकण विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ देवळा येथील अभ्यासिकेला २०० ग्रंथांची भेट देत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले. …वाचा सविस्तर
12:22 (IST) 27 Oct 2025

नाराज विकास म्हात्रे म्हणतात ‘धन्यवाद भाजप’ माझ्या राजीनाम्यामुळे रस्ते कामे मार्गी लागली

भाजपचे गरीबाचावाडा प्रभागातील ज्येष्ठ माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचे वरिष्ठ, स्थानिक नेते आपल्याकडे विकास कामे मार्गी लावण्यासाठी लक्ष देत नाहीत या कारणावरून भाजप सदस्यत्वाचा सपत्नीक राजीनामा दिला आहे. …सविस्तर बातमी
12:13 (IST) 27 Oct 2025

जे पुण्यात घडले, ते कुठेही घडू शकते… नाशिकमधील मोर्चात जैन समाजाचा सूचक इशारा

पुण्यातील जैन बोर्डिग जमीन बेकायदेशीर विक्री व्यवहाराच्या विरोधात सकल जैन समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. …सविस्तर बातमी
12:00 (IST) 27 Oct 2025

शहापूरच्या कन्येची इस्त्रोमध्ये झेप; परिवहन मंत्री, परिवहन विभागाकडून सन्मान

ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. …सविस्तर वाचा
11:45 (IST) 27 Oct 2025

बालभारतीकडून पुस्तकांसाठी निकृष्ट दर्जाच्या कागदाचा वापर; जनहित याचिकेद्वारे आरोप, तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

या याचिकेवर तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही. परंतु, नियमित न्यायालयासमोर याचिका सुनावणीसाठी येईपर्यंत त्यात उपस्थित मुद्द्यांवर आणि सूचनांवर प्रतिवाद्यांनी विचार करावा, असे आदेशही न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने दिले. …सविस्तर वाचा
11:33 (IST) 27 Oct 2025

शिक्षक म्हणून करिअर घडविण्याची इच्छा? मग, ही संधी तुमच्यासाठीच…

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य झाले आहे. टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 27 Oct 2025

मुंबईत भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन; रोहित पवारांनी मागितले स्पष्टीकरण

“राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना आज मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन ची ९९ वर्ष लीजवर घेतलेली जागा असून इमारत धोकादायक आहे असे दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याची चर्चा आहे. एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणात रोष असताना भाजपा कार्यालयाच्या जागेबाबतच चर्चा सुरु असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे भाजपा नेत्यांनी यावर खुलासा करणे योग्य राहील, ” असे रोहित पवार म्हणाले आहेत.


10:41 (IST) 27 Oct 2025

चंद्रपूर : कापसी कालवा नुतनीकरणात १० कोटींचे नुकसान; कंत्राटदाराच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क…

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आसोलामेंढा प्रकल्पाच्या कापसी कालव्याच्या नुतनीकरणाची ४१ कोटीची निविदा होती. मात्र कंत्राटदारांच्या स्पर्धेत ३१ कोटींत हे काम संबंधित कंत्राटदारास देण्यात आले. …सविस्तर वाचा
10:41 (IST) 27 Oct 2025

CIDCO: सिडकोच्या स्वप्नपूर्ती घरातील नागरिकांची स्वप्न पाण्यात….! ऐन दिवाळीत नागरिकांचे पाण्यावाचून हाल

सिडकोच्या वतीने पनवेल परिसरात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, उलवे या परिसरात एक लाख घरांची उभारणी केली आहे. याच सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. …वाचा सविस्तर
10:41 (IST) 27 Oct 2025

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वप्नातील रिंग रोड खड्ड्यात…!

राष्ट्रीय महामार्गावरील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावापासून सुरू होणारा प्रस्तावित रिंग रोड फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, कुसुंबा, मोहाडी आणि सावखेडा मार्गे पुन्हा पाळधीला जोडला जाणार होता. …अधिक वाचा
10:41 (IST) 27 Oct 2025

‘‘सध्या मराठीकडे दुर्लक्ष’’ भाजपच्याच खासदार असे का म्हणाल्या ?

राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मराठी भाषेकडे वाढत्या दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त करत, लिखित भाषेशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले. …सविस्तर वाचा
10:41 (IST) 27 Oct 2025

ठाण्यात शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान, म्हणाले, “आम्हाला सोडून गेलेल्यांचे पानिपत केल्याशिवाय…’’

कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची काही महिन्यांपूर्वी साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कळव्यात शरद पवार गटाची ताकद कमी झाल्याचे चित्र होते. …सविस्तर बातमी

Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर