Maharashtra News Today, 11 September 2025: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आधी मराठा आंदोलन व मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे वातावरण तापल्यानंतर आता ओबीसी समाजानं मराठा आरक्षणासंदर्भातल्या सरकारच्या जीआरला विरोध केल्यामुळे नव्या आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात सध्या दुबईत चालू असलेल्या आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे या सामन्यासमोर राजकीय विरोधाचं संकट उभं राहिल्याचं दिसत आहे.
Marathi News Live Updates Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा
वसईत सशस्त्र दरोड्याचा कट उधळला; ११ आरोपींना देशी पिस्तुले आणि जिवंत काडतुसासह अटक
एटीएम फोडणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड जाळ्यात, उत्तर प्रदेशातील चौघे फरार
Thane News : कोपरी वॉटर फ्रंट प्रकल्पाची दुरावस्था
Nagpur Central Jail Violence: मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा, पुण्यातील कुख्यात गुन्हेगाराची दादागिरी
शासकीय मुकबधीर विद्यालयाचे काम रखडले
मंगळवार ठरला घातवार; भिवंडी, आसनगाव ते कर्जत दरम्यान रेल्वे अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू
Ashram School Exploitation: महिला अधीक्षकांनी चक्क आश्रमशाळेतील मुलींना लावले घरकामाला
Thane Zilla Parishad: ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद, साडेतीन हजारांहून अधिक नागरिकांना मिळाले घरपोच दाखले
अदानी समुहाची कोळसा खाण, जनसंतापातही नेत्यांचा श्रेयवाद… भाजप-काँग्रेसमध्ये…
मुंबई : मालमत्ता कर थकवणाऱ्या पाच थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव होणार, स्थावर मालमत्तांचा प्रथमच लिलाव
सिंधुदुर्ग:पश्चिम घाटातील आंबोलीत दुर्मिळ देवगांडूळ: अस्तित्वासाठी धडपड!
पुण्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले कितीही आघाड्या…!
Ind vs Pak Asia Cup Match: “जावेद मियाँदाद जेव्हा घरी आला, तेव्हा बाळासाहेबांनी…”, भारत-पाक सामन्याला ठाकरे गटाचा तीव्र विरोध!
‘एम्स’ चे संचालक जाहीर, खासगी संस्थेतून नियुक्त हे पहिलेच डॉक्टर, वैद्यकीय वर्तुळात आनंदोत्सव
Video : बहिरंगेश्वर मंदिर परिसर बनला मुंबईचा जुहू बीच; सर्वत्र विखुरलेल्या पीओपीच्या मूर्ती…
अदानीच्या कोळसा खाणीसाठी वाघांच्या “कॉरिडॉर” चा बळी..!
अटकेविरोधात माजी आयुक्त अनिलकुमार पवार उच्च न्यायालयात… दोन वेळा हल्ला झाल्याचा पवारांचा दावा
जळगावात कपाशीवर लाल्या… ३० ते ४० टक्क्यांनी उत्पादन घटण्याची चिन्हे!
नगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची प्रतीक्षा
Ind vs Pak Asia Cup 14th September: भारत पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरे गटाचं १४ तारखेला आंदोलन
भाजपावाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत सामना पाहायला जाणार आहेत. जय शाह तर क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. भाजपावाले विरोधकांना राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात. बाळासाहेब ठाकरेंनी भारत-पाकिस्तान सामन्याला कायम विरोध केला. जावेद मियाँदाद घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं की चहा प्यायचा आणि निघून जायचं. एकीकडे तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता कसे? लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? तोंडं उघडा की. ते जे बाटगे सरकारमध्ये शिवसेना म्हणून बसले आहेत, बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत-पाकिस्तान सामना होणार नाही. काय करतायत मिंधे? त्यांचे आमदार-खासदार, पुढारी? ज्यांनी तेव्हा खेळपट्टी उखडली होती, तेच त्यांच्या पक्षात गेलेत असं मला कळलं. हा देशद्रोह आहे – संजय राऊत, ठाकरे गट
Ind vs Pak Asia Cup 14th September: भारत पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरे गटाचं १४ तारखेला आंदोलन
उद्धव ठाकरेंनी या सामन्याचा निषेध व्यक्त करून विरोध केला आहे. त्या दिवशी महाराष्ट्राची महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंकू, माझा देश अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. सिंदूर रक्षा अभियान, सिंदूर सन्मान आंदोलन केलं जाईल. त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिला नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवणार आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचं जे समर्थन करतायत, वकिली करतायत त्यांनी आपला अंतरात्मा तपासून पाहावा. हा एक प्रकारे देशद्रोह आहे – संजय राऊत, ठाकरे गट
Ind vs Pak Asia Cup 14th September: भारत पाकिस्तान सामना होणार की नाही? ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. अशावेळी पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे सर्व असली-नकली हिंदुत्ववादी नेते यांनी वारंवार वापरली. पंतप्रधान म्हणाले खून और पानी एकसाथ नहीं बहेगा.. आमचा प्रश्न आहे की खून और क्रिकेट एकसाथ कैसे चलेगा? आमच्या महिलांचं सिंदूर उजाडलेलं इतक्या लवकर कसे विसरलात? सरकारचं सोडून द्या. भाजपा, आरएसएस, बजरंग दल, विहिंप जे भाजपाचे प्रचारक आहेत त्यांची भारत-पाकिस्तान सामन्याविषयी काय भूमिका आहे? हे स्पष्ट करावं – संजय राऊत</p>
Ind vs Pak Asia Cup 14th September: भारत पाकिस्तान सामना होणार की नाही?
भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटानं तीव्र विरोध केला आहे. “१४ सप्टेंबरला अबुधाबी येथे भारत व पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळवला जात आहे. पण लोकभावना विरोधात आहेत. अजूनही पहलगाममध्ये जे २६ निरपराध लोक मारले गेले, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही. अतिरेकी सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर आजही चालू असल्याचं सांगितलं जातं”, असं संजय राऊत म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (file photo)
Marathi News Live Updates Today: वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व स्थानिक घडामोडी