Maharashtra Breaking News Live Updates : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.
या बरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांना मोठा इशारा दिला आहे.‘शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने मी शोधलेत, आता त्या कारखान्यांना मी दाखवतो’, अशा शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान,राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
बुलढाणा नगरपालिकांत महिला राज! अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
गणेश नाईकांवर श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, वयोमानानुसार ते बोलणार, आपण दुर्लक्ष करायचं
नवी मुंबई विमानतळानंतर मुंबईतील टी-१ टर्मिनलचे भवितव्य काय ? काय म्हणाले अदानी समूहाचे अधिकारी…
शास्त्रीनगर रूग्णालयातील सर्प मृत्युप्रकरणाला जबाबदार धरून डाॅक्टर संजय जाधव निलंबित
‘एमपीएससी’तर्फे तब्बल ९३७ पदांसाठी जाहिरात, ६३ हजार ते एक लाखांपर्यंत वेतन
‘भुलाबाई’ला जपण्याचा वसा! आसलगावच्या जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य पुढाकार; ग्रामीण भागातूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर…
‘भुलाबाई’ला जपण्याचा वसा! आसलगावच्या जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य पुढाकार; ग्रामीण भागातूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर…
डोंबिवली, तळोजा एमआयडीसी परिसराचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तास बंद
व्हिडीओ वायरल करायचा असेल तर आता करा, मी सामोरे जाण्यास तयार, गणेश नाईक यांचे शिंदे गटाला थेट आव्हान
मुंबई विद्यापीठाला फिक्कीचा ‘सर्वोत्तम संस्था’ पुरस्कार
महापालिका प्रशासनात तरुण विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी इंटर्नशीप; मुंबई भाजप अध्यक्षांचे तरुण मतदारांना आश्वासन
मुंबईतून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास लांबणार ?
भायखळ्यातील प्राणीसंग्रहालयात बुधवारी जैवविविधतेवर कार्यशाळा
लष्करी भागात बिबट्यांच्या संशोधनासाठी केंद्राला प्रस्ताव; मानव-बिबट सहजीवन चर्चासत्र
विधीमंडळ सभागृह मंत्री, सदस्यांसाठी सुरक्षित नाहीत का? माणिकराव कोकाटे काय म्हणाले…
ॲप आधारित टॅक्सी सेवा ९ ऑक्टोबरला बंद; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय बंद
परतीच्या पावसानंतर… जळगाव जिल्ह्यात विहिरींच्या पाणी पातळीत मोठी वाढ !
बीड : व्याजाच्या पैशासाठी त्रास दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
‘सत्तेची मस्ती दाखवतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार’, शशिकांत शिंदेंची टीका
“मी भलेही आमदार असेल, पण मी माझ्या जनतेबरोबर ज्या ज्या वेळी हिंदीची गरज असेल तेव्हा मी हिंदी बोलतो, मला काहीही फरक पडत नाही”, असं विधान प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की,”सत्तेची मस्ती आहे, दुसरं काय? सत्ता मिळाल्यानंतर आता काही मंत्री सातत्याने चुकीचं बोलतात, काही विधाने करतात. गर्वात बोलून सत्तेची मस्ती दाखवत आहेत, त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार?’, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
अतिवृष्टीतील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरण्याच्या तयारीत…..
नाव खड्ड्यांचे, गाव कुंभमेळा कंत्राटांचे… एकनाथ शिंदे-गिरीश महाजन यांच्यात सुप्त संघर्ष ?
हृदयद्रावक ! तीव्र विद्युत तारेच्या स्पर्शाने मायलेकाचा मृत्यू; विद्युत तारेच्या स्पर्शाने मेलेल्या वासराला पाहण्यासाठी गेले असता…
डाव्या चळवळीचा इतिहास असलेला नगर जिल्हा आता उजव्या विचारसरणीकडे
सोने, चांदीची ऐतिहासिक झेप… जळगावमध्ये आता किती दर ?
‘मनुष्य जीवन सुखी करण्याचे तत्व म्हणजे हिंदुत्व’ संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले, ‘भारतात एकत्रिकरण…’
१४ फुटाचा रासस्तंभ, २८ फुटाचे चक्र, १०५ पदांचे गायन…मुल्हेरचा रासक्रीडा उत्सव आहे तरी कसा ?
गोंदिया: तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
गौणखनिज माफियांना कोण अभय देतं ? मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
फडणवीसांचा दबाव कामाला आला? देशमुखांनी आणला फॉरेन्सिकचा खरा चेहरा समोर
तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
