Maharashtra News Update : करोना काळात मुंबई महापालिकेत खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ठाकरे गटातील सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरीही एसीबीचे छापे पडले आहेत. रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी एबीसीने तपासकार्य सुरू केले आहे. ठाकरे गटाने जनता न्यायालय आयोजित केल्यानंतर या घडामोडी घडल्याने ठाकरे गट आता पुढील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसंच, २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी मुंबईत येणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर सरकार पातळीवरही हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात सरकार काही महत्त्वाचा निर्णय शक्यता आहे. यासह राज्यातील घडामोडी वाचा.
Maharashtra News Today 18 January 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
वर्धा : लहानपणापासून जोपासलेला छंद पुढे विक्रमाकडे नेणारा ठरू शकतो. म्हणून असे म्हणतात की, मुलांच्या आवडीनुसार त्यास घडू दिले पाहिजे. त्यातून जगावेगळा आविष्कार घडू शकतो. येथील चार्वी सचिन गरपाळ या पाचव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीच्या कामाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
भंडारा : जिल्ह्यात सध्या सर्वत्र शंकरपटाची धूम आहे. शंकरपट म्हटले की लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. बैलगाड्यांच्या शर्यतीला पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, शंकरपटादरम्यान अनेक दुर्घटनादेखील घडतात. सध्या सोशल मीडियावर भंडारा जिल्ह्यातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नागपूर: शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे १२ जानेवारीपासून आशा वर्कर व गटप्रवर्तक संपावर आहेत. वारंवार निवेदन व आंदोलन करूनही शासन मागणी पूर्ण करत नसल्याने शेवटी राममंदिर उद्घाटनाच्या दिवशी काळे वस्त्र घालून सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे (सी.आय टी.यू.) अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केली.
नागपूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास लाखोंमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष सायबर गुन्हेगारांनी एका जेष्ठ नागरिकाला दाखवले. ते गुन्हेगाराच्या आमिषाला बळी पडले. जेष्ठांकडून तब्बल अडीच कोटी रुपयांनी फसवणूक केली. सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : खामला परिसरात ‘अमनजेना स्पा-मसाज सेंटर’मध्ये अचानक ग्राहकांची गर्दी वाढायला लागली. तेथे तरुणींसह अल्पवयीन मुलीसुद्धा यायला लागल्या. त्यामुळे संशय आल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून स्पा-मसाज सेंटरच्या नावावर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर छापा घातला.
आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी मीरा भाईंदर, वसई विरारच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ५० लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे झालेल्या कार्यक्रमानंतर नौदलप्रमुखांनी माध्यमांशी संवाद साधला. नौदलप्रमुख म्हणाले, की कोकण किनारपट्टी सुंदर आहे. या भागात लवकरच नौदलाचे एक युनिट स्थापन करण्यात येणार आहे.
दिघा गाव स्थानक तयार झाल्यामुळे ठाणे आणि ऐरोली रेल्वे स्थानकात निर्माण होणारा प्रवाशांचा भार देखील काहीसा हलका झाला आहे.
या शेतकऱ्याला त्याच्या मुलाला भिवंडी येथील वन विभागात नोकरी लागली आहे, असे बनावट नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे.
राजन साळवी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. म्हणाले राजन तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे.
सविस्तर वृत्त वाचा
मुख्य संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीचे मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामुळे चौगुले आणि पाटील कुटुंबात वादही झाला होता.
नाशिक : बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गुजरात राज्यातील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक आणि युवतींनी पुढाकार घेतला आहे. संस्थेकडून किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू असल्याची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी थेट साल्हेर गाठून सर्व युवक-युवतींचे विशेष अभिनंदन केले.
नाशिक – समभाग डिमॅट खात्यात जमा करण्याचा बहाणा करुन संशयितांनी एका वृध्दाच्या खात्यातून तब्बल ११ लाख रुपयांची रक्कम लंपास करत फसवणूक केली आहे. याबाबत सावरकरनगर येथील दामोधर भिडे (८३, ऑस्कर प्राईड) यांनी तक्रार दिली. भिडे यांच्याशी २८ डिसेंबर रोजी संशयितांनी वेगवेगळ्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकावरून संपर्क साधला होता. आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली.
भिडे यांनी घेतलेले बँक ऑफ बडोदाचे समभाग डिमॅट खात्यात जमा करण्याचा बहाणा संशयितांनी करुन त्यांना भ्रमणध्वनीत एक ॲप कार्यान्वित करायला भाग पाडले. नंतर या ॲपच्या आधारे संशयितांनी भिडे यांच्या खात्यातील १० लाख ८४ हजार ५२२ रुपयांची रक्कम परस्पर वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून आर्थिक फसवणूक केली. हे लक्षात येताच भिडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#दावोस येथे सुरू असलेल्या ५४ व्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या उपस्थितीत 'महाप्रित' आणि 'ग्रीन एनर्जी 3000' यांच्यात ४० हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 18, 2024
या करारांतर्गत राज्यातील सौर ऊर्जा धोरणाला अनुसरून सौर ऊर्जा पार्क, पवन… pic.twitter.com/1lIchjQQA4
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे महाशिबीर आणि जाहीर सभेची तारीख समीप येत असतानाच, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करुन सक्रिय झाला आहे. शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्यावतीने मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
नागपूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी तरूणांच्या मतदार नोंदणीसाठी राबवलेल्या ‘ मिशन युवा ‘ उपक्रमाची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड ‘२०२३ ‘ जाहीर झाला आहे.
उरण: प्रवाशांनी प्रारंभीच सुसाट प्रतिसाद दिलेल्या उरण ते नेरुळ आणि बेलापूर लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी ट्रॅव्हल्स अपघतात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
पामबीच मार्गावर पालिकेच्यावतीने मायक्रोसर्फेसिंगचे काम सुरु आहे. परंतु या कामामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई: माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या ‘डीप फेक व्हिडिओ’प्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी एक फेसबुक वापरकर्ता आणि गेमिंग संकेतस्थळाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंदिर आणि तीर्थक्षेत्र स्वच्छता मोहिमांवर लक्ष ठेवण्यासाठी १५ तालुक्यांसाठी १५ अधिकाऱ्यांची नोडल ऑफीसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करताना भाजपाचा हाही हेतू असेल की निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही कारवाई करायची आणि सगळीकडे घबराटीचं वातावरण निर्माण करायचं. जेणेकरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणी उभंच राहिलं नाही पाहिजे. पण भाजपा भ्रमात आहे. ही लढाई जिंकू अथवा मरू अशा परिस्थितीची आहे – सूरज चव्हाण
नवी मुंबई : कोपरखैरणेमधील अंतर्गत भागात बेशिस्त वाहतुकीस चाप बसवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली . यात ३५० जणांवर विविध नियमभंग प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून १ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उरण: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलावात व्यायाम आणि विसाव्यासाठी नागरिक येतात मात्र तलावातील कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे.
करोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीनं केलेल्या तपासाअंती आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग
Maharashtra News Live Today 18 January 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा