नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे महाशिबीर आणि जाहीर सभेची तारीख समीप येत असतानाच, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करुन सक्रिय झाला आहे. शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्यावतीने मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. नंतर गोदा घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आगामी निवडणुकीत नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेला राखायची असेल तर, दिंडोरी मतदारसंघात मित्रपक्षाला मदत करण्याचे सुतोवाच मेळाव्यात करण्यात आले. यावेळी ठाकरे गटावर टीका करण्यात आली.

अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा होण्याचा मुहूर्त साधून ठाकरे गटाने २२ तारखेला काळाराम मंदिरात दर्शन व पूजा आणि गोदावरी काठावर महाआरतीचे आयोजन केले आहे. दुसऱ्या दिवशी राज्यस्तरीय महाशिबीर, सायंकाळी उद्धव ठाकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ही तारीख जवळ येत असताना शिंदे गटाने विविध उपक्रमांनी ठाकरे गटाला शह देण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे. महायुतीतील घटक पक्षात समन्वय साधण्यासाठी संयुक्त बैठक झाल्यानंतर शिंदे गटाने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले. पालकमंत्री दादा भुसे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मेळावा झाला. युवती सेनेचा मेळावा खुटवडनगर येथे पार पडला. साईखेडकर नाट्यगृहात युवकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल
when bjp leader ashish shelar accidently said Sunetra Pawars defeat in Baramati know what happen exactly
Video: …अन् आशिष शेलार म्हणाले, “सुनेत्रा पवारांचा पराभव होणार!”
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”

हेही वाचा…सुधाकर बडगुजर जामीन प्रकरणाची आता शनिवारी सुनावणी

युवा सेनेचे कार्याध्यक्ष सरनाईक यांनी आधीची युवा सेना आणि आताची युवा सेना यातील फरक मांडला. पूर्वी मुंबईत बोलावले जायचे व प्रतीक्षा करावी लागायची. आता आम्ही कार्यकर्त्यांना थांबवत नाही. वाट बघायला लावत नाही, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांचा नामोल्लेख न करता हाणला. पूर्वी फलकावर कुणाचे छायाचित्र लावायचे हे ठरायचे. आता मात्र आम्हाला फलकावर छायाचित्राची अपेक्षा नाही. आम्हाला पूर्वीसारख्या गोष्टी करायच्या नाहीत. आम्हाला कोल्ड कॉफी, सॅण्डविच लागत नाही. आपल्याला संघटनात्मक बांधणी करायची असून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला महत्वाचे पद मिळेल, असे सरनाईक यांनी नमूद केले. यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे, राज्य समन्वयक नितीन लांडगे, युवासेना उत्तर महाराष्ट्र निरीक्षक अभिषेक चौधरी, सिद्धेश अभंगे यांच्यासह नाशिक लोकसभा विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख अंबादास जाधव, रुपेश पालकर आदी उपस्थित होते.

गोदाघाटाची स्वच्छता

मेळाव्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते थेट गोदाघाटावर पोहोचले. गोदा घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला जानेवारी महिना अखेरपर्यंत शहरात सर्वत्र मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत गोदावरी नदीचीही स्वच्छता हाती घेण्यात आली आहे.

हेही वाचा…भाजपला रोखण्याचे आव्हान, महाविकास आघाडीत वादच सुरू

ठाकरे गटावर टिकास्त्र

पालकमंत्री दादा भुसे यांनी युवा सेनेला शिवसेना सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. शिवसैनिक कसा असावा, हे सांगण्यासारखे काम आनंद दिघे यांनी केले. एवढे काम करणारा जगाच्या पाठीवर आपण बघितला नाही. त्यांच्यासारखे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. यापूर्वी वर्षा बंगल्यावर मोजक्याच लोकांना परवानगी होती. आता मात्र गडचिरोलीवरून आलेली व्यक्तीदेखील मुख्यमंत्र्यांना भेटू शकते. सरकारचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी युवा सेनेने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. दररोज सकाळी काही भोंगे येतात, तिरपी मान करून काही म्हणणे मांडतात. त्यांचे षडयंत्र हाणून पाडण्याची जबाबदारी युवा सेनेवर असल्याचे भुसे यांनी नमूद केले.