Maharashtra News Highlights: मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या. त्याचा जीआरदेखील काढला. शिवाय उर्वरीत दोन मागण्यांबाबत येत्या एक ते दोन महिन्यांत निर्णय घेण्याचंही आश्वासन दिलं. मात्र, यामुळे ओबीसी समाज नाराज झाल्याचं चित्र निर्माण झालं असून ओबीसी नेत्यांनी या जीआरविरोधात कोर्टात जाण्याची तयारी चालू केली आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Today, 05 September 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

21:21 (IST) 5 Sep 2025

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर १६० हरकती; गणेशोत्सवामुळे हरकती नोंदविण्याचे प्रमाण कमी

या प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती. …वाचा सविस्तर
21:09 (IST) 5 Sep 2025

‘वंचित’ नेत्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला; मग समर्थकांनी असे केले की…

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे हे बाहेरगावी होते. शेजारी राहणाऱ्या इंगोले कुटुंबातील एका सदस्याने याचा फायदा घेऊन यश पातोडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. …अधिक वाचा
20:56 (IST) 5 Sep 2025

मतचोरीचा आरोप उलटा काँग्रेसवरच; बावनकुळेंचा सवाल, जिथे पदयात्रा तिथेच मताधिक्य?

काँग्रेसने कामठी येथे ‘वोट चोर गद्दी छोड’ राज्यस्तरीय निधेष मेळावा बुधवारी आयोजित केला होता. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती. …सविस्तर बातमी
20:55 (IST) 5 Sep 2025

Anant Chaturdashi 2025: ठाण्यातील या गणपती विसर्जन मिरवणूकीत उलगडणार…यांचे जीवन चरित्र

ठाणे जिल्ह्यात यंदा ७९४ सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. यंदा ठाणे शहरात देखील मोठ्या उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे ठाणे शहरातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकांचे देखील यंदा आकर्षण असणार आहे. …सविस्तर वाचा
20:37 (IST) 5 Sep 2025

Breaking :राष्ट्रीय ओबीसी महासंघात फूट, काँग्रेस नेत्यांची वेगळी चूल

राष्ट्रीय ओबीसी महासंघ विधानसभा निवडणुकीपासून भाजपच्या जवळ गेल्याची भावना समाजात आहे. त्यामुळे या महासंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषणापासून फारकत घेतली होती. …सविस्तर बातमी
20:24 (IST) 5 Sep 2025

Local train leakage : धावत्या लोकलला गळती; खिडकीच्या वरच्या भागातून पाणी आल्याने प्रवाशांचे हाल

प्रवाशांनी तातडीने डब्यांची दुरुस्ती करावी, देखभाल वाढवावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे. …सविस्तर बातमी
20:12 (IST) 5 Sep 2025

मराठा समाजाला ‘ त्या ’ शासननिर्णयामुळे ओबीसींमध्ये मुक्तद्वार; नाराज छगन भुजबळांचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

राज्य सरकारने नव्याने किंवा सुधारित शासननिर्णय जारी करुन सरसकट कुणबी दाखले देण्यास प्रतिबंध करावा, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा भुजबळ यांनी दिला. …सविस्तर वाचा
19:51 (IST) 5 Sep 2025

चारित्र्यावर संशय; जंगलात गळा दाबून पत्नीचा खून…

या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. …सविस्तर वाचा
19:45 (IST) 5 Sep 2025

उपनगरीय रेल्वेतून विटावा खाडीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

या घटनेची माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१- अग्निशमन वाहनासह आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान १ बससह घटनास्थळी दाखल झाले. …सविस्तर बातमी
19:36 (IST) 5 Sep 2025

वसईच्या ऐतिहासिक माणिकपूर चर्चचे नूतनीकरण; ४१९ वर्षांच्या समृद्ध वारशाचे जतन

वसईच्या माणिकपूर गावातील ऐतिहासिक संत मायकल चर्चचे नुकताच नूतनीकरण करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
19:25 (IST) 5 Sep 2025

महापालिकेचे ‘डिस्टेंसिंग’चे आदेश पायदळी, मुनगंटीवार-जोरगेवार गटांत ‘मांडव’वरून ‘तांडव’ची भीती बळावली!

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी दोन्ही गटांच्या मांडवात केवळ दहा फुटाचेच अंतर असल्याने या संघर्षाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत. …सविस्तर वाचा
19:11 (IST) 5 Sep 2025

मूर्ती, निर्माल्य संकलनासाठी सामाजिक संस्था, संघटनांचा पुढाकार

नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर येथील बालाजी मंदिराजवळील धबधब्याजवळ “निर्माल्यातून फुलाकडे” हा उपक्रम शनिवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी राबविण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
18:36 (IST) 5 Sep 2025

“लक्ष्मण हाकेंना अटक करा,” मनोज जरांगे समर्थकाची मागणी; खामगाव पोलिसांत…

लक्ष्मण हाके यांच्यावर याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. …अधिक वाचा
18:29 (IST) 5 Sep 2025

जळगावमध्ये गणेश विसर्जनाची जय्यत तयारी…

मेहरुण तलावावरील गणेश घाट आणि सेंट टेरेसा शाळेजवळील काठावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
18:02 (IST) 5 Sep 2025

‘पडघा कुठे आहे’ विचारून कल्याणमध्ये दुचाकी स्वाराची सोन्याची साखळी हिसकावली

गुरुवारी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान कल्याण पूर्वेतील म्हात्रे नाका भागातील सागर हाॅटेल भागात ही घटना घडली आहे. ४५ हजार रूपयांची सोन्याची साखळी चोरीला गेली आहे. …सविस्तर बातमी
17:51 (IST) 5 Sep 2025

विदर्भातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे ‘हे’ महाविद्यालय राष्ट्रीय मानांकनात…

महाराष्ट्रातून केवळ तीन महाविद्यालयांना या अव्वल १०० च्या यादीत स्थान मिळाले असून, पुण्याचे फर्ग्युसन आणि मुंबईचे झेवियर्स महाविद्यालयाच्या सोबत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाने आपला ठसा प्रभावीपणे उमटवला आहे. …वाचा सविस्तर
17:38 (IST) 5 Sep 2025

Thane News : ठाण्यात महिन्याभरात पाळीव प्राण्यांसाठी तीन ठिकाणी स्मशानभूमी

पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली. …अधिक वाचा
17:28 (IST) 5 Sep 2025

Anant Chaturdashi 2025 : गणपती विसर्जन २०२५ : ठाणे जिल्ह्यात उद्या ४४ हजार ३२९ गणेश मूर्तींचे होणार विसर्जन

यंदा ठाणे जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी ४४ हजार ३२९ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ७९४ सार्वजनिक तर, ४३ हजार ५३५ घरगुती गणपतींचा समावेश आहे. …अधिक वाचा
17:11 (IST) 5 Sep 2025

ठाणेकरांनो घोडबंदर मार्ग टाळा अन्यथा वाहतुक कोंडीत अडकाल, खड्डे, वाहने बंद पडल्याने घोडबंदर मार्गावर भीषण कोंडी

शुक्रवारी सकाळी मिरा भाईंदर क्षेत्रातील करपे कंपाऊंड येथे तीन वाहने अचानक बंद पडल्या. येथील वाहने पोलिसांनी यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला केली. …वाचा सविस्तर
17:00 (IST) 5 Sep 2025

मोठी बातमी! ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजातच दोन गट; मुख्यमंत्र्यांची भेट घेत मुधोजीराजे भोंसलेंनी…

श्रीमंत राजे मुधोजी भोंसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी मराठांना ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. …वाचा सविस्तर
16:47 (IST) 5 Sep 2025

ठाकुर्लीतील गणेशोत्सवात वाहतूक कोंडीने गजबजलेल्या रेल्वे स्थानकांचा देखावा

आजुबाजुला घडणाऱ्या घडामोडी, वास्तवदर्शी देखावे उभे करण्यावर सजावटकार रूपेश राऊत आणि सहकाऱ्यांचा दरवर्षी भर असतो. …सविस्तर बातमी
16:40 (IST) 5 Sep 2025

Kdmc Ward Structure :कल्याण डोंबिवली पालिका प्रभाग रचनांवर २६४ हरकती दाखल; हरकतींंवर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी

kalyan dombivli municipal corporation ward division news : पालिकेची १२२ प्रभागांची प्रारूप यादी प्रसिध्द होताच नागरिकांना २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना घेण्यासाठी अवधी देण्यात आला होता …सविस्तर वाचा
16:37 (IST) 5 Sep 2025

Rain update : ठाणे शहरात सकाळपासून पावसाची संततधार

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत ४१.६४ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
16:25 (IST) 5 Sep 2025

Anant Chaturdashi 2025 : अनंत चतुर्थीनिमित्त कल्याण डोंबिवलीत बाराशे पोलिसांचा बंदोबस्त…

कल्याण, डोंबिवलीत एकूण १७३ सार्वजनिक आणि १४ हजार ३१० खासगी गणपती आहेत. शहर परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, गणपती विसर्जनाचे मिरवणुक मार्ग, विसर्जन घाट, शहरातील मुख्य चौक भागात पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. …सविस्तर वाचा
16:16 (IST) 5 Sep 2025

डोंबिवलीत तलाठी कार्यालयाचे कुलूप तोडणाऱ्या देशभक्त तरूणाला खावी लागली तुरूंगाची हवा

विक्रम प्रधान असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मंत्रालयात कंत्राटी शिपाई म्हणून काम करतो. …अधिक वाचा
16:06 (IST) 5 Sep 2025

mumbai threat : मुंबईत मानवी बॉम्बची धमकी, ठाणे पोलीस अलर्ट मोडवर; रेल्वे स्थानक परिसर, गणेश मंडळ, गर्दीच्या ठिकाणी तपासणी

मुंबई वाहतूक पोलिसांना शुक्रवारी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर धमकीचा संदेश मिळाला असून पाठवणाऱ्याने दावा केला आहे की, ३४ वाहनांमध्ये ४०० किलो आरडीएक्स असलेले ३४ “मानवी बॉम्ब” ठेवण्यात आले आहेत. …सविस्तर बातमी
15:58 (IST) 5 Sep 2025

Video : वाघिणीच्या बछड्यांनी अडवून धरली दोन्ही बाजूची वाहतूक…

मोहर्ली मार्गावरचा अलीकडचाच एक व्हिडिओ समोर आला आहे, यात वाघिणीच्या बछड्यांनी चक्क दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली आहे. …वाचा सविस्तर
15:56 (IST) 5 Sep 2025

Ajit Pawar IPS Viral Video: अजित पवारांनी दिलं त्या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे – अजित पवार, उपमुख्यमंत्री

15:50 (IST) 5 Sep 2025

गडकरींच्या सांस्कृतिक महोत्सवातील सामूहिक गीता पठण जिल्हाधिकारी रद्द करणार का ?

३ सप्टेंबर २५ रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निखील भुयार व माध्यमिक शिक्षणाधिकारी गौतम गेडाम यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना ९ व १० सप्टेंबर रोजी उपस्थित राहणे बाबत एक आदेश काढला. …अधिक वाचा
15:45 (IST) 5 Sep 2025

Ajit Pawar Officer Viral Video: अजित पवार रागवत नाहीत, त्यांचा आवाजच तसा आहे – सुनील तटकरे

एकतर अजित पवारांची तशी शैली आहे. त्यांचा त्या प्रकारचा आवाज आहे. त्यामुळे अशा आवाजात बोलले म्हणजे ते ओरडत आहेत असं जर कुणी म्हणत असेल, तर गेल्या ४० वर्षांत अजित पवार कुणाला कळले नाहीत असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा आवाजच तसा आहे. आम्ही जरी एकत्र बसलो असलो, तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्यामुळे त्याचा अर्थ हा नाही की ते रागावले आहेत. अजित पवारांचा मोठेपणा आहे की ते त्या महिला अधिकाऱ्यांचा क्रमांक मागत आहेत. ते असंही म्हणू शकले असते की मी तुमच्या कार्यालयाला फोन करून तुमच्याशी संपर्क करतो. पण त्याऐवजी अजित पवारच त्यांचा नंबर घेऊन त्यावर फोन करतात – सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट

मराठ्यांमध्ये संभ्रम, ओबीसींमध्ये खदखद; मनोज जरांगे यांची फसवणूक झाल्याची भावना (File Photo)

Maharashtra Latest News Today, 05 September 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी