Maharashtra Live News Updates, 23 October 2025: राज्यात येत्या काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काँग्रेसचे काही नेते ठाकरेंशिवाय निवडणुकीत उतरण्याची भाषा करू लागले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी महायुती स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Maharashtra Marathi News Live Updates 23 Oct 2025
“नेत्यांवर निष्ठा ठेवणे बंद करा,” बच्चू कडू असे का म्हणाले?
नागपूर जिल्ह्यात एकाच घरातील ४९ मतदार असे आले समोर
“बळीचं राज्य म्हणजे संविधानाचं राज्य, मात्र आजचे सत्ताधारी…” जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले? वाचा…
MMR Development: सविस्तर…. मुंबईच्या निवडणुकीत तिसऱ्या, चौथीचीच चर्चा
भाजपने शिंदे गटाच्या गळ्याभोवती फास आवळला… पाचोऱ्यात मोठ्या घडामोडींना वेग !
नवी मुंबई महापालिकेची दिवाळी सणात रात्री ११ पासून पहाटे ३ वा पर्यंत विशेष स्वच्छता !
Maharashtra News Live Update: “आम्हाला मुंबई अदाणींच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे”, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेसमधील काही नेत्यांनी काँग्रेसने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह निवडणूक याप्रकारे लढवावी अशी भावना व्यक्त केली आहे. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपाला पराभूत करून राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “काँग्रेस हा इंडिया आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आहे. या दोन्ही आघाड्या या एकाच पक्षामुळे निर्माण झाल्या नाहीत. यामध्ये काँग्रेसबरोबर अनेक पक्ष आहेत. आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या मित्रपक्षांना अडचणीत येणारी भूमिका घेणार नाही. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अदाणींच्या घशात घालण्यापासून वाचवायचीआहे.”