Maharashtra Breaking News Updates, 08 October 2025 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज (बुधवार, ८ ऑक्टोबर) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असून यानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित असतील. या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल. या कार्यक्रमात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा, भाषणांचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
दुसऱ्या बाजूला, शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून दोन्ही गटांमध्ये (ठाकरे व शिंदे) चालू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याचा निर्णय आज होऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडेही आपलं लक्ष असेल. यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वक्तव्यांचा आढावा आपण घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
राज्यातील नवनियुक्त शिक्षकांना ऐन दिवाळीच्या सुटीतही काम…नेमके काय होणार?
प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांतही त्रुटी; सीएचबी, कंत्राटी शिक्षक, नवे पात्रताधारक वंचित राहण्याचा आक्षेप
पुण्यातील बंद भिडे पूल दिवाळीत खुला करण्याची कोणी केली मागणी ?
आठवड्याची मुलाखत : मानसिक आरोग्यासाठी मनाचे ऐकणे महत्त्वाचे!
PM Modi Mumbai Visit : मोदींनी मांडला स्वस्तात विमान प्रवासाचा मुद्दा, २०१४ च्या स्वत:च्याच विधानाचा केला उल्लेख; म्हणाले…
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत ५१६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, आमदारांच्या आरोपाने खळबळ
नवी मुंबई विमानतळ चमकले, नागपूर रखडले, विमानतळ विकासाला ब्रेक कुणाचा?
महाबळेश्वरमधून आंबट-गोड गुजबेरीची आवक; किरकोळ बाजारात ४०० ते ६५० रुपये किलो
Gautami Patil : गौतमी पाटील का म्हणाल्या, ‘मंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘ते’ प्रकरण….
महिलांचेच वर्चस्व! भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिकांचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
शिरूर-कर्जत- उरण नव्या रस्त्याला गती; पुण्यासह पिंपरी-चिंचवडची वाहतूक कोंडी फुटणार
मुंबईतील व्यापाऱ्यांचा मराठवाड्यातील पूरग्रस्तांना हात
आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी! राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन…
१९ ते २३ जानेवारी दरम्यान ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धा
Pune Crime News: पिंपरी : खेडमध्ये तरुणावर कोयत्याने वार
पूरग्रस्तांसाठी डोंबिवलीतील गणेश मंदिरातर्फे मदतीचे आवाहन; कल्याण, डोंबिवलीतून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ
वायू प्रदुषणामुळे अंबरनाथकरांचा श्वास गुदमरला; रात्रीच्या वेळी रायासनिक दुर्गंधीमुळे खिडक्या लावण्याची वेळ
ठाणे : वागळेतील कोंडी टाळण्यासाठी वाहतुक बदल
“नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई, तर चौथी मुंबई…”, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; वाचा नेमकं काय म्हणाले
अगोदर हात ओले करा…मगच मालमत्तांना कर लावून घ्या; कल्याण डोंबिवली पालिका काही प्रभागांमधील कर विभागातील परिस्थिती
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील नारा वस्ती परिसरात प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छत्री (छेत्री) याची मंगळवारी (७ ऑक्टोबर) रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. प्रियांशूने नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या झुंड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशूवर काही अज्ञात इसमांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रियांशूचा स्थानिक पातळीवर काही गुन्हेगारी घटकांशी वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, हत्येमागील नेमका हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी ध्रुव शाहू याला अटक केली असून घटनेचा सर्वांगाने तपास करत आहेत, अशी माहिती जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण क्षीरसागर यांनी दिली.
एक मंत्री स्वतःला शेतकरी म्हणवतो आणि कल्याणला जायचे असेल तर हेलिकॉप्टर मधून फिरतो, राजन विचारे यांची टीका
कर्मचाऱ्यांची पाठ, पंतप्रधानांचे निमित्त आणि कल्याण डोंबिवली पालिकेचा वर्धापनदिन रद्द
जळगाव बाह्यवळण महामार्गावरील पथदिव्यांमुळे अपघाताचा धोका… वाहनधारकांना मनस्ताप
कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला आहे. परंतु, घायवळला पुण्यातून परदेशात पळून जायला कोणी रसद पुरवली यावर चर्चा चालू आहे. अशातच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की भाजपाच नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घायवळला रसद पुरवली होती.
धंगेकर म्हणाले, कोथरूडमधील गुन्हेगारी, निलेश घायवळ प्रकरणी, पासपोर्टची छेडछाड, सरकारी कागदपत्रांमध्ये छेडछाड करणाऱ्यांना समीर पाटील मदत करतोय. हा समीर पाटील मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे.