बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत, जे चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर लवकरच त्यांचे ब्रेकअप झाले. असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांचे नाते तुटल्यानंतर पुढे गेले; परंतु ब्रेकअपनंतर कधीही एकमेकांबरोबर काम केले नाही. चला तर मग बॉलीवूडमधील अशाच काही जोडप्यांबद्दल आम्ही तुम्हला सांगतो.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन
सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट एकत्र केला होता. मात्र, त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि त्यांच्यात खूप भांडणे झाली. त्यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही. नंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. सलमान खान अजूनही अविवाहित आहे. ऐश्वर्याने पत्रकार परिषदेत असेही म्हटले होते की, ती कधीही सलमानबरोबर काम करणार नाही.
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचे लग्न मोडले. दोघांनीही यापूर्वी ‘हाँ मैंने भी प्यार किया’ चित्रपटात काम केले होते. करिश्मा व अभिषेक पाच वर्षे एकत्र होते आणि ते लवकरच लग्न करणार अशा चर्चा होत्या, पण त्याचदरम्यान त्यांचा साखरपुडा मोडल्याची बातमी आली होती.
हृतिक रोशन आणि कंगना रणौत
हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांनी ‘क्रिश ३’मध्ये एकत्र काम केले होते. कंगना यांनी दावा केला होता की, ते प्रेमात पडले होते. हृतिकने हे कधीही स्वीकारले नाही. परंतु, कंगनाने त्याला एक मूर्ख एक्स बॉयफ्रेंडदेखील म्हटले होते. या वादानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही.
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू
जॉन आणि बिपाशा नऊ वर्षे एकमेकांना डेट करत होते. प्रेक्षकांनाही त्यांची जोडी आवडली. पुरस्कार समारंभ आणि पार्ट्यांमध्येही दोघे एकत्र दिसायचे. जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांनी ‘जिस्म’ चित्रपटात काम केले होते. दोघेही अनेक वर्षे एकत्र होते; परंतु नंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या नात्याबद्दल अनेक बातम्या आल्या होत्या. दोघांनीही ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आणि ‘धडकन’मध्ये काम केले होते. एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. पण असे म्हटले जाते की, अक्षयला त्याच्या पत्नीने चित्रपटात काम करू नये, असे वाटत होते. परंतु, शिल्पा स्वतःला एक यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहू इच्छित होती. अशा परिस्थितीत शिल्पा आणि अक्षयचे हे नाते तुटले. त्यानंतर अक्षयने ट्विंकलशी लग्न केले आणि शिल्पाने राज कुंद्राशी लग्न केले. ब्रेकअपनंतर दोघांनीही कधीही एकमेकांबरोबर काम केले नाही.