Nagpur Breaking News Today 14 July 2025: मुंबईतील विक्रोळी वाहतूक विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे ही घटना घडली. शंकर कोळसे असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पायाच्या दुखण्याला कंटाळून त्यांनी ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली स्थानकात घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नागपूर शहरात नियोजन शुन्य कारभार, अपुऱ्या सुविधा, पायाभूत सुविधांची कमतरता, रस्ते, वीज, पाणी सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव, अरुंद रस्ते, बेशिस्त वाहतूक, त्यामुळे होणारी अनागोंदी अशा विचित्र कोंडीत नवे शहर अक्षरशः बकाल झाले आहे. 

तेव्हा मुंबई महानगरसह पुणे आणि नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur  News Updates in Marathi

00:42 (IST) 15 Jul 2025

राज्यातील १२ महसूल अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती

मुंबई; राज्य महसूल प्रशासन सेवेच्या निवड श्रेणीतील बारा अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत(आयएएस) पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिसूचना निर्गमित केली आहे. राज्यातील ज्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे त्यामध्ये विजयसिंग देशमुख, विजय भाकरे, त्रिगुण कुलकर्णी, गजानन पाटील,  महेश पाटील पंकज देवरे, मंजिरी मनोळकर, आशा पठाण, राजलक्ष्मी शहा, सोनाली मुळे, गजेंद्र बावणे आणि प्रतिभा इंगळे यांचा समावेश आहे.

23:50 (IST) 14 Jul 2025

पुणे-दिल्ली विमानात उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड, धावपट्टीवरून विमान माघारी; नऊ तास विलंबाने उड्डाण

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे दिसताच वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून धावपट्टीवरूनच विमान माघारी वळविल्याची घटना रविवारी घडली. …अधिक वाचा
23:40 (IST) 14 Jul 2025

पिंपरीच्या विकास आराखड्यावर ५० हजार हरकती

आता हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी पाच सदस्यांची नियाेजन समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
23:28 (IST) 14 Jul 2025

पुणे महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत माहिती

‘पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित निविदा प्रक्रिया पाच ते सात टक्के जास्त दराने आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
21:28 (IST) 14 Jul 2025

मुंबईकरांचे सुंदर व मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

राज्यातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती मिळून मुंबईकरांचे सुंदर व मोठ्या घराचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. …सविस्तर बातमी
20:50 (IST) 14 Jul 2025

गर्भश्रीमंत एमआयडीसी तोट्यात; तोटा का झाला आणि किती कोटींचा?

गर्भश्रीमंत महामंडळ असा लौकिक असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तोट्यात गेले आहे, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली. …अधिक वाचा
20:17 (IST) 14 Jul 2025

‘एनईपी’च्या अंमलबजावणीबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; कोणत्या विद्यार्थ्यांना करावा लागणार सेतू अभ्यासक्रम?

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार शालेय शिक्षणाची पायाभूत, पूर्वमाध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशी ५-३-३-४ अशी रचना प्रस्तावित करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
20:05 (IST) 14 Jul 2025

विद्यार्थी आणि गृहिणीचा मृत्यू; एकाच परिसरात आत्महत्येच्या दोन घटना

लता आशीष कोहळे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ख्वाहिश देवराम नागरे (१६) असे मृत मुलाचे नाव आहे. …वाचा सविस्तर
19:55 (IST) 14 Jul 2025

विधानसभाध्यक्षांवर ठाकरे गटाच्या आमदाराचे गंभीर आरोप, ठिय्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यावर कारवाई

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी संगणक चालक पदावरील महिलेचा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी कार्यालयात आज, सोमवारी ठिय्या आंदोलन केले. …वाचा सविस्तर
19:42 (IST) 14 Jul 2025

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चार वाहनांची धडक; वाहतूक सेवा विस्कळीत

या अपघाताच्या घटनेमुळे मुंबई वाहिनीवरील वाहतूक सेवा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. …अधिक वाचा
19:37 (IST) 14 Jul 2025

दरोड्याचा प्रयत्न फसला; सात आरोपींना अटक

दरोडेखोर हे तोंडाला रुमाल बांधून चेहरा झाकलेल्या अवस्थेत लोखंडी रॉडने दरवाजा तोडत होते, तसेच त्यांच्या हातात चिकटपट्टी व अग्निशस्त्र होते. …अधिक वाचा
19:30 (IST) 14 Jul 2025

ट्रॅक्टर अचानक उलटून भीषण अपघात; एका युवकाचा मृत्यू, पाच जण जखमी

या अपघातात अनिकेत सुनील मुंदाफळे याचा जागीच मृत्यू झाला. इतर गंभीर जखमींना आष्टगावचे सरपंच दर्शन माल्हा व बंडू साउथ यांच्या वाहनातून मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. …सविस्तर वाचा
19:20 (IST) 14 Jul 2025

बच्चू कडूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा; म्हणाले, ‘पक्ष व चिन्ह घेऊन…’

बंडखोरी केली ते ठीक, परंतु त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, या शब्दात त्यांनी शिंदेंवर टीका केली. …सविस्तर वाचा
19:12 (IST) 14 Jul 2025

भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत होणारे ‘ते’ बारा अधिकारी कोण? ‘महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत नवीन अध्याय’

महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील बारा ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेचा म्हणजेच आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली. …सविस्तर बातमी
18:43 (IST) 14 Jul 2025

पुण्यातील टेकड्यांवरील राडारोड्याबाबत वनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!

शहर परिसरातील टेकड्यांवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ठेकेदार बांधकामाचा राडारोडा टाकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. …सविस्तर बातमी
18:41 (IST) 14 Jul 2025

ठाणे पूर्व सॅटीस प्रकल्प कामासाठी हवेत रेल्वेचे दोन तासांचे १४ मेगाब्लाॅक; वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता

साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. …सविस्तर बातमी
18:39 (IST) 14 Jul 2025

कंटेनरखाली येऊन एकाचा मृत्यू; तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, लिफ्ट शेवटची….

गजानन बाबुराव बोळकेकर अस मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. …वाचा सविस्तर
18:19 (IST) 14 Jul 2025

पुणे, पिंपरीतील सराफांची फसवणूक; २२ कॅरेटच्या नावाखाली चार कॅरेटचे सोने गहाण

आरोपींनी बनावट पावत्यांचा वापर करून २२ कॅरेटचे सोने असल्याची बतावणी करून चार कॅरेटचे सोने तारण ठेवून दहापेक्षा जास्त सराफ व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याची माहिती तपासात मिळाली आहे. …वाचा सविस्तर
17:32 (IST) 14 Jul 2025

डोंबिवलीत बेकायदा फलक लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे

पाऊस सुरू असताना कारवाई पथकाने फ प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील विनापरवानगी फलक काढून टाकले. …वाचा सविस्तर
17:26 (IST) 14 Jul 2025

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांचे मंगळवारी आझाद मैदान येथे धरणे

६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांनी या धरणे आंदोलनात अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रहिवाशांनी केले आहे. …सविस्तर वाचा
17:14 (IST) 14 Jul 2025

मुंबईत अनधिकृत बांधकामांवर वचक, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात सुळसुळाट

एकनाथ शिंदे यांचे कडवे समर्थक असलेले लोकमान्यनगर, शास्त्रीनगर भागातील ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी सोमवारी वारंवार तक्रारी करुनही आपल्या भागात बेकायदा बांधकामे सुरुच असल्याचा आरोप केला. …सविस्तर बातमी
17:14 (IST) 14 Jul 2025

चेक बाऊन्स केसमध्ये पालघर कोर्टाचा दुप्पट दंडाचा निकाल; १६ वर्षांनी मिळाला न्याय

बोईसर येथील परवानाधारक सावकार व मूळ फिर्यादी कै. दोरैया स्वामी नलमाटी यांनी आरोपी जगदीश जाधव यांना एक लाख रुपये व्याजाने दिले होते. या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने १,८८,४०० रुपयांचा धनादेश दिला होता. …सविस्तर बातमी
16:58 (IST) 14 Jul 2025

कल्याण, भिवंडीत चौदा लाखांच्या गांजा आणि गुटख्याची तस्करी करणारे पाच इसम अटकेत

पोलिसांनी तस्करी करण्यात येत असलेला सुमारे १४ लाखाचा गांजा आणि गुटखा जप्त केला आहे. तस्करी करणारे बेरोजगार तरूण आहेत. …सविस्तर बातमी
16:53 (IST) 14 Jul 2025

खाजगी नेटवर्क वरून विकासकाला फोनवरुन २ कोटी खंडणीची मागणी

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …अधिक वाचा
16:44 (IST) 14 Jul 2025

करवाढीविरोधात जिल्ह्यातील ३ हजार बार, हॉटेल बंद! राज्यव्यापी बंदला ठाण्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

हा बंद महाराष्ट्र सरकारने आतिथ्य सेवा उद्योगावर लादलेल्या वाढीव करांचा निषेध म्हणून आहार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आला होता. …अधिक वाचा
16:43 (IST) 14 Jul 2025

बोईसर एसटी आगारात बसचा अपघात; चालक जखमी

या अपघातात चालक आदिनाथ कुटे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
16:38 (IST) 14 Jul 2025

Sir J J Hospital Doctor Suicide: घरी जेवायला येतो असं आईला सांगून मुंबईत डॉक्टरची आत्महत्या; कारण आलं समोर

Sir J J Hospital Doctor Suicide: सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर ओमकार कविताके यांनी ७ जुलै रोजी अटल सागरी सेतूवरून उडी मारत आत्महत्या केली होती. …सविस्तर बातमी
15:38 (IST) 14 Jul 2025

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने रचनेमधील विविध निर्वाचक गणांमध्ये किरकोळ बदल सुचविण्यात आली असून याविषयी २१ जुलै पर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे. …अधिक वाचा
15:26 (IST) 14 Jul 2025

विद्यार्थ्यांच्या घोषणांनी विद्यापीठ दणाणले; झाले काय?

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले. त्यातील अभियांत्रिकीच्या निकालात त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. …अधिक वाचा
14:59 (IST) 14 Jul 2025

ठाणे: खड्ड्यांची वाळू रस्त्यावर, अपघाताची भीती

खड्ड्यांमुळे टीका झाल्यानंतर संबंधित प्राधिकरणाने घोडबंदर भागात खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. परंतु काही ठिकाणी वाळूचा वापर करुन तात्पुरते खड्डे बुजविण्यात येत होते. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह १४ जुलै २०२५