-
चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे चित्रपटांव्यतिरिक्त व्यवसायातूनही मोठी कमाई करतात. अनेक स्टार्सचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे जिथून ते खूप पैसे कमावतात. चला जाणून घेऊया या अभिनेत्यांच्या ब्रँडचे नाव काय आहे? (Photo- Anushka Sharma/Instagram)
-
शाहिद कपूर : बॉलीवूड स्टारच्या कपड्यांच्या ब्रँडचे नाव ‘Scalt’ आहे जो त्याने २०१६ मध्ये लॉन्च केला होता. शाहिद कपूरच्या या ब्रँडचे कपडे Myntra, Amazon आणि Flipkart सारख्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर उपलब्ध आहेत. (Photo- Shahid Kapoor/Instagram)
-
हृतिक रोशन : अभिनेत्याचा स्वतःचा HRX नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे जो त्याने २०१३ मध्ये लॉन्च केला होता. (Photo- Hritik Roshan/Instagram)
-
आलिया भट्ट : अभिनेत्रीचा ॲड-ए-मम्मा नावाचा इको-फ्रेंडली फॅशन ब्रँड आहे. तो आलिया भट्टने २०२० मध्ये लॉन्च केले होते. आलिया भट्टचा हा कपड्यांचा ब्रँड २ ते १२ वयोगटातील मुलांचे कपडे बनवतो. (Photo- Alia Bhatt/Instagram)
-
सोनम कपूर : सोनम कपूरही या बाबतीत मागे नाही. अभिनेत्रीने तिची बहीण रिया कपूरसोबत २०१७ मध्ये ‘रीसन’ नावाचा फॅशन ब्रँड लॉन्च केला. (Photo- Sonam Kapoor/Instagram)
-
विजय देवरकोंडा : दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक, विजय देवरकोंडाने २०१८ मध्ये ‘राउडी वेअर’ नावाचा फॅशन ब्रँड लॉन्च केला. (Photo- Vijay Devarkonda/Instagram)
-
सैफ अली खान : अभिनेत्याच्या फॅशन ब्रँडचे नाव हाऊस ऑफ पतौडी आहे जो त्याने २०१८ मध्ये लॉन्च केला होता. (Photo- Saif Ali Khan/Instagram)
-
अनुष्का शर्मा : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील बिझनेसमधून भरपूर कमाई करते. अभिनेत्रीचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. याशिवाय तिचा ‘नुश’ नावाचा कपड्यांचा ब्रँडही आहे. (Photo- Anushka Sharma/Instagram)
-
सलमान खान : बॉलीवूडच्या दबंग खानचा म्हणजेच सलमान खानच्या कपड्यांचा ब्रँड बीइंग ह्युमन आहे जो खूप प्रसिद्ध ब्रँड आहे. ब्रँडची भारतात ९० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत तसेच परदेशातही अनेक ठिकाणी शोरूम आहेत. (Photo- Salman Khan/Instagram)
-
दीपिका पदुकोण: नुकतीच आई झालेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने २०१५ मध्ये Myntra च्या सहकार्याने All About You नावाचा फॅशन ब्रँड सुरू केला. (Photo- Deepika Padukone/Instagram)
विजय देवरकोंडा, शाहिद कपूर ते सैफ अली खानपर्यंत ‘हे’ ९ स्टार्स आहेत प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँडचे मालक
Actors are owners of famous clothing Brands: कोणते बॉलीवूड कलाकार कपड्यांच्या ब्रँडचे मालक आहेत? कोणत्या स्टार्सचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे? जाणून घेऊ
Web Title: From deepika padukone vijay deverakonda to saif ali khan these 9 stars are owners of famous clothing brands spl