Mumbai Marathi News: लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर एक लाखावर गेल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली होती. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशीच बुधवारी (३० एप्रिल २०२५ रोजी) सोन्याच्या दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण – कर्जत विभागातील भिवपुरी रोड – कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. बुधवार ३० एप्रिलपासून रविवार ४ मेपर्यंत फक्त रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Live Updates
Pune Mumbai Nagpur Breaking News Live Today, 30 April 2025 मुंबई, पुणे, नागपूर न्यूज लाईव्ह अपडेट्स
उत्तर प्रदेशात साकारलेला पूल गुजरातमध्ये उभारला, बुलेट ट्रेन प्रकल्पातील पुलांच्या कामांना गती
दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ४८ हा सहा मार्गिकांचा सर्वात व्यस्त महामार्ग आहे. …सविस्तर वाचा
शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट कृषी सेवा केंद्रावर धडक, बियाणे, खतांचा काळाबाजार…
बियाणे, खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते. ती रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त केले.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज शहरातील काही कृषी केंद्रांवर थेट धडक देऊन तपासणी केली.
…सविस्तर बातमी
यवतमाळात १४ पाकिस्तानी नागरिक; देश सोडून जाणार की…
केंद्र सरकारने भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान दिले. यवतमाळ जिल्ह्यात असे १४ नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती या घटनेनंतर मिळाली.
…सविस्तर बातमी
जुगाराचा नाद लय बेक्कार! पठ्ठ्याने आपल्याच घरी केली चोरी; वडिलांच्या तक्रारीनंतर…
घरामध्ये सुरक्षित ठेवलेल्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण २.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची तक्रार येथील एका व्यक्तीने दिली अन् नेमके पोलीस तपासात मुलगाच चोर निघाल्याची माहिती पुढे आली.
…वाचा सविस्तर
नालेसफाई झाली; पण गाळ रस्त्याच्या कडेलाच… गोवंडी – मानखुर्दमध्ये नालेसफाईच्या नियोजनाचा अभाव
पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नालेसफाई करण्यात येते. …वाचा सविस्तर
भंडाऱ्याच्या कलाकाराने अशाही व्यक्त केल्या संवेदना !… काळजाचा ठोका चुकवणाऱ्या थ्रीडी रांगोळीतून रेखाटले चित्र
भंडाऱ्यात एका महिला रांगोळी कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून पहेलगाम येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली.
…अधिक वाचा
बाल मजुरांची सुटका…. वर्षभरात ८७ मुलांची सुटका… बहुसंख्य मुले उत्तर प्रदेश, बिहारमधील…
मुंबई पोलिसांच्या विशेष बालसहाय्य पोलीस कक्षाने (जापू) २०२४ पासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाल मजुरीविरोधात ४० गुन्हे दाखल केले असून या प्रकरणांमध्ये ८७ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे.
…वाचा सविस्तर
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी, तरीही शेकडो कुटुंबांचे स्थलांतरण, पालकमंत्री म्हणतात…
पाण्याअभावी कोरडी ठक्क पडलेल्या या गावातून आहे त्या साहित्यानिशी व आपले पशुधन सोबत घेत पशुपालक शेतकरी वर्ध्यातील अन्य तालुक्यात व अमरावती जिल्ह्यात स्थलांतरित होतात.
…सविस्तर वाचा
मद्यपी पित्याची मुलाकडून हत्या
दारुड्या पित्याची सख्खा मुलाने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात बुधवारी उघडकीस आली.
…सविस्तर वाचा
व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागण्याचे प्रकार वाढीस; लष्कर, स्वारगेट पोलीस ठाण्यात सराइतांविरुद्ध गुन्हे दाखल
लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात एका दुकानदाराला धमकावून त्याच्याकडून १५ हजार ८०० रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. …अधिक वाचा
सरकारी कार्यालयांचीही ‘परीक्षा’,उत्तीर्ण होण्यासाठी हवे १०० पैकी ४० गुण!
कामकाज सुधारण्यासाठी प्रत्येक कार्यालयाला एका परीक्षेलाच तोंड द्यावे लागणार आहे.राज्यातील १२ हजार ५०० शासकीय व निमशासकीय कार्यालये या विशेष मोहिमेंतर्गत सहभागी होत असून प्रत्येक कार्यालयाने १०० पैकी किमान ४० गुण मिळविणे गरजेचे आहे.
…सविस्तर वाचा
पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारी येडगे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार
कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार करण्यात आला.
…अधिक वाचा
भाजपमध्ये प्रथमच शहर, ग्रमीण अध्यक्ष पदासाठी अभिप्राय नोंदणी
भाजपात अंतर्गत गटबाजीमुळे तब्बल ३० वर्षानंतर ग्रामीण आणि महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी अभिप्राय नोंदविण्याची वेळ पक्षावर आली आहे.
…सविस्तर वाचा
अन् वडिलांच्या वृद्धपकाळाचा आधार झाली मुलगी, गैरसमजातून तुटला होता संसार
मुलीच्या लग्नाची तयारी म्हणून एक भूखंड घेऊन ठेवल्याचे सांगून फक्त मला तुमच्या सानिध्यात राहू द्या, आजारपणामुळे शेवटचे काही क्षण कुटुंबात राहण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व ऐकून दोन्ही मुलांनी वडिलांना कवटाळले. मुलीने वडिलाचा आधार बनून त्यांच्या आजारपणाची जबाबदारी घेतली.
…अधिक वाचा
पोलीस चौकशीनंतर युवकाची आत्महत्या, भुसारी हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय
अंबाझरीतील कॅफेसंचालक अविनाश भुसारी हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय आल्याने गुन्हे शाखेने एका युवकाला सूचनापत्र देऊन चौकशीसाठी बोलावले. चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. मात्र, त्या युवकाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
…अधिक वाचा
आता सर्व शाळकरी मुलांची दरवर्षी आरोग्य तपासणी…
राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
…सविस्तर बातमी
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट| मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट