Lok Sabha Election 2024 Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात भाजपासाठी भावनिक वातावरण आहे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा आहे त्यामुळे ते औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर गेले अशी टीका केली. तसंच शरद पवार यांना या वयात घर सांभाळता आलं नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा जवळ आला आहे. आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत त्याला प्रत्युत्तरंही दिली जात आहेत. उद्धव ठाकरेंनी सांगलीतल्या सभेतही हुकूमशाहीचं भूत मानगुटीवर बसेल असं म्हटलं आहे. या आणि इतर घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून-

Live Updates

Marathi News Today, 03 May 2024 “महाराष्ट्रात भाजपासाठी भावनिक वातावरण”, पंतप्रधान मोदींचा दावा, यासह महत्त्वाच्या बातम्या

11:44 (IST) 3 May 2024
मुंबई : शशांक राव यांचा भाजपमध्ये प्रवेश संघटना संभ्रमात

मुंबई : दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे पुत्र कामगार नेते शशांक राव यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राव यांनी हा पक्षप्रवेश केला.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 3 May 2024
कोपर्डी आत्महत्या प्रकरण : दोन आरोपींना अटक; गावात पोलीस बंदोबस्त तैनात

विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने कोपर्डी (ता. कर्जत) येथील दलित तरुणाने आत्महत्या केली, यासंदर्भात तीनपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा सविस्तर…

11:28 (IST) 3 May 2024
प्रचार खर्चात तफावत आढळल्याने सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस

दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येणार आहे.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 3 May 2024
पुणे: ‘आरटीओ’च्या चाव्या मध्यस्थांच्या हाती! अधिकाऱ्यांच्या दालनात थेट प्रवेश; नागरिकांची लूट

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) देण्यात येणाऱ्या अनेक सेवा ऑनलाइन आहेत. असे असतानाही नागरिकांना या सेवा ऑनलाइन मिळत नाहीत.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 3 May 2024
मावळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वा महिन्यात सव्वाकोटीची रोकड जप्त

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 3 May 2024
पुणे: गर्दी वाढताच फुकटे प्रवासी मोकाट! रेल्वेकडून कारवाईचा दंडुका अन् दररोज दहा लाखांचा दंड

लोकसभा निवडणुकीमुळे उत्तरेतील राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांमुळे या गर्दीत आणखी भर पडत आहे. अनेक प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट गाड्यांमध्ये घुसत आहेत.

सविस्तर वाचा…

11:26 (IST) 3 May 2024
धक्कादायक! गृहमंत्र्यांचे गृहशहर नागपुरात दर दिवशी दोन महिलांवर अत्याचार, तीन वर्षांत २६० हत्याकांड

गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या उपराजधानीत दर दिवशी दोन महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचार होत आहे.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 3 May 2024
नागपूर ग्रामीण आरटीओची २०१९ पासूनच्या कागदपत्रांची तपासणी, काय आहे कारण जाणून घ्या…

नागपूर ग्रामीण ‘आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रावरून परराज्यातील वाहन नोंदणी प्रकरणात काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 3 May 2024
सर्व दंत महाविद्यालयांना ‘क्यूसीआय’चे मूल्यांकन बंधनकारक!

केंद्र सरकारच्या अखत्यारितील क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे (क्यूसीआय) मूल्यांकन आता प्रत्येक दंत महाविद्यालयांसाठी बंधनकारक होणार आहे.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 3 May 2024
महात्मा गांधी यांची प्रतीके अन् वर्धा पोलिसांची नाविन्यपूर्ण…

वर्धा : वाढते गुन्हेगारी विश्व पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. नित्य नवे गुन्हे व गुन्हेगार शोधायचे कसे, हे प्रश्न पडू लागले आहे. या अनुषंगाने पोलीस आता सावध झाले आहे. प्रामुख्याने सायबर गुन्हे पोलिसांना अडचणीचे ठरू लागत असल्याचे चित्र पुढे येते.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 3 May 2024
नागपूर : कामगार दिनी १०८ खासगी सुरक्षारक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड !

नागपूर : राज्यात सर्वत्र १ मे रोजी महाराष्ट्र दिनासह कामगार दिन साजरा होत असतानाच नागपुरातील मेडिकल रुग्णालयात १०८ खासगी सुरक्षा रक्षकांचा रोजगार हिरावला आहे. मेडिकल प्रशासनाने एका खासगी एजन्सीची सेवा समाप्त केल्याने या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 3 May 2024
लोकसभा निवडणूक : तिघांपैकी कोणीही जिंकलं तरी… बुलढाणा मतदारसंघातील चित्र

बुलढाणा : यंदाच्या चुरशीच्या लढतीत प्रमुख तीन दावेदारापैकी कुणीही जिंकला तर निकाल मात्र धक्कादायकच ठरणार आहे. दुसरीकडे खासदार जाधव जिंकले तर एक महाविक्रम स्थापन होणार आहे. त्यामुळेही यंदाच्या निकालाची उत्सुकता गगनाला भिडली आहे.

सविस्तर वाचा…

विरोधकांकडून होणाऱ्या संविधान बदलण्याच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (PC : BJP/X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात भाजपासाठी भावनिक वातावरण आहे असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा आहे त्यामुळे ते औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर गेले अशी टीका केली. तसंच शरद पवार यांना या वयात घर सांभाळता आलं नाही असं म्हटलं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.