Maharashtra Monsoon Session 2025 Highlights: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विधीमंडळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका स्पष्ट केली आहे, यावरून रायकीय वर्तुळातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. यासह सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक बातम्यांच्या आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Latest Maharashtra News Live Today : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा एका क्लिकवर…
पेण जवळ नदीत उतरून गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन; आंदोलनात शेकडो ग्रामस्थांचा सहभाग
बिऱ्हाड मोर्चाचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या दारी; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन
भुमरेंच्या वाहनचालकाच्या हिबानामातील अनागोंदी मागे मंत्र्यांचा दूरध्वनीचा आरोप
हनीट्रॅप प्रकरणी विधिमंडळात नाशिकचा उल्लेख, आणि…
अण्णा भाऊंच्या साहित्याचे आणखी तीन खंड सज्ज
काँग्रेसजनांचा असाही मुहूर्त…जनसुरक्षा विधेयकाविरोधात आंदोलन अन् निवडणुकीसाठी परिचयपत्र भरण्याचा कार्यक्रम
उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; कारण कायय़
शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.
Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray meets Chief Minister Devendra Fadnavis at the office of Maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde, reportedly to discuss the Leader of Opposition post pic.twitter.com/b76MkUWbMO
— IANS (@ians_india) July 17, 2025
भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर पनवेलच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना लागू
भाजपकडून ‘पुरंदर’मध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे यांना शह
नवी मुंबईला आता ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये मानांकन
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शिवराय शौर्यगाथेसाठी पोवाडा उपक्रम
Eknath Shinde : “डिनोने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा ‘मोरया’ होईल”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
“ऑनलाईन रमीसारख्या जुगाराच्या आहारी जाऊन काल दोन तरुणांनी आत्महत्या केली. ही केवळ दुःखद घटना नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. ऑनलाईन रमीचे वेड दिवसेंदिवस वाढत असून, अनेक तरुण या आभासी जुगाराच्या विळख्यात अडकत चालले आहेत. त्यांच्या आयुष्याची वाटचाल बरबादीकडे सुरू झाली आहे. कालची घटना ही केवळ वैयक्तिक हानी नाही, तर राज्याच्या भविष्यासाठीही धोक्याची घंटा आहे. याकडे शासनाने आता गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे,” अशी पोस्ट काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एक्सवर केली आहे. याबरोबरच त्यांनी विधिमंडळातील व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
ऑनलाईन रमीसारख्या जुगाराच्या आहारी जाऊन काल दोन तरुणांनी आत्महत्या केली. ही केवळ दुःखद घटना नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. ऑनलाईन रमीचे वेड दिवसेंदिवस वाढत असून, अनेक तरुण या आभासी जुगाराच्या विळख्यात अडकत चालले आहेत. त्यांच्या आयुष्याची वाटचाल बरबादीकडे सुरू झाली… pic.twitter.com/K720IgOdYR
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 17, 2025
जळगाव महापालिकेसाठी भाजपचा निर्धार, अजित पवार आणि शिंदे गटाला धडकी
धुळ्यात लाॅजिस्टिक केंद्र उभारणीसाठी हालचाली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना
पिक विम्याच्या निकषांमुळे पंतप्रधान पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ
पंतप्रधान पिक विमा योजनेकडे राज्यातील तसेच देशातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात देखील हीच परिस्थिती असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहा ते पंधरा टक्केच शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनंतरही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई वेळेत मिळत नाही. एक रुपयातील पिक विमा योजना बंद करून नवीन सुधारित पीक विम्यात अनेक निकष असल्याने अनेक शेतकरी पिक विम्याकडे पाठ फिरवत आहेत.
परिचारीकांचा राज्यव्यापी संप; संपात शासकीय रुग्णालयातील परिचारीकांचा समावेश
आज महाराष्ट्र राज्यात शासकीय परिचारीकांचा राज्यव्यापी संप पुकारला असून, यात नांदेड जिल्ह्यातील परिचारीकांचा सहभागी झाल्या आहेत. यात त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे असून, यात केंद्र सरकार प्रमाणे नर्सिंग भत्ता देण्यात यावा, धुलाई भत्ता वाढवून देण्यात यावा, आमच्या पदनामात बद्दल करण्यात यावा, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, कंत्राटी करण बंद करण्यात यावे, 100 टक्के पदभर्ती करण्यात यावी, जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, पद्दोन्नती करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हा समान्य रूग्णालयासमोर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ नांदेड यांच्याकडून राज्यव्यापी संपात सहभागी होत आंदोलन करण्यात आले.
जळगावात सफाई कंत्राटाचे भिजत घोंगडे; अस्वच्छतेची समस्या आणखी तीव्र
संजय राऊतांनी पोस्ट केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत लवकरत प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वूा या मुलाखतीचा जवळपास दोन मिनिटांचा टीझर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही मुलाखत १९ आणि २० जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
ब्रँड ठाकरे!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2025
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सूपर फ़ास्ट मुलाखत!
सामना
१९ आणि २० जुलै! pic.twitter.com/Hj9eSMRHkO
उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं? राऊतांचे रोखठोक विधान; म्हणाले, “मग काय शिंदेंना…”
विधानभवनात काल अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात उद्धव ठाकरेंनी एकानाथ शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “मग काय शिंदेंना मांडीवर घेऊन बसायला पाहिजे होतं का? उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमान नेते आहेत. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली… ज्यांनी डुप्लिकेट शिवसेना स्थापन केली… जसे पेशवे काळात सदाशीवभाऊ डुप्लिकेट होते , ते पेशवाईत आले. तसंच हे आहे, हे सगळे तोतये आहेत. त्यांच्याबरोबर काय हस्तांदोलन करायचं? महाराष्ट्राला ते आवडलं नसतं,”