Maharashtra Politics Updates नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं कुरण आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह जाब विचारणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे देवाभाऊच्या जाहिरातीवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग फेकण्यात आला त्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात पोलिसांना एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या आणि अशा घटनांवर आपली नजर असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Maharashtra News Live Update : नगरविकास खातं म्हणजे पैसे खाण्याचं कुरण, संजय राऊत यांची टीका; यासह महत्त्वाच्या बातम्या

15:51 (IST) 18 Sep 2025

नगर शहरातील ५ अवैध कत्तलखान्यांची बांधकामे महापालिकेकडून जमीनदोस्त

पोलिसांकडून कारवाई झालेल्या कत्तलखान्यांच्या बांधकामाचा अहवाल महापालिकेकडे यापूर्वीच दाखल करण्यात आला होता. त्यातील ५ पत्र्याच्या शेडची कत्तलखान्याची बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. …वाचा सविस्तर
15:46 (IST) 18 Sep 2025

बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी थांबवा या मागणीसाठी ठाण्यात शेकडो डॉक्टरांचा मोर्चा

मोर्चात ठाणे जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने डॉक्टर्स सहभागी झाले होते. या संपामुळे सर्व रुग्णालयातील बाह्यरुग्णसेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. …सविस्तर बातमी
15:41 (IST) 18 Sep 2025

कागल औद्योगिक वसाहतीत अल्पावधीत वीज उप केंद्राची उभारणी

महावितरणकडून ‘कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन ३३/ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. …अधिक वाचा
15:41 (IST) 18 Sep 2025

प्रवेशाच्या वेळी दिलेली माहितीच अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरावी; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…

उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास आता थांबणार असून, एकदाच दिलेल्या माहितीवर पूर्ण अभ्यासक्रमासाठी लाभ मिळेल. …अधिक वाचा
15:37 (IST) 18 Sep 2025

विवाह प्रमाणपत्र नाही म्हणून महिलेला परीक्षा केंद्रावरून बाहेर काढले, परीक्षा देण्यास मज्जाव

लग्न झालेल्या महिलेकडे ओळखपत्राचा पुरावा म्हणून सर्व प्रकारचे प्रमाणपत्र असतानाही केवळ लग्न झाल्याचे विवाह प्रमापणत्र नसल्याने तिला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. …अधिक वाचा
15:30 (IST) 18 Sep 2025

जून, जुलैतील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९९ लाखांची मदत मंजूर

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून मदत देण्यात येते. …वाचा सविस्तर
15:25 (IST) 18 Sep 2025

शाहूवाडी तालुक्यात ‘एमआयडीसी’ उभारणीसाठी पंधरवड्यात पाहणी, उद्योगमंत्री सामंत यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडीत एमआयडीसी उभारणीची मागणी केली होती. त्यांनी या भागातील युवकांना रोजगार मिळावा, तसेच येथील नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी औद्योगिक विकासाची गरज असल्याचे स्पष्ट केले. …वाचा सविस्तर
15:23 (IST) 18 Sep 2025

कल्याणमधील ५०० डॉक्टरांचा रुग्णालये बंद ठेऊन ‘आयएमए’च्या संपात सहभाग

कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी २४ तास आपल्या रुग्ण उपचार सेवा बंद ठेवल्या आहेत. …सविस्तर बातमी
15:15 (IST) 18 Sep 2025

कळंबोलीत लुटीतील आरोपी सराईत

चार दिवसांपूर्वी कळंबोली सर्कल शेजारी उभ्या बल्कर चालकाला रात्रीच्या वेळेस वस्त-याचा धाक दाखवून लुटणा-या त्रिकुटाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. …सविस्तर बातमी
15:12 (IST) 18 Sep 2025

Three Language Formula : राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्यास काँग्रेसचा ठाम विरोध, काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

राज्य सरकार तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असून, त्यास काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. …अधिक वाचा
15:10 (IST) 18 Sep 2025

जयसिंगपुरातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय उच्च न्यायालयात; सोमवारी सुनावणी

सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर पुतळा बांधता येत नाही.  पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झालेले आहे आदी  आक्षेप याचिकेत नमूद केलेले आहेत. …वाचा सविस्तर
14:51 (IST) 18 Sep 2025

जेएनपीएच्या राष्ट्रीय मार्गावरील अवजड वाहने नियंत्रित करा; गव्हाण येथील अपघातानंतर सामाजिक संस्था आक्रमक

उरण व जेएनपीए बंदर परिसरातील अवजड वाहनांच्या बेदरकारपणाचा प्रत्येय आला असून या वाहनांवर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी नवी मुंबईच्या वाहतूक उपआयुक्तांकडे केली आहे. …वाचा सविस्तर
14:51 (IST) 18 Sep 2025

‘टेस्ला वाले मंत्री की जय हो!… ओला, उबर, रॅपिडो मंत्रालय…’, कुठे आणि का लावले फलक?

काही दिवसांपूर्वी सहाय्यक परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यासोबत ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांचे प्रतिनिधी आणि इतर गिग कामगार संघटनांचे शिष्टमंडळ यांची बैठक पार पडली. …सविस्तर बातमी
14:31 (IST) 18 Sep 2025

तब्बल १.२ कोटी रुपये खर्चूनही स्वारगेट ‘बस स्टँड’ पाण्यात

या बस स्थानकाच्या परिसरात दुर्गंधी, प्रवाशांची गैरसोय आणि वाहतुकीला अडथळा, अशा अनेक समस्या होत्या. …वाचा सविस्तर
14:23 (IST) 18 Sep 2025

Sunil Tatkare : राहुल गांधींचे निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील भाष्य बालिश – सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल जे भाष्य केले आहे ते बालिशपणाचे आहे अशी टीका केली आहे. …सविस्तर बातमी
14:15 (IST) 18 Sep 2025

मराठवाड्याला मागास म्हणू नका… कुणी केले हे विधान ?

शिंदे म्हणाले, ‘मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. त्यांचे स्मरण आपल्याला करावेच लागेल. वर्तमानकाळाला अनुसरून इतिहासाचे स्मरण केल्यास उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करता येते. …सविस्तर वाचा
14:11 (IST) 18 Sep 2025

राजेश टोपे यांना शह देण्याची अजित पवारांची खेळी

चोथे यांनी शिवसेनेची साथ सोडून अजित पवार यांचे नेतृत्व का स्वीकारले , या पक्षाकडून भविष्यात विधान सभेची निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा त्यांच्या मनात आहे का? हइत्यादी प्रश्नांची सरळ उत्तरे त्यांच्याकडून मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे. …वाचा सविस्तर
14:10 (IST) 18 Sep 2025

नेवाळी आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आंदोलकांची मागणी

कल्याणजवळील नेवाळीतील १ हजार ६७० एकर जमीन शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकारला देशाच्या संरक्षणासाठी भाडेतत्त्वावर दिली होती. …सविस्तर बातमी
13:51 (IST) 18 Sep 2025

राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा गौण खनिज आराखडा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील महिन्याभरात गौण खनिज क्षेत्राचा आराखडा करून तो राज्य शासनाला सादर करावा, असा आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. …सविस्तर वाचा
13:50 (IST) 18 Sep 2025

Good News : रेल्वे प्रवास आणखी सुकर.. स्वदेशी तंत्रज्ञानाची ‘ही’ प्रणाली विकसित

सोलापूर विभागातील धवळस ते भाळवणी या २६ किलोमीटर रेल्वे मार्गिकेवर ‘कवच’ या स्वयंचलित प्रणालीची चाचणी नुकतीच घेण्यात आली. …सविस्तर बातमी
13:34 (IST) 18 Sep 2025

महसूल विभाग सुधारला तर सरकार सुधारेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महसूल खात्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सेवा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.   …अधिक वाचा
13:32 (IST) 18 Sep 2025

कल्याणमध्ये फलक लावण्यावरून भाजप -शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी

कल्याण पश्चिमेतील शहाड येथे रेल्वे स्थानकाजवळ नवरात्रोत्सवाचा शुभेच्छा फलक लावण्यावरून भाजपचे शहाड येथील प्रमुख मोहन कोनकर आणि शिंदे शिवसेनेचे शिवसैनिक मुकेश गणेश कोट यांच्यात जोरदार राडा झाला. …अधिक वाचा
13:32 (IST) 18 Sep 2025

महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या हद्दीत तुकडेबंदी नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

तुकडेबंडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदर्श कार्यपध्दती येत्या पंधरा दिवसात निश्चित केली जाईल. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ५० लाख नागरिकांना होणार आहे. = …अधिक वाचा
13:30 (IST) 18 Sep 2025

Sharad Pawar : निवडणूक आयोगाचे काम लोक कितपत सहन करणार हे सांगता येणार नाही – शरद पवार

मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना पवार म्हणाले, हैद्राबाद गॅजेट हे एक दिशा दाखवत आहे. मला याची प्रत मिळाली आहे. सामंजस्य रहावे, एकीची वीण कायम रहावी असे सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, छगन भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. …सविस्तर वाचा
13:22 (IST) 18 Sep 2025

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास होणार अवघ्या काही मिनीटाचा

विमानतळ सुरु झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवर ताण पडण्याची शक्यता असल्याने ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग तयार केला जाणार आहे. …सविस्तर वाचा
13:14 (IST) 18 Sep 2025

बाणेर डीपी रस्त्याबाबत महापालिकेने उचलले पाऊल, घेतला मोठा निर्णय !

या मार्गाचा अखेरचा टप्पा असणारा ननवरे चौकाला जोडणारा १०० मीटर डीपी रस्ता अर्धवट राहिल्याने परिसरातील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. …सविस्तर बातमी
13:12 (IST) 18 Sep 2025

होमिओपॅथ डॉक्टरांच्या नोंदणीविरोधात आयएमएचा संप; नवी मुंबईत सेवांवर परिणाम

सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये करण्याचा घेतलेला निर्णय डॉक्टरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आज राज्यभरातील डॉक्टरांनी २४ तासांचा टोकन संप पुकारला आहे …सविस्तर वाचा
13:02 (IST) 18 Sep 2025

गणेशोत्सवानंतर टिळक रस्त्यावर पुन्हा उसळली गर्दी नक्की काय घडले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर ‘ड्रोन लाईट शो’ चे आयोजन करण्यात आले होते. …वाचा सविस्तर
12:51 (IST) 18 Sep 2025

‘नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दृष्कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना सोडणार नाही…’ बावनकुळे यांनी ठणकावले!

दुष्कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना माफी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजकंटकांना शोधून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. – चंद्रशेखर बावनकुळे सविस्तर वाचा
12:34 (IST) 18 Sep 2025

ओयो हॉटेलमधून चक्क पती-पत्नीला अटक… त्यांच्या व्यवसायाची तुम्हाला धक्का लाऊन जाणारी कथा

जगातील वेगवान प्रगती करणाऱ्या शहरांच्या यादीत असलेल्या नागपूरच्या गर्दीच्या रस्त्यांवर आणि सजवलेल्या हॉटेल खोल्यांमध्ये एक अंधारी जग फुलत होते. …वाचा सविस्तर

शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. (PC : RNO)

नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं कुरण आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह जाब विचारणार का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे देवाभाऊच्या जाहिरातीवरुन छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.