Maharashtra Monsoon Session 2025 Highlights: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवर एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सभागृहाबाहेर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा होत आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसानंही राज्यभर जोरदार हजेरी लावल्याचं दिसत आहे.

Live Updates

Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी…

19:30 (IST) 8 Jul 2025

Marathi-Hindi Controversy: “मुंबई महानगरपालिकेत…”, राज ठाकरेंवर मराठी-हिंदी वादावरून निशिकांत दुबेंची पुन्हा टीका; शेअर केली ‘विकिलीक्स’ नोंद

Raj Thackeray: मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राजकीय फायदा घेण्यासाठी ठाकरे मराठी-हिंदी वाद चिघळवत असल्याचा आरोप भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. …सविस्तर वाचा
18:35 (IST) 8 Jul 2025

CJI BR Gavai: “मलाही अधिकारी घाबरतात…”, अजित पवारांकडे बघत सरन्यायाधीश बी. आर. गवई काय म्हणाले? सभागृहात पिकला हशा

CJI BR Gavai: सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा आज महाराष्ट्र विधान मंडळात सत्कार करण्यात आला. …सविस्तर बातमी
18:34 (IST) 8 Jul 2025

विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून आदित्य ठाकरेंची मर्सिडीजवरून घोषणा, नीलम गोऱ्हेंचा एक कटाक्ष अन्…

Mahavikas Aghadi Protest for Oppostion Leader Post : महाविकास आघाडीचे आमदार आंदोलन करत असताना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे तिथे दाखल झाल्या. यावेळी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गोऱ्हे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. …सविस्तर वाचा
17:23 (IST) 8 Jul 2025

“पोलीस मराठी आंदोलकांना पकडत असताना गुजराती-मारवाडी आम्हाला चिडवत होते”, मोर्चेकरी महिलेने मांडली व्यथा

मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेसाठी आंदोलन चालू असताना पोलिसांनी मराठी आंदोलकांची धरपकड चालू केली होती. बालाजी हॉटेलच्या परिसरात जमलेल्या मराठी आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्तींने वाहनांमध्ये कोंबून दुसरीकडे नेलं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला होत्या. आंदोलनादरम्यान काही महिलांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी एक महिला आंदोलक म्हणाली, आमच्याच राज्यात अमराठी लोकांना आंदोलन करुन दिले जाते मग आमच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? पोलीस मराठी आंदोलकांना पकडत होते तेव्हा रस्त्याच्या कडेला काही गुजराती आणि मारवाडी लोक उभे होते. ते पोलिसांना सांगत होते की, ‘यांना असंच पळवा, यांना एकत्र येऊन देऊ नका. आम्ही मीरा भाईंदरमध्ये यांचं काही चालू देणार नाही’. पोलीसही त्यांचं ऐकून घेत होते. आमच्याच राज्यात आम्हाला बोलायची परवानगी नाही का?

16:35 (IST) 8 Jul 2025

भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार

भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिली असून दुचाकीस्वार नितीन शेळके हे जागीच ठार झाले आहेत. सोमवारी (७ जुलै) रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सागर धस हे आष्टी येथून पुण्याला जात असताना सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

16:02 (IST) 8 Jul 2025

रघुवीर घाटात सतत दरडी कोसळू लागल्याने महामार्ग बनला धोकादायक, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांचा संपर्क तुटण्याची भीती

पावसाळ्यात सतत दरडी कोसळत असल्याने रत्नागिरी सातारा मार्गावरील दरडीचा घाट म्हणून गेल्या काही वर्षांत या घाटाने आपली ओळख निर्माण केली आहे. …वाचा सविस्तर
15:53 (IST) 8 Jul 2025

“मराठी मोर्चावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वाद?” मनसेचं सूचक वक्तव्य; म्हणाले, आंदोलन उग्र झाल्यामुळे…

Marathi Protest in Mira Bhayandar : परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी देणाऱ्या गृहविभागाने मराठी भाषिकांच्या मोर्चाला मात्र परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला. …सविस्तर वाचा
15:40 (IST) 8 Jul 2025

लातूरमध्ये मदत निधीवरुन दोन आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई

देशमुख यांनी शासकीय कार्यालयात तर कराड यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात मदत वाटप केल्यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. …सविस्तर वाचा
15:24 (IST) 8 Jul 2025

…आणि मराठी अस्मितेसाठी मोर्चा निघाला, बालाजी हॉटेल ते मिरारोड स्थानकपर्यंत आंदोलकांचा मोर्चा पूर्ण

सरकार या आंदोलकांवर पोलिसांचा दबाव आणत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते व विरोधकांकडून केला जात होता. …सविस्तर बातमी
15:04 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander Morcha: असंच आमच्या विरोधात जात जा… अविनाश जाधवांचा पोलिसांना खोचक सल्ला

मी सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे ताकद एकत्र झाली. असेच आमच्या विरोधात जात जा, सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होऊ द्या – अविनाश जाधव, मनसे नेते

15:04 (IST) 8 Jul 2025
Mira-Bhayander Morcha: प्रताप सरनाईकांना मोर्चाच्या ठिकाणहून परत जाण्यास सांगण्यात आल्यानंतर अविनाश जाधवांची त्यावर प्रतिक्रिया…

प्रताप सरनाईकांबाबत जे काही घडलं ते योग्य नाही. आज सकाळपासून ते मराठी माणसाबाबत बोलत होते. ते मराठी माणूस म्हणून मोर्चात येत होते. त्यामुळे जर एखादा मराठी माणूस आपल्यासोबत येत असेल तर त्याला आपण प्रेमाने आपल्यात घेतलं पाहिजे. आता मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आता आम्हाला आपापसांत वाद घालायचा नाहीये. जर इथल्या सगळ्या संघटना, सगळे पक्ष एकत्र आले, तर त्यांनाही इथे सामावून घ्यायला पाहिजे – अविनाश जाधव, मनसे नेते

15:02 (IST) 8 Jul 2025
Mira-Bhayander Morcha: …तर असेच मोर्चे निघत राहतील – अविनाश जाधव

यापुढे महाराष्ट्रात मराठी माणसाबाबत कुठेही असं काही घडलं, तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी. या मोर्चाच्या बाबतीत पोलीस प्रशासनावर गृह खात्याचा दबाव होता. मी सकाळी मला ताब्यात घ्यायला आलेल्या अधिकाऱ्यांना विचारलं की मी मराठीसाठी मोर्चा काढतोय. महाराष्ट्रात अधिवेशन चालू आहे. तुम्हाला याचा त्रास होणार नाही का? ते पोलीस म्हणाले की तुम्हाला इथून नेण्याच्या बाबतीत आमच्यावर खूप दबाव आहे. मी तेव्हा कुठल्या वादात पडलो नाही. मीरा भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान किंवा गुजरातमध्ये आहे? ते महाराष्ट्रात असेल तर मराठी माणसाला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे – अविनाश जाधव, मनसे नेते

14:44 (IST) 8 Jul 2025

पुणे : भुयारी मार्गात दुचाकी कोसळून तरुण जखमी, डेक्कन जिमखाना भागात अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार धवल हा सोमवारी (७ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वेगात डेक्कन जिमखाना भागातून निघाला होता. …सविस्तर बातमी
14:42 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander Morcha: मीरा रोडमधील मराठी एकीकरण समितीचं आंदोलन संपलं

मंगळवारी सकाळपासून मीरारोडमध्ये मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामुळे वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. अखेर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. मीरारोड स्टेशन परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास मोर्चाची सांगता झाली.

14:34 (IST) 8 Jul 2025

मंत्री प्रताप सरनाईकांवर आंदोलनकऱ्यांचा रोष, ‘तुम्ही परत जा’ च्या घोषणा

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी अस्मितेसाठी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी भेट दिली. मात्र सरनाईक येताच आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. …सविस्तर बातमी
14:31 (IST) 8 Jul 2025

मुंबईहून सुटणारी एक्स्प्रेस धुळ्यात आता अर्धा तास आधी

दोन वर्षांपासून नियमितपणे धावत असलेली ही गाडी (११०११) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दररोज दुपारी १२ वाजता सुटते. आणि धुळे येथे त्याच दिवशी रात्री २०.५५ वाजता पोहोचते. …सविस्तर वाचा
14:21 (IST) 8 Jul 2025

रायगडमध्ये शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरेंच्या विरोधात नाराजी

रोहा येथील शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने डायलिसिस सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
14:14 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander Morcha: महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागेल – संदीप देशपांडेंचं मोर्चास्थळी विधान

मराठी माणसावर बोट उचलायचा प्रयत्न केला, तर कानाखालीच बसणार. महाराष्ट्रात मराठी बोलावीच लागेल. मराठी माणसांच्या ताकदीपुढे सरकारला झुकावंच लागेल. आम्ही शांततेत मोर्चा काढण्याची परवानगी मागितली. पण पोलीस अडवणूक करत होते. पण अखेर हा मोर्चा निघाला – संदीप देशपांडे</p>

14:11 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander Morcha: मनसेसह ठाकरे गटाचे नेतेही मीरारोड मोर्चाच्या ठिकाणी दाखल

संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे, विनोद घोसाळकर मीरारोड मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळे या मोर्चाला मनसेसह ठाकरे गटाचाही पाठिंबा असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.

13:58 (IST) 8 Jul 2025

‘मुंबई एपीएमसी’ नवी मुंबईतूनही हद्दपार?

‘ग्रोथ हब’ नियामक मंडळाच्या बैठकीत बाजारसमितीसाठी १०० एकर पर्यायी जागेचा शोध घेण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेला करण्यात आल्या आहेत. …सविस्तर बातमी
13:50 (IST) 8 Jul 2025

वाडा तालुक्यातील टायर कारखान्यांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात; प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याची आमदारांची मागणी

परदेशातून येणारे टायरचे विशिष्ट वातावरणात विघटन करून त्यापासून कार्बन ब्लॅक, पायरोऑइल तसेच स्टीलचे उत्पादन घेतले जाते. …सविस्तर बातमी
13:42 (IST) 8 Jul 2025

डहाणूजवळ बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू; मानवी वस्तीत बिबट्याचा वाढता वावर

गेल्या काही वर्षांपासून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. …सविस्तर वाचा
13:19 (IST) 8 Jul 2025

मिरा भाईंदर शहरात तणाव, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त; आंदोलनावर ड्रोनची नजर

मिरा भाईंदर शहरात निघणाऱ्या मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. असे जरी असले तरीही मोर्चा काढण्यावर मोर्चेकरी ठाम राहत शहरात मोर्चा काढला. …अधिक वाचा
13:09 (IST) 8 Jul 2025

मिरा भाईंदरमधील तणावामुळे व्यापाऱ्यांची दुकाने बंद

मराठी भाषिक मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, सकाळी दहा वाजल्यानंतर मिरा रोड येथील बालाजी हॉटेल परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले. …अधिक वाचा
12:59 (IST) 8 Jul 2025

परभणी जिल्ह्यात भीज पाऊस, खरिपाला संजीवनी

सोमवारी (दि.७) सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सकाळी रिमझिम पावसाला प्रारंभ झाला. …वाचा सविस्तर
12:51 (IST) 8 Jul 2025

Mira-Bhayander Morcha: सरकार घाबरलं आणि मोर्चाला परवानगी दिली – अभिजीत पानसे

प्रशासनाने, सरकारने हा मोर्चा येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पोलिसी बळाचा वापर केला. दडपशाही केली. तरीही मराठी माणूस वाकला नाही हे पाहून ते झुकले. मोर्चाला परवानगी दिली गेली. एखादा आमदार मेहता आहे म्हणून काय फक्त मेहता लोकांचाच आहे की काय? सामान्य लोकांचा नाहीये का? एखादा व्यापारी उठून म्हणतो की महाराष्ट्रात हिंदीच बोलणार, त्याला आमच्या लोकांनी प्रसाद दिला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पोलीस संरक्षण देऊन परवानगी दिली जाते. पण मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते? हा मराठी माणूस तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ते घाबरले म्हणून मोर्चाला परवानगी दिली – अभिजीत पानसे, मनसे नेते

12:47 (IST) 8 Jul 2025

मिरा भाईंदर मध्ये मराठी भाषिकांचा मोर्चा, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू

पोलीस आंदोलकांची अडवणूक करीत असल्याने आता छोट्या गटागटाने एकत्र येत आंदोलन सुरू आहेत. …सविस्तर वाचा
12:32 (IST) 8 Jul 2025

पिंपरी : महापालिकेच्या विकास आराखड्यातील देवस्थानच्या जमिनींवरील आरक्षणे रद्द करणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि नगर रचना विभागाने शहराचा प्रारुप विकास आराखडा १५ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे. …अधिक वाचा
12:18 (IST) 8 Jul 2025

उरण: मच्छीमारांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळले

नव्याने उभारण्यात आलेल्या या करंजा बंदरात मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी शिरकाव केला आहे. …सविस्तर बातमी
11:53 (IST) 8 Jul 2025

“अमराठी लोकांची दादागिरी…”, शरद पोंक्षे स्पष्टच बोलले; म्हणाले, “मराठी लोकांना बाहेर हाकलणाऱ्या…”

Sharad Ponkshe On Marathi Hindi Language Conflict : सद्य परिस्थितीवर शरद पोंक्षेंनी व्यक्त केलं मत; म्हणाले, “महानगरपलिकेवर ज्यांची सत्ता…” …सविस्तर वाचा

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत घडलेला प्रसंग (फोटो – महाराष्ट्र विधानसभा लाईव्ह स्क्रीनग्रॅब)

Latest Maharashtra News Live Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा