Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचाली सुरू आहेत. अनेक नेत्यांचे विविध भागात दौरे सुरू आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं, त्यामुळे मोदींच्या दौऱ्यात काही महत्वाचे निर्णय होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधक जोरदार टीका करत असून गृहराज्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, याच मुद्यांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या बरोबरच लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१०.३० कोटींचा निधी वळता करण्यात आला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याचा निधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai News Live Updates : राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लागच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

17:03 (IST) 9 Oct 2025

गुन्हेगारही म्हणू लागले…नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला…पोलिसांचा दणका

देशभरातील भाविकांसाठी पवित्र अशा कुंभनगरी नाशिकला झालंय तरी काय, असा प्रश्न आठवड्यापूर्वी विचारणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. …वाचा सविस्तर
16:50 (IST) 9 Oct 2025

उत्सव सरले तरी कमानींचे अडथळे जैसे थे; स्वागत कमानींमुळे अंबरनाथकर वेठीस, पालिकेचे दुर्लक्ष

गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या या स्वागत कमानी गणेशोत्सवानंतर काढल्या जातील अशी नागरिकांना आशा होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी कोंडीत अडकूनही त्या स्वागत कमानी सहन केल्या. त्यानंतर स्वागत कमानी हटल्या नाही तर त्या वाढल्या. …वाचा सविस्तर
16:49 (IST) 9 Oct 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विचित्र वागणाऱ्या मंत्र्यांचे…हर्षवर्धन सपकाळ यांचे टिकास्त्र  

कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे. …सविस्तर बातमी
16:49 (IST) 9 Oct 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विचित्र वागणाऱ्या मंत्र्यांचे…हर्षवर्धन सपकाळ यांचे टिकास्त्र  

कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे. …सविस्तर बातमी
16:37 (IST) 9 Oct 2025

ठाणे जिल्ह्यात १२ ऑक्टोबरला भव्य राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

राज्यात सन १९९५ पासून ही उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते. त्यानुसार, सर्व महापालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
16:27 (IST) 9 Oct 2025

कफ सिरफ प्रकरणातील दोषींना पोलीस सोडणार नाही… मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थेटच म्हणाले…

नागपुरात उपचार घेत असलेल्या मुलांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव गुरूवारी नागपुरात आले. …सविस्तर बातमी
16:22 (IST) 9 Oct 2025

“हिंमत असेल तर…”, सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांना दिलं आव्हान

कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केली होती, अशी माहिती समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याच मुद्यावरून विरोधकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत योगेश कदम आणि रामदास कदम यांना आव्हान दिलं आहे. अंधारे यांनी म्हटलं की, “योगेश कदम यांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकं कोणी शिफारस केली होती? नेमकी कोणी या संदर्भातील आदेश कोणी दिले होते? याबाबत स्पष्ट बोलायला पाहिजे. ज्याचं नाव घ्यायचं असेल तर त्याचं स्पष्ट नाव घ्याव. मात्र, आता याबाबत आम्हाला वेगळेच प्रश्न पडले आहेत. जग गृहराज्यमंत्र्यांना दुसरं कोणी आदेश देत असेल तर मग तुमचा मुलगा (रामदास कदम यांचा) फक्त गुळाचा गणपती आहे का? मग तुम्हाला याबाबत नेमकी कोणी आदेश दिले?”, असं म्हटलं आहे.

16:17 (IST) 9 Oct 2025

ज्येष्ठांच्या ‘कुटुंबप्रेमा’ची कार्यकर्त्यांना धास्ती; निवडणुकीत तिकिट वाटपावरून सत्ताधारी पक्षांत असंतोषाचे वारे

गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जनतेत काम करून नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची निराशा होण्याच्या भितीने झोप उडाली आहे. …सविस्तर बातमी
15:57 (IST) 9 Oct 2025

ST Workers Protest: वीज कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन… १३ ऑक्टोंबरपासून…

महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या माहितीनुसार, एसटी कामगारांच्या न्याय मागणीसाठी १३ ऑक्टोबर २०२५ पासून मध्यवर्ती कार्यालय मुबंई येथे रा. प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीकारिता धरणे आंदोलन सुरू केले जाईल. …वाचा सविस्तर
15:52 (IST) 9 Oct 2025

Chota Matka : ताडोबातील ‘छोटा मटका’चे साम्राज्य बळकावण्यासाठी इतर वाघांमध्ये चढाओढ

‘मोगली’ हा वाघ आणि ‘चांदणी’ ही वाघीण ‘छोटा मटका’च्या साम्राज्यावर हळूहळू अधिकार गाजवू लागले आहे. …वाचा सविस्तर
15:33 (IST) 9 Oct 2025

सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकल्याच्या प्रकरणावर ‘आरएसएस’चे मौन का? आरोपी मुस्लीम असता तर…

नुकताच शंभरावा विजयादशमी उत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तन हा विषय हातात घेतला आहे. …सविस्तर वाचा
15:23 (IST) 9 Oct 2025

Mahavitaran: वीज कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर… महावितरणकडून रुजू न झाल्यास कारवाई…

महावितरण प्रशासनाने सांगितले की, वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच कृती समितीसोबत झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. …सविस्तर बातमी
15:17 (IST) 9 Oct 2025

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

या यादीतील नावे https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
14:55 (IST) 9 Oct 2025

शौर्य ते पर्यावरण: नागपूरच्या लेफ्टनंट कर्नलचे नवे योगदान

‘भारतीय सेना : एक लढा पर्यावरणासाठी’ हे पुस्तक लेफ्टनंट कर्नल (डॉ.) चेतन व्ही. धवड यांनी लिहिले असून त्यामध्ये लष्कराच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे सखोल विश्लेषण आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच लष्करप्रमुखांच्या हस्ते झाले. …वाचा सविस्तर
14:52 (IST) 9 Oct 2025

सविस्तर: त्रिभाषा सूत्राचे त्रांगडे; हिंदीविरोधावर तोडगा की नव्या प्रश्नांचा पेच?

Language Education Questionnaire: मूळ भाषा धोरणाच्या पलिकडे समितीच्या अहवालाचा दाखला देऊन या प्रश्नावलीतून नवा काही घाट घालण्यात येत आहे का अशी शंका उपस्थित करणारे प्रश्न आहेत. त्यातील आणखी एक प्रश्न हा पुढील धोक्याची चाहूल देणारा म्हणावा असा. …अधिक वाचा
14:50 (IST) 9 Oct 2025

CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीशांवर बूटफेक प्रकरणाच्या निषेधार्थ ठाण्यात आंबेडकरी संघटनांचे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या निषेधार्थ ठाण्यातील सर्व आंबेडकरी संघटनांनी गुरुवारी कोर्टनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. …अधिक वाचा
14:19 (IST) 9 Oct 2025

त्रिभाषा धोरणात संगणकीय भाषा ?… समितीकडून जनमत आजमावण्यासाठी प्रश्नावली प्रसिद्ध

tribhashasamiti.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन मत व सूचना नमूद करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने केले आहे. …सविस्तर वाचा
14:15 (IST) 9 Oct 2025

Kantara Chapter 1 Features Maharashtra Iconic Fort  ‘कांतारा : चॅप्टर १’ चित्रपटात झळकला महराष्ट्रातील ‘हा’ प्रसिद्ध किल्ला

नुकताच प्रदर्शित झालेला ‘कांतारा : चॅप्टर १’ हा त्याच्या आधीच्या कांतारा चित्रपटा इतकाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे. …सविस्तर वाचा
14:08 (IST) 9 Oct 2025

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आकस्मिक भेटीनंतर कारवाई, दुय्यम उपनिबंधक निलंबित

दोन दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी खामला येथील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. …वाचा सविस्तर
13:44 (IST) 9 Oct 2025

Today Gold Rates: सोन्याने रेकॉर्ड तोडला… जळगावमधील नवीन दर माहिती आहेत का ?

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी दोन हजाराहून अधिक वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने नवीन उच्चांक केला होता. …वाचा सविस्तर
13:35 (IST) 9 Oct 2025

पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद करणे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन, शिक्षक समितीचा आक्षेप

आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार, ५ किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा त्वरित बंद करण्याचे पत्र शिक्षण विभागाने निर्गमित केले आहे. …अधिक वाचा
13:28 (IST) 9 Oct 2025

स्वारगेट, शिवाजीनगर स्थानकांबाहेरील बेशिस्त रिक्षाचालकांना धडा… २७ हजार रुपयांचा दंड वसूल

बसस्थानकांपासून ५० मीटर परिसरात रिक्षा थांबवण्यास मनाई असताना, रिक्षाचालकांकडून बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ, परिसरात, थांब्यांजवळ बिनधास्त रिक्षा उभ्या करून व्यवसाय केला जात आहे. …सविस्तर बातमी
13:23 (IST) 9 Oct 2025

हैद्राबाद गॅजेट नुसार मराठ्यांना मिळालेल्या आरक्षण विरोधात ओबीसी आक्रमक; नवी मुंबईतून आझाद मैदानातील मोर्चाला नवी मुंबईतून रसद 

महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नाही मात्र ओबीसी मधून आरक्षण दिल्याने आता ओबीसी आक्रमक झाले असून शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. …अधिक वाचा
13:23 (IST) 9 Oct 2025

दगडी बँकेचा वाद पेटला… गुलाबराव पाटील, एकनाथ खडसेंना कोणी दिले आव्हान ?

जिल्हा सहकारी बँकेने शंभर वर्षांहून जुनी दगडी बँक शाखेची इमारत विक्रीला काढल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. …वाचा सविस्तर
13:20 (IST) 9 Oct 2025

CJI Bhushan Gavai: सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्या वकिलावर अखेर गुन्हा दाखल, आता पोलीस कधीही…

पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात. …वाचा सविस्तर
13:16 (IST) 9 Oct 2025

“…तर बाळासाहेबांच्या हातासे ठसे कशाला पाहिजेत?”, अनिल परब यांची रामदास कदमांवर पुन्हा टीका

शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांनी टीका केली आहे. रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहात? बाळासाहेब ठाकरे यांना हे (रामदास कदम) व्हिलन बनवायला लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे उद्धव ठाकरे यांनी घेतले असं चित्र कदमांना निर्माण करायचं आहे. याचा अर्थ त्यांना असं सांगायचं आहे का की बाळासाहेब ठाकरे यांचे पैसे हे स्विस बँकेत होते? असं त्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी तसं सांगावं. मग जर बाळासाहेब ठाकरे यांचं अकाऊट स्विस बँकेत नसेल तर मग त्यांच्या हाताचे ठसे कशाला हवेत? म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देखील हे पुसायला निघाले आहेत, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

12:34 (IST) 9 Oct 2025

भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न – इम्तियाज जलील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

‘देशात धर्माचा ‘धंदा’ जोरात सुरू असून, सुशिक्षित लोकही आंधळेपणाने त्याला बळी पडत आहेत. सरन्यायाधीशांवर बूटफेक ही लोकशाहीतील सर्वांत लाजिरवाणी गोष्ट आहे,’ असेही त्यांनी सांगितले. …सविस्तर वाचा
12:07 (IST) 9 Oct 2025

अपुऱ्या प्रश्नपत्रिका! मात्र झेरॉक्स, फोटो नाहीच; बाहेरपण नेता येणार नाही, मग कसे ?

कोणत्याही परीक्षेत जेवढे विद्यार्थी तेव्हड्या प्रश्नपत्रिका तर असतातच मात्र प्रसंगी अधिक पण देऊन ठेवल्या जातात. वेळेवर अडचण येवू नये, असा हेतू. मात्र आता शासन घेत असलेल्या एका परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. …सविस्तर वाचा
11:28 (IST) 9 Oct 2025

धक्कादायक! छगन भुजबळ समर्थक नेत्याची आत्महत्या, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उचलले टोकाचे पाऊल

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज ९ ऑक्टोबरला पहाटे जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आलेगाव येथे घडली. …अधिक वाचा
11:25 (IST) 9 Oct 2025

चाकणसाठी सरकारचा तब्बल ५५८ कोटींचा ‘बूस्टर’! नवीन रस्त्यांसह पर्यायी रस्ते अन् तातडीने भूसंपादन

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) चाकण औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध रस्ते प्रकल्पांना गती दिली आहे. …सविस्तर बातमी

लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)