Maharashtra News Today, 11 September 2025: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आधी मराठा आंदोलन व मनोज जरांगेंच्या उपोषणामुळे वातावरण तापल्यानंतर आता ओबीसी समाजानं मराठा आरक्षणासंदर्भातल्या सरकारच्या जीआरला विरोध केल्यामुळे नव्या आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात सध्या दुबईत चालू असलेल्या आशिया कप स्पर्धेत १४ सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे या सामन्यासमोर राजकीय विरोधाचं संकट उभं राहिल्याचं दिसत आहे.
Marathi News Live Updates Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा
Mumbai Crime : श्वानाला मारले, मालकाचे दोन दात पाडले; वांद्र्यातील घटना, हल्लेखोराला अटक
Neptune Closest To Earth :२३ सप्टेंबरला नेपच्यून पृथ्वीजवळ येणार…! खगोलीय घटनेची उत्सुकता
कणकवलीत दारुच्या नशेत मुलानेच केली आईची हत्या
road construction : रस्ताच केला गिळंकृत ! संबंधितांकडून सत्तावीस लाख रूपये वसुल करण्याची शिफारस
तीन वर्षीय बेपत्ता चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह
डान्सबार, प्रेम, लग्न-काडीमोड आणि नंतर देहव्यवसाय…ओयोत सापडलेल्या महिलेच्या संघर्षाची अशीही कथा!
आधी शिक्षण आणि मग रा.स्व.संघाच्या कार्यामध्ये सक्रिय ! विद्यार्थिदशेतील मित्रांनी सांगितल्या मोहन भागवत यांच्या आठवणी…
Raj Thackeray Uddhav Thackeray: काँग्रेसनं तयारी दाखवली, तरी अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील – नांदगावकर
काँग्रेसनं तयारी दाखवली तर मनसे मविआमध्ये जाईल की नाही हा पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. मी त्यावर बोलणं उचित नाही. पक्षप्रमुखच यावर बोलू शकतात. विचारसरणी, ध्येयधोरणे, दिशा यांत फरक असतो. त्यांचा विचार करूनच राज ठाकरे निर्णय घेतील – बाळा नांदगावकर, मनसे नेते
Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे भावांनी एकत्र येण्यास अनुकूल, पण अद्याप निर्णय नाही – नांदगावकर
उद्धव ठाकरेंची भूमिका जर पाहिली, तर ती दोन्ही भावांनी एकत्र यायला हवं अशी आहे. मग त्यासाठी ते कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहेत. पण अजूनपर्यंत यावर आमची काही चर्चा झालेली नाही. पण चर्चा चालू आहे एवढं मात्र नक्की – बाळा नांदगावकर, मनसे नेते
Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे दसरा मेळाव्याला जाणार नाहीत – नांदगावकर
त्यांचा एक पक्ष आहे. दसऱ्याला त्यांच्या मेळाव्याची परंपरा आहे. आमचा मेळावा गुढी पाडव्याला होतो. त्यामुळे मला वाटत नाही की कुणी कुणाच्या व्यासपीठावर जाईल आणि विचारसरणी मांडेल. जो तो आपापल्या व्यासपीठावर आपली विचारसरणी मांडत असतो. त्यामुळे निमंत्रण दिलंय किंवा व्यासपीठावर नाही येणार वगैरे असं काही झालं असेल असं मला वाटत नाही – बाळा नांदगावकर, मनसे नेते
crime news : संतापजनक : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा सुने सोबत संबध ठेवण्याचा प्रयत्न, सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
लक्ष्मण हाकेंच्या फलकाला अज्ञातांनी काळे फासले परिसरात काही काळ तणाव
धक्कादायक! रक्तदानवरून रक्तरंजित संघर्षाची स्थिती… पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला…
Kalyan Crime News: वर्दळीच्या कल्याण रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांकडून ७५ हजाराच्या ऐवजाची चोरी
CIDCO Corruption: सिडकोच्या सह-निबंधक कार्यालयातील लाचखोरी; पोलिसांची कारवाई
Namo Shetkari Yojana :नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘नमो शेतकरी’ योजनेचा ७ वा हप्ता वर्ग
‘राजकारणातही अनेक कलाकार, आम्ही कायमच मेकअप करून असतो,’ उदय सामंत यांचे पुण्यात वक्तव्य
गव्हाण-जासई मार्ग खड्डेमय; पावसामुळे खड्ड्यांत वाढ
नाशिकमधील स्वच्छ हवा गेली कुठे ? स्वच्छ वायू सर्वेक्षणात १६ वा क्रमांक
नवउद्यमींना प्रोत्साहनासाठी ‘महाफंड’; नवउद्यमींना सरकारकडून किती अर्थसहाय्य?
नक्षलवाद्यांची दहशत झुगारून गावबंदी, गडचिरोलीतील अतिदुर्गम कुमरगुडा ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय…
Uddhav Thackeray Raj Thackeray: भाजपाचा ठाकरे बंधूंना टोला!
बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले…. केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले…
भाजपाचा उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या भेटीवर टोला!
बिनशर्ट, बिनशर्ट म्हणता म्हणता त्यालाच बिनशर्त तीनदा भेटले….
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 11, 2025
केवळ आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी आता मशालीला इंजिनाचे वंगण फासले…
दि.बा नामांतर आंदोलनाची धार पुन्हा तीव्र; उद्घाटनाची घटिका समीप येताच भूमिपुत्र आक्रमक
Mumbai Crime News: चोर बनले टेलिफोन विभागाचे कर्मचारी, मात्र ‘ती’ एक चूक पडली महागात
पुण्यातील म्हाडाच्या ४१८६ घरांसाठी २१ नोव्हेंबरला सोडत… आजपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती
उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका… म्हणाले, ‘राजकारणासाठी ‘फेक नॅरेटिव्ह’’
नाशिकचे खड्डे भाजपसाठी… मंत्री गिरीश महाजन यांचा महापालिका प्रशासनाला इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (file photo)
Marathi News Live Updates Today: वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक व स्थानिक घडामोडी