Maharashtra News Highlights: राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर अखेर राज्य सरकारने २०२६ मध्ये कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मोर्चा होणार आहे. या मोर्चात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत. याचबरोबर मुंबईमधील पवई या ठिकाणी एका फिल्म स्टुडिओमध्ये गुरुवारी दुपारी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत १७ पीडितांची सुटका केली. या कारवाईत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai Weather Today Live Updates : राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

13:25 (IST) 31 Oct 2025

“तुमची अवस्था काय आहे? कोणता झेंडा घेऊ हाती…”, संजय शिरसाट यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

“शिवसेना प्रमुखांच्या आजूबाजूला बडवे बसलेले आहेत, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन ठेवलेलं आहे, म्हणून मी शिवसेना सोडली असं वाक्य राज ठाकरे यांचं होतं. मग आज तुम्ही पुन्हा त्यांच्याकडेच जात आहात. तुम्ही त्यांच्याकडे गेले त्याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुमची अवस्था काय आहे? कोणता झेंडा घेऊ हाती? ठाकरे गटाचा? राहुल गांधी यांच्या पक्षाचा की शरद पवारांच्या पक्षाचा? आता तुमच्या स्वत:च्या पक्षाचा झेंडा कधी कोणाच्या हातात जाईल सांगता येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणं टाळा”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

13:19 (IST) 31 Oct 2025

मतचोरीच्या आरोपांमुळे राज्य निवडणूक आयोगाचा सावध पवित्रा, १५ ऑक्टोबर पर्यंतची अद्ययावत यादी देण्याची केंद्रीय आयोगाकडे मागणी

नवीन मतदारांना मतदान करता यावे आणि अद्ययावत मतदार यादी वापरता यावी, यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदारयादी वापरण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. …वाचा सविस्तर
13:15 (IST) 31 Oct 2025

मतचोरी विरोधात शनिवारी मुंबईत मोर्चा, गर्दी जमविण्यासाठी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांची सूचना चर्चेत

राज्यातील सर्व शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना शशिकांत शिंदे यांनी पत्र पाठविले आहे. मतदार यादीतील बनावट नावे दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचा हा महामोर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. …सविस्तर बातमी
13:03 (IST) 31 Oct 2025

Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : “फडणवीसांच्या घोषणेनंतर नागपुरात बच्चू कडूंचा विजय उत्सव”

मंगळवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची सांगता काल रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर झाली. या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३० जूनपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. …सविस्तर वाचा
13:01 (IST) 31 Oct 2025

नियमभंग करणाऱ्यांना ‘आरटीओ’त जाण्याची गरज नाही… परिवहन विभागाचा निर्णय

संबंधित वाहनचालकाला मिळालेली ई-चलनाची नोटीस https://echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन भरता येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे. …सविस्तर वाचा
12:59 (IST) 31 Oct 2025

“विसंगती टिपण्याची दृष्टी महत्त्वाची”, विनोदी लेखनाबाबत दिलीप प्रभावळकर यांचे मत

‘संगीत श्रवणातून कान तयार होत असतो. त्याप्रमाणे विनोदी लेखनामध्ये विसंगती टिपण्याची दृष्टी महत्त्वाची असते,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. …सविस्तर बातमी
12:53 (IST) 31 Oct 2025

‘डिजिटल तिकीट’ काढण्यास टाळाटाळ… दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार

‘पीएमपी प्रशासनाकडून आपली पीएमपीएमएल मोबाईल ॲप, क्यूआर कोड सेवा या ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. …सविस्तर बातमी
12:52 (IST) 31 Oct 2025

बोईसर मध्ये सराफा दुकानावर गोळीबार

बोईसरच्या गणेश नगर परिसरात असलेल्या चतुर्भुज ज्वेलर्स या सराफा दुकानावर शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी भर दिवसा गोळीबार केला. …सविस्तर वाचा
12:46 (IST) 31 Oct 2025

‘या’ महामार्गावर चिखल, खड्डे, कोंडी कायम… टोल वसुली जोमात, हरित महामार्ग प्रकल्पाला विरोध

वाहनचालकांना टोल भरूनही चिखल, खड्डे, वाहतूक कोंडीतून प्रवास कारावा लागत आहे. …सविस्तर बातमी
12:42 (IST) 31 Oct 2025

‘झोपु’तही आता ॲानलाईन इमारत मंजुरी! वास्तुरचनाकार, विकासकांना सादरीकरण

विकासक तसेच वास्तुरचनाकारांना प्राधिकरणामार्फत खास सादरीकरण करण्यात आले. …सविस्तर बातमी
12:42 (IST) 31 Oct 2025

‘…तरच शेतकऱ्यांना प्राणवायू मिळेल’ – शेतकरी नेते विजय जावंधियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नागपुरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. …वाचा सविस्तर
12:37 (IST) 31 Oct 2025

नागरिकांच्या विरोध, भूमिपूजन रद्द करण्याची नामुष्की, आमदार शुभेच्छा देवून निघून गेले

आमदार किशोर जोरगेवार भूमिपूजनासाठी आले. मात्र प्रभागातील लोकांचा विरोध बघता दिवाळीच्या शुभेच्छा देत भूमिपूजन न करताच निघून जाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. …वाचा सविस्तर
12:31 (IST) 31 Oct 2025

पुणे : उपनगरीय वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च….काय आहे प्लॅन?

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. …अधिक वाचा
12:30 (IST) 31 Oct 2025

राज ठाकरे यांच्या हत्येसाठी बसमधील प्रवासी ओलीस… कुर्ल्यात १७ वर्षांपूर्वी रंगलेले ओलीस नाट्य

१७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहीत आर्य पोलीस चकमकीत ठार झाला. मुंबईत १७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक ओलीस नाट्य रंगले होते. …अधिक वाचा
12:30 (IST) 31 Oct 2025

डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे इमारतीवरून पडून वृध्दाचा मृत्यू

रामचंद्र महादेव पवार (७०) असे मरण पावलेल्या वृध्दाचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील नाना विष्णू हाईट्स या इमारतीत ही दुर्घटना घडली आहे. …वाचा सविस्तर
12:22 (IST) 31 Oct 2025

Video : वसई भाईंदर रोरो म्हणजे… चक्क बॉलिवूडच्या अभिनेत्याने केले रोरो सेवेचे कौतुक

वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस प्रा. लि. यांच्य मार्फत ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी आहे. …सविस्तर बातमी
12:21 (IST) 31 Oct 2025

मुक्त विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र, कुशल मनुष्यबळाचे विदर्भातील हब ठरणार

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कौशल्य विकास केंद्र जिल्ह्यात आणण्याकरिता पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून विद्यापिठाकरीता १० एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
12:19 (IST) 31 Oct 2025

कल्याणमधील मोहने येथे रुग्णालयाच्या पायरीवर डोके आपटून रहिवाशाचा खून

एका खासगी रुग्णालयाच्या पायरीजवळ डोके आपटून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. …अधिक वाचा
12:19 (IST) 31 Oct 2025

पुणे : दुचाकी चोरट्याकडून रिव्हॉल्वरसह दहा काडतुसे जप्त

अरूण बाबुराव देशमुख (वय ६७, रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. …अधिक वाचा
12:14 (IST) 31 Oct 2025

वकिलांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभरातील विधिज्ञ न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त

राज्यातील उच्च न्यायालय, जिल्हा व तालुका न्यायालयातील विधिज्ञ न्यायालयातील कामकाजापासून सोमवारी (३ नोव्हेंबर) एक दिवसासाठी अलिप्त राहणार आहेत. …वाचा सविस्तर
12:06 (IST) 31 Oct 2025

शीव रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुविधेचा विस्तार!

बालरोग विभागातील बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. …वाचा सविस्तर
12:03 (IST) 31 Oct 2025

पंचवटी एक्स्प्रेसला रोजचा उशीर…नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे म्हणणे काय ?

नाशिक जिल्ह्यातून मुंबईला जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिकांना मनंमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी जीवनवाहिनीसारखी झाली आहे. …सविस्तर वाचा
12:02 (IST) 31 Oct 2025

पत्राचाळीतील २३४३ घरांचा बांधकामाचा प्रस्ताव अखेर पर्यावरण मंजुरीसाठी सादर

मुंबई मंडळाने रखडलेला पत्राचाळ पुनर्विकास पूर्ण केला असून मूळ भाडेकरूंना वितरण पत्र देण्याचे काम सुरू आहे. …अधिक वाचा
11:56 (IST) 31 Oct 2025

Uday Samant : शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कशा पद्धतीने होणार? उदय सामंतांची महत्वाची माहिती; म्हणाले, “यादी तयार…”

३० जून २०२६ च्या आधी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. …वाचा सविस्तर
11:54 (IST) 31 Oct 2025

बच्चू कडूंनी बाळासाहेब ठाकरेंना लिहिलेले पत्र चर्चेत..

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आंदोलन मागे घेण्यात आले. …सविस्तर वाचा
11:52 (IST) 31 Oct 2025

देशातील पाच हजार धरणांचे मूल्यमापन प्रलंबित… जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांचीच कबुली

जवळपास पाच हजार धरणांचे मूल्यमापन अद्याप प्रलंबित आहे, असे जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांता राव यांनी बुधवारी सांगितले. …वाचा सविस्तर
11:49 (IST) 31 Oct 2025

पुणे : वाहनांच्या सुट्ट्या भागांची सर्वाधिक वाहतूक… लॉजिस्टिक हब म्हणून ओळख

पुणे विमानतळाचे दिवसेंदिवस होणार विस्तारीकरण, पायाभूत सुविधा आणि विमान उड्डाणांची संख्या यामुळे मालवाहतुकीलाही चालना मिळत आहे. …सविस्तर वाचा
11:46 (IST) 31 Oct 2025

खानापूर किल्ल्याच्या अखेरच्या गणेश बुरुजाचे होणार जतन, नगरपंचायतीकडे देखभालीसाठी हस्तांतर

महादेव डोंगररांगेत पठारावर स्थित खानापूर शहर हे भुईकोट प्रकारातील किल्ल्यामध्ये  वसले आहे. …सविस्तर बातमी
11:44 (IST) 31 Oct 2025

Video: वाशी येथील जुन्या आरटीओ ऑफिस जवळील स्विगी इन्स्टा मार्ट स्टोअरला आग

नवी मुंबई शहरात आगीच्या घटना वाढत असून याबाबत नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाने अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. …सविस्तर वाचा
11:36 (IST) 31 Oct 2025

पनवेल महापालिकेत पुन्हा भरती प्रक्रिया

पनवेल महानगरपालिकेमध्ये १३४ पदे रिक्त असल्याने प्रशासनाने या पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पनवेल महापालिकेत एकूण १३२६ कर्मचारी कार्यरत आहेत. …वाचा सविस्तर

रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या १७ मुलांना काय सांगितलं होतं? मुलीने सांगितला सुटकेचा थरार! म्हणाली, “आधी आम्हाला…”, (फोटो-संग्रहित छायाचित्र)