Maharashtra Maratha Reservation Protest Updates: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काल मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. सुरुवातीला त्यंना फक्त २९ ऑगस्ट या एका दिवसासाठीच परवानगी मिळाली होती. पण त्यांना आंदोलनासाठी आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ मिळाले आहे. दरम्यान जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Live Updates

Manoj Jarange Patil Mumbai Azad Maidan Potest Live Breaking News Update : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासह राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

11:12 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे”, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरोप

आझाद मैदानावरून बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मराठ्यांना वेठीस धरू नका तुमच्या हातत संधी आहे. संधीचे सोने करा. तुम्हाला वाटत असेल, हाणेन मारेन पण जर तुम्ही आंदोलकांवर लाठीमार केला तर त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही अडचण येईल. देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांचे वेदनेवर मीठ चोळणारा माणूस आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आहे.”

11:00 (IST) 30 Aug 2025

हलगीचा ताल आणि झांजेच्या झंकारावर आंदोलकांचा नाच; दुसऱ्या दिवशीही आंदोलकांचा उत्साह कायम

आझाद मैदानात शुक्रवारी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही हलगी आणि झांजेच्या झंकारात आंदोलकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. …सविस्तर वाचा
10:38 (IST) 30 Aug 2025

मराठा आंदोलनामुळे आजही दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी

मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने फोर्ट, गिरगाव, टपाल कार्यालय, मंत्रालय, जे. जे. उड्डाणपूल या दिशेने जाणारी व त्या दिशेने येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. …सविस्तर वाचा
10:32 (IST) 30 Aug 2025

मराठा आंदोलकांचा पालिका कार्यालयासमोर ठिय्या; खाण्यापिण्याची गैरसोय असल्याने आंदोलक आक्रमक

शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून मराठा आंदोलक शुक्रवारी पहाटेपासून मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. …सविस्तर बातमी
10:10 (IST) 30 Aug 2025

जरांगेंचा मुक्काम वाढला; आझाद मैदानात आंदोलनास आणखी एक दिवस मुदत

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मुंबईत आले असल्याने आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण मुंबईतील जनजीवन कोलमडले. …सविस्तर बातमी
10:09 (IST) 30 Aug 2025

पोळी भाजणाऱ्यांचेच तोंड भाजेल! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

या आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असा सूचक इशाराही त्यानी आंदोलकांना दिला. …अधिक वाचा
10:08 (IST) 30 Aug 2025

मुंबईकरांचे हाल, आंदोलकांची आबाळ!

आझाद मैदानातून ओसंडणारी गर्दी अवघ्या मुंबईभर, शहराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगासीएसएमटी स्थानकात ठिय्या, अनेक ठिकाणी ‘रास्ता रोको’. …सविस्तर वाचा
10:07 (IST) 30 Aug 2025

Maratha Reservation: मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची सरकारवर टीका

मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही. हा आजचा प्रश्न नसून अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. …वाचा सविस्तर
10:06 (IST) 30 Aug 2025
Maratha reservation protest: हजारो मराठा आंदोलकांची रात्र फलाटावर, पावसामुळे आज पुन्हा गैरसोय होणार

मराठा आंदोलनासाठी एका दिवसाची मुदत मिळाल्याने हजारो आंदोलकांनी रात्री मुंबईत मुक्काम केला. शुक्रवारची रात्र मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर, फलाट, भुयारी मार्गात काढली. …वाचा सविस्तर

10:04 (IST) 30 Aug 2025

मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा आंदोलनात अधिक भरणा; मंत्रालयासमोर हुल्लडबाजी, मंत्र्यांची निवासस्थाने कडीकुलपात

भर पावसात गेटवे ऑफ इंडिया, हुतात्मा चौक, मंत्रालय, नरिमन पॉइंटकडे आंदोलक पायी भटकत होते. काही आंदोलक मंत्रालयासमोर हलगी व झांज वाजवत नाचायला होते. …अधिक वाचा
09:45 (IST) 30 Aug 2025
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी; वाहतूक विस्कळीत

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान मराठा आंदोलकांनी सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

09:07 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला माझेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील समर्थन असल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक मराठा मुख्यमंत्री असताना देखील मराठा आरक्षण देऊ शकले नव्हते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. नंतरच्या सरकारकडून ते टिकवता आले नाही. जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आमचा पण मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, गरजू मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. काही ठराविकच लोक मराठा समाजात सदन आहेत. इतर मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये सुद्धा परवडत नाही आहे. यामुळे मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यावर काम आहेत. जे आरक्षण द्यायचं आहे, ते घटनेमध्ये बसणार असावं. देशाच्या घटनेच्या बाहेर जाऊन आरक्षण देऊ शकत नाही. कायदेशीर आरक्षण टिकायला हवं. मिळालेले आरक्षण ४ महिन्यात रद्द होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते यावर योग्य तो तोडगा काढतील.

09:02 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: सिडको एक्सिबिशन सेंटर येथे मराठा आंदोलकांची गैरसोय

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांची सिडको एक्सिबिशन सेंटर येथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सिडको प्रशासनावर मराठा आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत आरएनओ वृत्तसंस्थेशी बोलताना विनोद पोखरकर (सकल मराठा समाज संघटक) म्हणाले की,”सिडको एक्सिबिशन सेंटर येथे लाईटची देखील सुविधा नाही. मराठा आंदोलक अंधारात जेवण बनवत आहेत. कितीही वेठीस धरलं तरी मराठा आक्रमक होणार नाही.”

08:35 (IST) 30 Aug 2025
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: भाजपा आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी काल रात्री भाजपा आमदार यांनी आझाद मैदानावर जाऊन त्यांची भेट घेतली.

08:09 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मुंबईकरांकडून मराठा आंदोलकांच्या नाश्त्याची सोय

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांची मुंबईतील नागरिकांनी सोय केली आहे. विविध ठिकाणी मुंबईकरांकडून आंदोलकांना नाश्ता पुरवण्यात येत आहे.

08:07 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: आंदोलनामुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबई पोलिसांची दिलगिरी

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे काल मुंबईकरांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या गैरसोयीबद्दल मुंबई पोलिसांनी दिलगिरी व्यक्त केले आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटले की, “मुंबईकरांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सध्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने लोक आणि वाहने बाहेरून आल्याने दक्षिण मुंबईकडे होणारी वाहतूक विस्कळीत झाली. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि मुंबईकरांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न केला.”

08:04 (IST) 30 Aug 2025

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: मुंबईत पावसामुळे मराठा आंदोलकांचे हाल

मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांना उपोषणासाठी आज आणखी एका दिवसाची मुदतवाद देण्यात आली आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईत दाखल झाले आहेत. पण, मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू असल्याने आंदोलकांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. याचबरोबर पावसामुळे आझाद मैदानावर चिखल होत असल्याने आंदोलकांची गैरसोय होत आहे.

जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.