Marathi News LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अद्यापही अनेक खुलासे समोर येत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. बीडमधील मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी काल उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून फरार आरोपी सतीश भोसले उर्फ ​​खोक्या भोसले याला अटक केली. यातच खोक्या भोसले याच्या वन विभागाच्या जमिनीवर केलेल्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आज खोक्या भोसलेला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या बरोबरच राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या बरोबरच राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra  Highlights News Today, 14 March 2025 : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी जाणून घेऊयात.

12:21 (IST) 14 Mar 2025

बेकायदेशीर कृत्यांना आळा: स्वंयसेवी संस्थांकडून सूचना मागवल्या

नागपूर: सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३- व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक यावरील सूचना मागविणे .

सविस्तर वाचा

12:19 (IST) 14 Mar 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासोबत साजरा केला धुलिवंदनाचा उत्सव

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी कुटुंबासोबत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी धुलिवंदनाचा उत्सव साजरा केला. भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही. ज्यांना भगव्या रंगासोबत यावे वाटत आहे. त्यांनी आमच्या सोबत यावे असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

सविस्तर वाचा

12:17 (IST) 14 Mar 2025

अंबरनाथ, बदलापुरकरांनो पाणी जपून वापरा; महावितरणाच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम

अंबरनाथः गेल्या तीन दिवसांपासून अंबरनाथच्या आनंदनगर भागात सुरू असलेल्या महापारेषणच्या रोहित्र क्षमतावाढीच्या कामासाठी दररोज काही तासांसाठी वीज पुरवठा खंडीत केला जातो आहे. बुधवारी इयत्ता बारावीच्या परिक्षांना त्याचा फटका बसला. आता शहरातील पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे उत्सवाच्या दिवशीच पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले आहे.

सविस्तर वाचा

12:12 (IST) 14 Mar 2025

कल्याण पूर्वेत पथकप्रमुख भगवान पाटील फेरीवाल्यांचा हप्ता घेताना कॅमेऱ्यात कैद, कारवाईचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे आदेश

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील पथक प्रमुख भगवान पाटील फेरीवाल्यांची पाठराखण करण्यासाठी एका व्यक्तिकडून जे प्रभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पैसे स्वीकारत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या दृश्यध्वनी चित्रफितीची पालिकेच्या वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे.

सविस्तर बातमी…

12:08 (IST) 14 Mar 2025

नागपूर: टंचाईवर जलस्त्रोतांचे पुनर्रजीवनाचा पर्याय

नागपूर, : जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुक्यात व इतर ठिकाणी  दरवर्षी काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. इतर तालुक्यात जी लहान मोठी नदी, नाले, ओहोळ आहेत ती पावसाने काठोकाठ वाहिल्यामुळे पुराचा प्रश्न उद्भवून  मोठ्या प्रमाणात जमीनीची धूप होते.

सविस्तर वाचा

11:31 (IST) 14 Mar 2025
“उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावं, तर राऊतांनी त्यांचा शिमगा…”, होळीच्या शुभेच्छा देताना बावनकुळेंच्या कोपरखळ्या

राज्याच्या विविध भागात प्रथेप्रमाणे होळी उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. आज (१४ मार्च) रोजी धूलिवंदन देखील उत्साहात साजरे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘बुरा न मानो होली है!’, असं म्हणत होळीचं सेलिब्रेशन केलं जातं. आता होळीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणातील नेते एकमेकांना शुभेच्छा देतानाही पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्छा देताना खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. “उद्धव ठाकरेंनी दररोज सभागृहात यावं तर संजय राऊतांनी त्यांचा सकाळचा शिमगा वर्षभरासाठी बंद करावा”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना शुभेच्छा देताना कोपरखळी लगावली आहे.

सविस्तर वाचा

10:45 (IST) 14 Mar 2025

IIT नंतर आता मुंबईत IICT, ४०० कोटी मंजूर; कशी असेल ही संस्था?

IIT अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या देशभरातील संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवर्षी विद्यार्थी प्रवेश घेत असतात. पण आता आयआयटीबरोबरच IICT देखील देशभरात शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे पहिली आयआयसीटी संस्था मुंबईत उभारली जाणार असून त्यासाठी गोरेगावमधील फिल्म इंडस्ट्रीत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

सविस्तर वाचा

10:38 (IST) 14 Mar 2025

“कायद्याने शिक्षा द्या, पण घर का जाळलं?”, खोक्या भोसलेच्या घराबाबत अंजली दमानियांचा सवाल

आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. अखेर पोलिसांनी सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातून अटक केलं आहे. तसेच सतीश भोसलेचं घर वनविभागाने पाडलं आहे. मात्र, हे घर पाडल्यानंतर घर जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेच्या पाडलेल्या घराबाबत काही सवाल केले आहेत. “सतीश भोसले चे घर जाळलं? का? खूप खूप खूप वाईट वाटलं. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप खूप चुकीचं आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या, पण घर का जाळलं? हे योग्य नाही”, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली. (फोटो-संग्रहित छायाचित्र)