Maharashtra News Today, 07 November 2023 : मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, अशी टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली. भुजबळांच्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयावरून दावे-प्रतिदावे करण्यात येते आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत….
Marathi News Updates Today : राजकीय, क्राइम आणि महाराष्ट्रातील अन्य घडामोडी एका क्लिकवर….
अमरावती: प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून जुनी पेन्शन लागू करावी, समूह शाळा योजना मुळातच बंद करावी, या प्रमुख मागण्यांसह वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरण्यात यावी, नवसाक्षरता अभियानासह इतर अशैक्षणिक कार्यक्रम थांबवावेत, शाळा अनुदान तत्काळ मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक समितीने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ११ डिसेंबर राजी मोर्चाचे आयोजन केले आहे.
पनवेल तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतींवर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने एकत्रितपणे विजय मिळविला.
“नितेश राणे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. जरांगे-पाटलांवर नितेश राणेंनी आरोप केले, धमकी देत होते. जरांगे-पाटलांच्या विरोधात नितेश राणे आहेत. नितेश राणे हे दुतोंडी आहेत,” अशी टीका खासदार विनायक राऊतांनी केली आहे.
वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे मुंबईमध्ये सर्दी व घशाच्या खवखवीने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.
अमरावती: विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती शहरात तीन रेल्वे स्थानके असली, तरी रेल्वेसेवा अपुरीच असल्याचे चित्र आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या तब्बल दहा गाड्या बडनेरा रेल्वेस्थानकावर थांबत नाहीत.
पुणे : एसटीने दिवाळीच्या काळात तिकीट दरात नुकतीच दहा टक्क्यांनी वाढ केली आहे. याचबरोबर खासगी प्रवासी बसच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रिक्षांनाही दिवाळीच्या काळात बोनस भाडेवाढ द्यावी, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. रिक्षांना १० टक्के बोनस भाडेवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीने केली आहे.
धारावी येथे पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी मुलाने तिला आपल्या घरी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पुणे: देशातील प्रमुख महानगरांमध्ये दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या आलिशान घरांना मागणी वाढली आहे. यंदा नऊ महिन्यांत सात महानगरांमध्ये ८४ हजार ४०० आलिशान घरांची विक्री झाली.
अमरावती: वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेसाठी (सीएसआयआर) विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) द्वारे आयोजित करण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) यंदा २६ ते २८ डिसेंबर अशी तीन दिवस देशभर पार पडणार आहे.
गडचिरोली: जिल्हा हिवताप कार्यालयातून पाच लाख किमतीचे १८ मायक्रोस्कोप यंत्र चोरीस गेले होते. या घटनेला साडेतीन महिने उलटले, परंतु पोलिसांना अद्याप चोरट्याचा शोध घेता आला नाही.
ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात मेट्रो स्थानकाच्या कामासाठी ठाणे पोलिसांनी आज, मंगळवारपासून वाहतुक बदल लागू केले आहेत. यानुसार मानपाडा ते तत्त्वज्ञान विद्यापीठ पर्यंत सेवा रस्त्यावर वाहतुकीस बंदी असणार आहे.
वर्धा: विविध बेकायदेशीर घटनेत अनेक गुन्हे दाखल झाले असलेल्या हिंगणघाट येथील कुख्यात गुंड गज्या हंडी उर्फ गज्या खंगार याचा दोन दिवसापूर्वी दगडाने ठेचून तसेच कुऱ्हाडीने वार करीत निर्घृण खून करण्यात आला होता.
जानेवारी २०२३ मध्ये नोंदणी झालेल्या आणि रेरा नियमानुसार तीन महिन्यांनी प्रकल्पाची माहिती अद्ययावत न करणाऱ्या गृहप्रकल्पाविरोधात महारेराने कारवाईचा बडगा उगारला आहे.
नागपूर: ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्यानंतर तिच्या आईच्या खात्यातील दीड लाख प्रियकराने लंपास केले. ही घटना उघडकीस येताच प्रेयसीने पोलिसांत तक्रार दिली.
नागपूर: ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काटोल मतदारसंघात पक्षाचा एकतर्फी विजय झाल्याचा दावा करत अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शरद पवार यांच्याकडे पुन्हा परतणार, असा दावा माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवारगट) आमदार अनिल देशमुख यांनी केला.
नागपूर: विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चिकन गुनियाच्या रुग्णांची संख्या तब्बल सहा पटींनी वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
अमरावती: शहरात गांजापाठोपाठ आता मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले आहे.
बीड येथील भुजबळांच्या नातेवाईकांचं हॉटेल फोडण्यात आलं. पण, ते हॉटेल नातेवाईकांनीच फोडले असल्याची माहिती मला मिळाली आहे. मराठा समाजातील मुलं अशी तोडफोड करणार नाहीत. मराठा समाजातील मुलं खचली पाहिजेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भुजबळांनी स्वत: बीड पोलीस अधीक्षकांकडे जाऊन बसले होते. त्यांनी काही लोकांची नावं देखील दिली आहे, असा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.
अजित पवार यांचं वय लहान आहे. त्यांना पुढील काळात मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं होतं. यावरून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दीपक केसरकरांना सुनावलं आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणास बसले होते. पण, सरकारच्या विनंतीनंतर जरांगे-पाटलांनी दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. आता मराठा आरक्षणावर बागेश्वर धामचे अध्यात्मिक गुरू धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी भाष्य केलं आहे.
“सरकारचं शिष्टमंडळ बुधवारी भेटीस येणार आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे वाट पाहू,” असं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे लोकाभिमुख मुख्यमंत्री आहेत. ते आमदारांचे म्हणणे ऐकून घेतात. ते प्रभाविपणे काम करत आहेत . उद्धव ठाकरे यांच्यात कृतीशिलतेचा अभाव आहे. ते कर्यकर्त्यांना वेळ देत नाहीत. त्यांच्या कार्यशैलीवर कार्यकर्ते आजही नाराज आहेत, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.