अमरावती: शहरात गांजापाठोपाठ आता मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्‍याचे दिसून आले आहे. नागपुरी गेट पोलिसांनी एमडी हे अमली पदार्थ विक्री करण्‍यासाठी आलेल्‍या फिरोज खान सैफुल्‍ला खान (२७, रा. साबणपुरा) याला अटक केली आहे.

आरोपी फिरोजसह दुसरा संशयित अल्‍तमश गफ्फार (२०, रा.अन्‍सारनगर) या दोघांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्‍वये (एनडीपीएस) गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. अल्‍तमश पसार झाला आहे. फिरोज हा अ‍ॅकेडमिक हायस्‍कूलच्‍या मैदानावर अमली पदार्थ विक्री करण्‍यासाठी ग्राहक शोधत होता. पोलिसांना मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे नागपुरी गेट पोलिसांचे पथक मैदानावर पोहचले.

Amravati, Murder husband ,
अमरावती : प्रेमप्रकरणात अडसर ठरत असलेल्या पतीची निर्घृण हत्या; पत्नीनेच रचला कट
Girgaon, murder, bicycle,
गिरगावमध्ये सायकलवरून झालेल्या वादातून हत्या
Salman Khan, Salman Khan firing case,
सलमान खान गोळीबार प्रकरण : पिस्तुल पुरवणाऱ्या आरोपीची आत्महत्या
Devendra Fadnavis
“काँग्रेसच्या काळात पोलिओची लस तयार झाली म्हणून…”, करोना लसीबाबत केलेल्या विधानावरून जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला!

हेही वाचा… मायक्रोस्कोप चोरीप्रकरणात भांडारपालची पाठराखण? साडेतीन महिने उलटूनही कारवाई नाही

संशयास्‍पद स्थितीत फिरत असलेल्‍या फिरोज खान याला ताब्‍यात घेऊन त्‍याची झडती घेतल्‍यानंतर दोन मोबाईल आणि एका पुडक्‍यात सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन सापडले. त्‍याने हे अमली पदार्थ आपल्‍याला अल्‍तमश गफ्फार याने दिल्‍याचे चौकशीदरम्‍यान सांगितले. फिरोज खान याला अशा प्रकारच्‍या गुन्‍ह्यात प्रथमच अटक करण्‍यात आली आहे. अमली पदार्थ पुरविणारी टोळी ही गेल्‍या अनेक दिवसांपासून सक्रिय असून त्‍यांचे धागेदोरे हे मुंबई आणि ठाण्‍यापर्यंत असल्‍याचे पोलीस कारवाईतून निदर्शनास आले आहे.