scorecardresearch

Premium

वर्धा: जुन्या वैमनस्यातून कुख्यात गुंड ‘गज्या हंडी’ चा खून; मारेकऱ्यांना अटक

अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गज्याचा खून हा जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Gangster Gajya Handi Hinganghat, killed two days, killers arrested wardha
जुन्या वैमनस्यातून कुख्यात गुंड 'गज्या हंडी' चा खून; मारेकऱ्यांना अटक (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वर्धा: विविध बेकायदेशीर घटनेत अनेक गुन्हे दाखल झाले असलेल्या हिंगणघाट येथील कुख्यात गुंड गज्या हंडी उर्फ गज्या खंगार याचा दोन दिवसापूर्वी दगडाने ठेचून तसेच कुऱ्हाडीने वार करीत निर्घृण खून करण्यात आला होता.

या प्रकरणी प्रशांत मनोहर राऊत, मयूर सदाशिव कोराटे, बंटी गजानन खडसे तसेच सचिन विनोद क्षत्रिय हे खून करीत फरार झाले होते. त्यांचा कसून तपास सुरू झाला. तिघांना अटक झाली पण प्रशांत राऊत हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

29 villages dispute in Vasai-Virar
वसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Speeding up the process of withdrawing crimes against traders in the Corona era Pune news
करोना काळातील व्यापाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग
tiger from Tipeshwar sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील ‘त्या’ वाघाची फासातून सुटका, शिकाऱ्यांनी लावला होता…

हेही वाचा… माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, राष्ट्रवादीचे सोडून गेलेले आमदार पुन्हा परतणार…

अखेर तो यवतमाळ लगत एका शेतातील मचानावर लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेतशिवारात शोध मोहीम राबविल्यावर तो हाती लागला. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गज्याचा खून हा जुन्या वैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gangster gajya handi of hinganghat was killed two days ago killers have been arrested wardha pmd 64 dvr

First published on: 07-11-2023 at 10:21 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×