Maharashtra Political New Live Updates, 17 November 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. या दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर-१ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे रविवारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ही कृती नियमबाह्य असल्याचे सांगत नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर नवी मुंबईत राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. तसेच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमीत्ताने राजकीय वर्तुळात त्यांना मानवंदना दिली जात आहे.
दुसरी महानगर गॅसच्या पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा बाधित झाला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांना सीएनजी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये मोठा बिघाड झाला आहे. यामुळे सीएनजीचा पुरवठा काही ठिकाणी बंद पडला असून काही ठिकाणी तो कमी दाबाने होत आहे. यामुळे सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. यामुळे या वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंबंधीच्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत.
Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : महाराष्ट्रातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी येथे वाचा एका क्लिकवर
मराठी अमराठी वाद : मनसेविरुद्धच्या याचिकेतून उत्तर भारतीय शब्द वगळा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना आदेश
चौफेर टीका होताच पक्षप्रवेश स्थगित केला; रोहित पवारांनी दिली महिती
भाजपने पालघर साधू हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांच्याच पक्षप्रवेश करून घेतला आणि आज तोच पक्षप्रवेश कसा योग्य असल्याचे मुख्यमंत्री ठासून सांगत होते. आता मात्र चौफेर टीका होताच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सदरील पक्षप्रवेश स्थगित केला.
“ना नीती ना मत्ता, प्रिय फक्त सत्ता” या तत्वाने चालणाऱ्या नव्या भाजपला उशिरा का होईना शहाणपण सुचले हे महत्वाचे आहे. असो प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची क्लिनचीट देण्याची परंपरा तर खंडित केलीच शिवाय मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागापेक्षा प्रदेशाध्यक्षांची तपास यंत्रणा मजबूत असल्याचं देखील दाखवून दिलं. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदय प्रदेशाध्यक्षांच्या तपास यंत्रनेची मदत घेतील ही अपेक्षा!, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
भाजपने पालघर साधू हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांच्याच पक्षप्रवेश करून घेतला आणि आज तोच पक्षप्रवेश कसा योग्य असल्याचे मुख्यमंत्री ठासून सांगत होते. आता मात्र चौफेर टीका होताच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सदरील पक्षप्रवेश स्थगित केला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 17, 2025
“ना नीती ना मत्ता, प्रिय फक्त सत्ता”… pic.twitter.com/YiSsibGTrf
Vasai Virar Crime: रिक्षा चोरी करणारा सराईत आरोपी अटकेत; चार रिक्षा जप्त
पालघरच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष; शासकीय यंत्रणा ‘दरबारात’ वेठीस! पालकमंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेकडून जनहित याचिका
घाटकोपरमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा; पंधरा मुलांना वडापाव खाल्ल्याने त्रास
Video: पनवेल महापालिकेच्या आरक्षण सोडतीत गोंधळ; राजकीय पक्षातील पदाधिका-यांचा निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम विरोधात घोषणाबाजी
“आमच्याकडे असले की आरोप तुमच्याकडे येताच पवित्र होतात”, रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
“आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, पालघर साधू हत्याकांड संदर्भात आपली प्रतिक्रिया बघितली. दोन वर्षापूर्वी आपण आरोप करून राळ उठवली आणि ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच नेहमीप्रमाणे भाजपात घेतले. आमच्याकडे असले की आरोप तुमच्याकडे येताच पवित्र होतात. सलीम कुत्ता, इकबाल मिरची, आदर्श घोटाळा अशी असंख्य प्रकरणं आहेत, ज्यांचे डाग भाजपाच्या वाशिंग मशीन मध्ये धुतली गेली आहेत. उद्या कोणताही मोठा गुन्हेगार जर भाजपात आला तर आपण त्याला देखील क्लीन चीट द्याल, यात शंका नाही . असो, आधी आरोप करायचे आणि नंतर पक्षात प्रवेश द्यायचा, आपली ही MODUS OPERANDI बघता, “ना नीती ना मत्ता… प्रिय केवळ सत्ता” हेच आपल्या नव्या भाजपचे तंत्र दिसते…!” अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 17, 2025
पालघर साधू हत्याकांड संदर्भात आपली प्रतिक्रिया बघितली. दोन वर्षापूर्वी आपण आरोप करून राळ उठवली आणि ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनाच नेहमीप्रमाणे भाजपात घेतले.
आमच्याकडे असले की आरोप तुमच्याकडे येताच पवित्र होतात. सलीम कुत्ता, इकबाल मिरची, आदर्श… https://t.co/LlfEOuL5j5 pic.twitter.com/pQzDVTaRYt
Mumbai CNG Shortage: सीएनजीचा तुटवडा, वाहतुकीचा बोजवारा…. मुंबईत वाहनचालक हवालदिल!
नाशिकमध्ये पुन्हा बिबट्या….भोसला सैनिकी शाळेला दुपारुन सुट्टी….शालेय परिसरात शोध मोहीम
Vasai Virar Meter Auto: वसईत मीटर रिक्षा प्रवसाला प्रारंभ पण, शेअरिंग रिक्षांवर होणार परिणाम?
बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे बंधू एकत्र; आदित्य ठाकरेंनी पोस्ट केले फोटो
आज हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आई रश्मी ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष- माझे काका राज साहेब ठाकरे ह्यांच्यासह शिवतीर्थावरील स्मृतिस्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन केले, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आज हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष- माझे काका मा. राज साहेब ठाकरे ह्यांच्यासह शिवतीर्थावरील स्मृतिस्थळास भेट देऊन विनम्र अभिवादन… pic.twitter.com/QnnTOth0az
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 17, 2025
Amit Thackeray FIR Post: भविष्यातही असे हजारो ‘गुन्हे’ मी अभिमानाने करेन! – अमित ठाकरे
खबर पीक पाण्याची: साखर धोरणातील गोंधळाचा शेतकऱ्यांवरच परिणाम ?
हार नही मानुंगा… कवितेतून व्यक्त झाल्या पंकजा मुंडे
मित्र पक्षाला टांगणीवर ठेवण्याची भाजपची धूर्त खेळी
डोंबिवली भोपरमधील भूखंड विकासात कर सल्लागाराची ठाण्यातील विकासकाकडून फसवणूक
Mumbai CNG Shortage: सीएनजी पुरवठा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे हाल; पंपावर वाहनांच्या रांगा, गॅस नसल्याने गृहीणीही हवालदील
एमबीबीएस प्रवेशासाठी ३५ लाखांची फसवणूक, चंदीगडमधील आरोपीवर…
शिंदेंचे भाजपविरोधात कलानींना बळ, भाजपचे चार ज्येष्ठ माजी नगरसेवक कलानी गटात दाखल
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात, नवनीत राणा म्हणाल्या “चिखलदऱ्याच्या विकासासाठी हेच योग्य उमेदवार”
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात, नवनीत राणा म्हणाल्या “चिखलदऱ्याच्या विकासासाठी हेच योग्य उमेदवार”
राज्यातील न्यायालयांमध्ये लवकरच ‘एएलएस’ तंत्रज्ञान, कर्णबधिरांना न्यायालयीन सुनावणीत….
Mumbai Crime News: खारमध्ये परदेशी तरुणीचा विनयभंग; आरोपीला २४ तासात अटक
Vasai Student Death: वसई विद्यार्थीनी मृत्यू प्रकरण : जिल्हा शिक्षण विभागाकडून चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
Jalgaon Banana : केळी उत्पादकांसाठी खुशखबर… जळगावात २०० पेक्षा अधिक शीतगृहे उभारण्याच्या हालचाली
Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रात कधी होणार निवडणुका? काय आहे वेळापत्रक? कधी लागणार निकाल? वाचा सर्व माहिती सविस्तर!
बाळसाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिनी ठाकरे बंधू एकत्र
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमीत्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाचे इतरही नेते उपस्थित होते.
